महागडे डाएट नाही तर आजीच्या हातचा पदार्थ ठेवतो फिट, Shiv Thakare चा Fitness Funda

बिग बॉस हिंदीचा उपविजेता ठरला आपल्या सगळ्यांचा लाडका शिव ठाकरे. या संपूर्ण सिझनमध्ये सगळ्यात जास्त चर्चा झाली ती, आपल्या मराठमोळ्या शिव ठाकरेची. कधी टास्क असो किंवा कधी त्याचा स्वभाव.. पण शिव हा कायमच चर्चेत राहिला. या शिवच्या फिटनेसच्याही प्रेमात लाखो जण आहेत. अगदी रोडिजच्या ऑडिशनपासून शिवच्या फिटनेसची चर्चा आहे. स्वतःला एवढं फिट ठेवताना शिव नक्की काय करतो? कोणत्या गोष्टी टाळते आणि कोणत्या गोष्टी आवर्जून करतो, हे जाणून घेऊया. शिवच्या फिटनेस फंडा काय आहे? हे महाराष्ट्र टाईम्सच्या Exclusive मुलाखतीतून जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Shiv Thakare इंस्टाग्राम)

आजीच्या हातचा कोणता पदार्थ

आजीच्या हातचा कोणता पदार्थ

शिव ठाकरे सांगतो की, आजीच्या हातची बाजरीची भाकरी ही त्याच्या हेल्दी बॉडीचं सिक्रेट आहे. चुलीवर गरमा गरम केलेली बाजरीची भाकरी खाऊनच मी लहानाचा मोठा झालो. यासोबतच कच्चा डाळी, हरभरा आणि इतर कडधान्ये खाऊन शिवने ही बॉडी कमावली आहे.

हेही वाचा :  Shiv Thakare Exclusive : मी खचणार नाही, आता कुठे प्रवास सुरु झालाय : शिव ठाकरे

(वाचा – प्रोटीनसाठी चिकन-अंडी सोडा, या १० स्वस्तातील Millets ने मिळवा 100% High Protein, मसल्स होतील ताकदवान)​

संपूर्ण शाकाहारी

संपूर्ण शाकाहारी

शिव ठाकरे सांगतो की, फिटनेससाठी मी कधीच नॉनव्हेज खाल्लं नाही. मी अजूनही संपूर्ण शाकाहारी आहे आणि हे देखील माझ्या फिटनेसचं एक रहस्य आहे. मी संपूर्ण शाकाहार घेतो. घरचं जेवणं हेच माझ्या फिटनेसचं रहस्य आहे.​

बिग बॉसच्या घरी १०० दिवस कसा होता फिटनेस

बिग बॉसच्या घरी १०० दिवस कसा होता फिटनेस

शिव सांगतो की, माझं जेवण व्यवस्थित आहे. अगदी मला ५ चपात्या लागतात. पण मला माझ्यामुळे किंवा माझ्या आहारामुळे बिग बॉसमध्ये वाद नको होते. त्यामुळे मी कधी कधी अगदी १ चपाती खाऊनही राहिलो आहे. पण माझ्या मंडळींना माहित असायचं की, मी उपाशी आहे. माझं पोट भरलेलं नाही. मग ते माझ्यासाठी काही तरी करायचे. माझं या दिवसांमध्ये खूप वजन कमी झालंय. पण बॉडी काय आपण कमावलेली आहे ती पुन्हा पण कमावू शकतो.

​(वाचा – Home Remedies For Diabetes : डायबिटिस रूग्णांना AIIMS कडून ५ जबरदस्त उपाय, ब्लड शुगरचा आकडा जरा पण वाढणार नाही)​

हेही वाचा :  53 वर्षाची महिला 18 वर्षांनी लहान असलेल्या तरुणाच्या प्रेमात; 24 वर्ष ज्याच्यासह संसार केला त्या नवऱ्याला सोडले आणि...

ट्रेनरने सांगितलेला डाएट

ट्रेनरने सांगितलेला डाएट

ट्रेनर आता जे मिलेट्स म्हणून खायला सांगतात, तो आमच्या आहारातील लहानपणापासूनचा एक भाग आहे. त्यामुळे मी ट्रेनरने सांगितलेल्या डाएटचा समावेश आधीच केला होता. या घरगुती डाएटमध्ये माझं शरीर आतून स्ट्राँग झालं आहे. मी आजही कोणतेच सप्लिमेंट किंवा खास डाएट फॉलो करत नाही. मी माझ्या घरचं आजीच्या आणि आईच्या हातचं जेवण जेवतो.

(वाचा – Home Remedies For Diabetes : डायबिटिस रूग्णांना AIIMS कडून ५ जबरदस्त उपाय, ब्लड शुगरचा आकडा जरा पण वाढणार नाही)​

वर्क आऊट किती महत्वाचा

वर्क आऊट किती महत्वाचा

शिव ठाकरे सांगतो की, बिग बॉसच्या संपूर्ण प्रवासात माझा वर्कआऊट सुरूच होता. म्हणजे डाएट फॉलो करता आलं नाही तरी मी वर्कआऊट करायचो. पण सर्वात महत्वाचं होतं की, बिग बॉस हा माझ्या स्वप्नांचा प्रवास होता. त्यामुळे मी त्याकडे जास्त लक्ष दिलं. शरीर काय आपण सांभाळू शकतोच. आता आपलं वजन कमी झाल्याची खंत शिव व्यक्त करतो. पण या प्रवासाने बरंच काही दिल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …