IPL 2022, LSG vs CSK Match Live Updates :  लखनौ आणि चेन्नई यांच्यातील सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

IPL 2022,  LSG vs CSK : आयपीएलच्या 15 व्या हंगमाताली  पहिल्या विजयासाठी लखनौ आणि चेन्नईचा संघ मैदानावर उतरणार आहेत. यंदाच्या हंगमातील पहिल्या सामन्यात दोन्ही संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे दोन्ही संघ विजयाच्या इराद्याने मैदानावर उतरणार आहेत. चेन्नई सुपरकिंग्सला पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) तर लखनौला गुजरात टायटन्सने (GT) मात दिली आहे.  चेन्नईचं रविंद्र जाडेजा तर लखनौचं के. एल. राहुल नेतृत्व करत आहे. 

आयपीएलमध्ये गुरुवारी होणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्स आणि लखनौ सुपरजायंट्स या दोन्ही संघाचा विचार करता दोघांकडे तगड्या खेळाडूंचा भरणा आहे. पण पहिल्या सामन्यात दोन्ही संघाचे काही खेळाडू अनुपस्थित असल्याने फटका बसला होता.  दोन्ही संघात काही खेळाडू आले आहेत. त्यामुळे प्लेईंग 11 मध्येही बदल दिसण्याची शक्यता आहे. 

कसा आहे लखनौ संघ ? –
केएल राहुल (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, रवी बिश्नोई, क्विंटन डी कॉक, मनीष पांडे, जेसन होल्डर, दीपक हुडा, क्रुणाल पांड्या, आवेश खान, अंकित राजपूत, कृष्णप्पा गौतम, दुष्मंता चमीरा, शाहबाज नदीम, मनन वोहरा, मनन खान, आयुष बधोनी, काइल मायर्स, कर्ण शर्मा, एविन लुईस, मयंक यादव आणि बी साई सुदर्शन.

हेही वाचा :  IPL 2023 Mini Auction : खेळाडूंना रिलीज केल्यानंतर कोणत्या संघाकडे किती पैसे शिल्लक? 

चेन्नई सुपर किंग्सचे शिलेदार –
रवींद्र जाडेजा (16 कोटी), महेंद्रसिंग धोनी (12 कोटी), मोईन अली (8 कोटी), ऋतुराज गायकवाड (6 कोटी), रॉबिन उथाप्पा (2 कोटी), ड्वेन ब्राव्हो (4.40 कोटी), अंबाती रायुडू (6.75 कोटी), दीपक चहर (14 कोटी), शिवम दुबे (4 कोटी), महिश तिक्षाना (70 लाख), सिमरनजीतसिंग (20 लाख), डेवॉन कॉनवे (1 कोटी), ड्वेन प्रिटोरियस (50 लाख), मिचेल सॅन्टनर (1.90 कोटी), अडम मिल्न (1.90 कोटी), केएम आसिफ (20 लाख), तुषार देशपांडे (20 लाख). शुभ्रांशु सेनापती (20 लाख), मुकेश चौधरी (20 लाख), प्रशांत सोळंकी (1.20 कोटी) ,ख्रिस जॉर्डन (3.60 कोटी), एन जगदीशन (20 लाख), सी. हरी निशांत(20 लाख), भगत वर्मा(20 लाख), राजवर्धन हंगरगेकर (1.50 कोटी)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …