Artificial Intelligence म्हणजे काय रे भाऊ? भविष्यातील संकट की नव्या युगाची क्रांती? वाचा स्पेशल रिपोर्ट

Artificial Intelligence: २१वं शतक हे माहिती-तंत्रज्ञानाचं युग मानलं जातं. मात्र, या शतकाची ही ओळख पहिल्या दोन दशकांनंतर आता बदलावी लागेल असं दिसतंय. कारण, सरळसोट आज्ञावली अर्थात प्रोग्रॅमवर चालणाऱ्या सॉफ्टवेअरच्या पलिकडे आता आलीये कृत्रिम प्रज्ञा अर्थात आर्टिफिशियल इंटलिजन्स! माणसाशी संवाद करत , स्वत:त बदल घडवत साध्या उत्तरापासून ते निबंध लिहिणं, चित्र बनवणं, संगीत निर्माण करणं अशा एक ना अनेक सामर्थ्यानिशी आपलं जगणं व्यापणार आहे AI…ज्याचा चॅट जीपीटी हा आविष्कार प्रसिद्ध झालाय. पाहुयात, त्यावरचा हा डीएनए रिपोर्ट….

एकेकाळी कॉम्प्युटर जेंव्हा नुकतेच शाळेत, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट किंवा कंपन्यांमध्ये हाताळायला मिळत होते, कॉम्प्युटरचा बोलबाला होता, कॉम्प्युटर म्हणजे भारीच त्याला कमांड देता येतात, हवी ती माहिती घेता येते असे काहीही समज होते ….त्याकाळी, नव्यानंच संगणक वापरणारे डॉसच्या या अशा इंटरफेसमध्ये काय वाट्टेल ते विचारत, आणि बिचारा संगणक मात्र unrecognised command म्हणत नकार घंटा वाजवे. कारण, त्याकाळी आणि अगदी आजही संगणक डेटा प्रोसेसिंग म्हणजे दिलेल्या माहितीवर प्रक्रिया करण्यासाठीच वापरला जातो. मात्र, तंत्रज्ञानातील वेगवान बदलानंतर संगणक बदलू लागला, फक्त माहिती प्रक्रिया करण्यापलिकडे तो माहितीचा वापर करून विकसित प्रक्रिया करू लागला… आणि याला कारणीभूत ठरली माणसानं त्यात टाकलेली… कृत्रिम प्रज्ञा!

हेही वाचा :  Google ला टक्कर देणारा Chat GPT उडवतोय हिंदू देवतांची खिल्ली?

1968ची स्टॅनले क्युब्रिकची २००१- ए स्पेस ओडिसी असो, टर्मिनेटर, मेट्रिक्स, आय-रोबोट असे हॉलिवूडपट असो किंवा अगदी आपल्या रजनिकांतचा रोबोट असो …. मानवासारखीच बुद्धी प्राप्त झालेली मशिन्स हा अनेक कादंबऱ्या-फिल्म्सचा विषय झाला. मात्र, मानवानं कल्पना केलेली अशी प्रणाली प्रत्यक्षात येतेय…चॅट जीपीट हे त्याचं सध्याचं प्रसिद्ध स्वरूप…..संगणकीय आज्ञावल्यांचा उन्नत, व्यापक आणि अधिक प्रभावी आविष्कार म्हणजे ai…याचंच व्यावसायिक उत्पादन म्हणजे चॅट जीपीटी…ओपन AI या कंपनीनं बनवलेला हा प्लॅटफॉर्म आता नेक्स्ट गुगल मानला जातोय. पिझ्झाच्या रेसिपीपासून ते शास्त्रीय प्रबंधापर्यंत अशा प्रचंड व्याप्तीत चॅट जीपीटी तुम्हाला प्रतिसाद देऊ शकतो.

चॅट जीपीटीची उपयोगिता इतकी प्रभावी ठरली की ओपन AIनं चॅट जीपीटी जगासमोर आणताच पहिल्या ५ दिवसातच १० लाखांहून अधिक युजर्स या प्रणालीला मिळाले. पुढच्या दोनच महिन्यात म्हणजे जानेवारीत तर ही संख्या १० कोटींपेक्षा जास्त झाली. 

मात्र, अन्य सॉफ्टवेअर प्रोग्रॅम आणि चॅट जीपीटी यात फरक काय, चॅट जीपीटी कसं काम करतं…या प्रश्नातच दडलंय AI च्या कामाची पद्धती…

चॅट जीपीटी तीच्या आताच्या प्राथमिक अवस्थेत इतकी प्रभावी असेल तर तीची पुढची व्हर्जन्स कशी असतील याची चुणूकच सध्या दिसते. चॅट जीपीटीमागील कंपनी ओपन AIचा एक संस्थापक, ट्विटरचा मालक एलन मस्कनं तर या प्रणालीला डेंजरस म्हटलंय. होमो देऊससह अनेक गाजलेल्या पुस्तकांचा लेखक, व्य़ाख्याता युवल नोआ हरारी यानंही AIला फार शहाणं होऊ देऊ नका, असा इशारा दिलाय.

हेही वाचा :  तुमच्या घरातला Wifi स्लो चालतोय, मग 'ही' ट्रिक्स वापरून पाहा

चॅट जीपीटीचा सध्या बोलबाला असला तरी ए-आयचा वापर करून बनवलेली ही काही एकमेव प्रणाली नाही. २०१६मध्ये मायक्रोसॉफ्टनं अशाच प्रकारचा ए-आय बॉट बनवला होता. अलिकडेच, मेटा कंपनीनं २०२२च्या ऑगस्टमध्ये ब्लेंडर बॉटची निर्मिती केली होती.

गुगलनंही जनरेटिव्ह ए-आयच्या क्षेत्रात बार्ड या प्लॅटफॉर्मची निर्मिती करत पाऊल ठेवलंय. मात्र, चॅट-जीपीटीचं यश यापैकी कुणाच्याही वाट्याला आलेलं नाही.

आजकाल ए-आय आधारीत अनेक अप्लिकेशन्स सहज उपलब्ध होतायत. शेअर खरेदी-विक्री स्वचलित करणं, फोटो, व्हिडिओमध्ये बदल करणं, दिलेल्या सूचनांनुसार काल्पनिक चित्र, मजकूर तयार करणं, सोशल मीडिया व्यवस्थापन, इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि ए-आय या माध्यमातून भविष्यात आजघडीच्या अनेक प्रक्रिया, नोकऱ्या हद्दपार तरी होतील किंवा पूर्ण बदलतील, नव्या निर्माण होतील असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Bajaj ची दमदार Pulsar NS400 लाँचिंगच्या तयारीत, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Bajaj Pulsar NS400: भारतीय बाजारपेठेत दुचाकींमध्ये पल्सरची एक वेगळी ओळख आणि दबदबा आहे. आजही लोक …

Pixel पासून iPhone 14 पर्यंत; घसघशीत सवलतीसह खरेदी करा बेस्ट स्मार्टफोन

Smartpone On Lowest Price In Flipkart Amazon : येत्या काही दिवसांमध्ये तुम्हीही स्मार्टफोन, चांगला आणि …