दीपिका चिखलिया यांना नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले…

Dipika Chikhlia: रामायण या छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिकेमध्ये सीता ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया (Dipika Chikhlia) या सोशल मीडियावर सक्रिय असतात. दीपिका यांनी नुकताच एक खास व्हिजीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये दीपिका या ‘ओ मेरे शोना रे’  या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. दीपिका यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.  

दीपिका चिखलिया यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्या ‘ओ मेरे शोना रे’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. या व्हिडीओला दीपिका यांनी कॅप्शन दिलं, ‘आयुष्य हे एका गाण्यासारखं आहे. ते गाणं गायचं आणि त्यावर डान्स करायचा.’ व्हिडीओमध्ये दीपिका या नाकात नथ, पिवळा ड्रेस आणि गोल्डन इरिंग्स आशा लूकमध्ये दिसत आहेत.  दीपिका यांच्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले. 

नेटकऱ्यांच्या कमेंट्स: 

दीपिका चिखलिया यांनी शेअर केलेल्या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एक नेटकऱ्यानं कमेंट केली, ‘जसं तुमचं वय वाढत आहे, तशी तुमची प्रतिमा का बदलत आहे?’, तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, ‘दिपका जी, प्रत्येकाला तुमच्यात माता सीतेचे रूप दिसते. तुम्ही हे करू नका.’ 

हेही वाचा :  श्रीदेवीसोबत काम करायचे नव्हते, अनिल कपूरने ‘जुदाई’साठी दिला होता नकार! वाचा किस्सा...

live reels News Reels

पाहा व्हिडीओ: 


रामायण मालिकेबरोबरच दीपिका यांनी रुपये दस करोड, घर का चिराग आणि खुदाई या चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे.   

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Adipurush Controversy: ‘पात्र जर श्रीलंकेचं असेल, तर ते मुघलांसारखं दिसता कामा नये!’; ‘आदिपुरुष’च्या टीझरवर दीपिका चिखलिया यांची प्रतिक्रिया



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …