मुंबई विद्यापीठाच्या कलीना कॅम्पसमध्ये सावळा गोंधळ; मॅरेथॉनसाठी दिलेल्या जागेचा वापर पैसा कमावण्यासाठी?

Mumbai University Kalina Campus : सध्या मुंबईत टाटा मुंबई मॅरेथॉनची जय्यत तायरी सुरु आहे. रविवार 21 जानेवारी रोजी ही मॅरेथॉन होणार आहे. मात्र, त्याआधीच नवा वाद सुरु झाला आहे.  मुंबई विद्यापीठ कलिना कॅम्पस येथील दोन एकर जागा टाटा मुंबई मॅरेथॉन च्या वापराकरीता देण्याचा करार करण्यात आला आहे.  मात्र, या जागेच्या वापराबाबत मुंबई विद्यापीठाच्या कलीना कॅम्पसमध्ये सावळा गोंधळ पहायला मिळत आहे. मॅरेथॉनसाठी दिलेल्या जागेचा वापर पैसा कमावण्यासाठी केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

मॅरेथॉन च्या वापराकरीता देण्याचा करार करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र, जवळपास दहा एकर जागा वापरण्यात आली असल्याचा आरोप युवासेना माजी व्यवस्थापन परीषद सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी केला आहे. या दोघांनी पत्राद्वारे ही बाब कुलगुरु प्रा.(डॉ.) रविंद्र कुळकर्णी यांच्या निदर्शनास आणून दिली असून सदर आस्थापनावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

युवासेना माजी व्यवस्थापन परीषद सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी कुलुगुरु यांना लिहीले पत्र जसेच्या तसे

दि.१९ जानेवारी,२०२४
प्रति,
मान.प्रा.(डॉ.)रविंद्र कुळकर्णी,
कुलगुरु,
मुंबई विद्यापीठ, मुंबई
यांसी सस्नेह जय महाराष्ट्र!
       

हेही वाचा :  वीज बिघाडामुळे उपनगरीय लोकल ठप्प ; २०० फेऱ्या विस्कळीत

विषय: मुंबई विद्यापीठ कलीना कॅम्पस येथील मोकळी जागा व्यावसायिक कामाकरीता देणेबाबत.

महोदय,

     आम्ही युवासेना माजी व्यवस्थापन परिषद सदस्य,मुंबई विद्यापीठ,मुंबई उपरोक्त विषयास अनुसरून अशी मागणी करीत आहोत की,मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथे गेलो असता असे निदर्शनास आले की,रविवार दि.२१जानेवारी,२०२४ रोजी होऊ घातलेल्या मुंबई मॅरेथॉन करीता विद्यापीठाची मोकळी जागा भाड्याने वापरास देण्यात आली आहे वास्तविक याकरीता विरोध करण्याचा अजिबात हेतु नव्हता परंतु हि प्रसिध्द मुंबई मॅरेथॉन खाजगी आहे (शासकीय नाही)आणि मुंबई विद्यापीठाची जागा व्यावसायिक कामाकरीता (कमर्शिअल स्टॉल)वापर केला जात आहे,(उदा.एक लाख भाडे देणार आणि कमर्शिअल स्टॉल कडून दोन चार लाख उकळणार) यापूर्वी देशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या लष्कर भरती साठी आपण भाड्याने जागा देण्याचा प्रस्ताव पारित केला होता परंतु जिल्हाधिकारी यांच्या मध्यस्तीमुळे मोफत देण्यात आली,हि बाब विद्यापीठास भूषणावह नाही.
    मुंबई मॅरेथॉन करिता देण्यात आलेल्या जागेमुळे विद्यापीठातील सर्व रस्त्यांवर खुप गाड्या पार्क करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना देखील अडचणी होत आहेत तरी सदर जागेचा व्यावसायिक कामाकरीता वापर करण्यास मज्जाव करण्यात यावा, खरंतर मुंबई विद्यापीठ प्राधिकरणात एकही विद्यार्थी प्रतिनिधी नसल्यामुळे असे विद्यार्थ्यांना मारक निर्णय घेण्यात येत असल्याचा आमचा मानस आहे तरी आपण याबाबत सविस्तर चौकशी करुन व्यावसायिक वापरास मज्जाव करण्यात यावा अशी मागणी करीत आहोत.

हेही वाचा :  महागडे डाएट नाही तर आजीच्या हातचा पदार्थ ठेवतो फिट, Shiv Thakare चा Fitness Funda

धन्यवाद!

        आपले नम्र,
प्रदीप सावंत     राजन कोळंबेकर



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …