मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

सुप्रिया सुळे म्हणतात, ‘मिर्झापूर प्रचंड आवडली अन् कालिनभैय्याला थेट फोनच लावला’; पंकज त्रिपाठी म्हणाला, ‘मी बारामतीला…’

Supriya Sule Mirzapur Web Series : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी त्यांना अलिकडे आवडलेल्या वेबसीरिजबद्दल माहिती दिली आहे.  एका youtuber ला दिलेल्या मुलाखतीत सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, मिर्झापूर (Mirzapur Web Series) माझी अलिकडच्या काळातील सर्वात आवडलेली. मी ही सिरीज पाहिल्यानंतर कालिन भैय्या पंकज त्रिपाठींना (Pankaj Tripathi) फोन केला. मला अनुप्रिया पटेलनं त्यांचा नंबर दिला. मी त्यांची फॅन असल्याचं सांगितलं. कालिन भैय्याचं पात्र मला खूप आवडलं असल्याचं मी त्यांना सांगितलं. मला पंकज त्रिपाठींनी सांगितलं की, मी बारामती, सातारा, फलटण या भागात फिरलो आहे.  आम्ही खूप वेळ बोललो, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. अमर अकबर अॅंथोनी ही देखील आवडती फिल्म असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

हेही वाचा :  Tunisha Sharma Death : प्रेग्नंट होती तुनिषा शर्मा; 'या' अभिनेत्रीचा दावा

Marathi Movies : मराठी सिनेसृष्टी पुन्हा बहरली! ‘वेड’ अन् ‘वाळवी’वर उमटली प्रेक्षकांच्या पसंतीची मोहोर…

Ved Vaalvi Marathi Movies In Theater : बॉक्स ऑफिसवर (Box Office) सध्या ‘वेड’ (Ved) आणि ‘वाळवी’ (Vaalvi) हे दोन सिनेमे धुमाकूळ घालत आहेत. कोरोनानंतर दोन मराठी सिनेमे बॉक्स ऑफिस गाजवण्याची ही पहिलीच वेळ आहे. दोन्ही सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यासोबत कमाईच्या बाबतीतदेखील उजवे ठरले आहेत.रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुखचा (Genelia Deshmukh) ‘वेड’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येऊन चार आठवडे झाले असून या सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. आतापर्यंत या सिनेमाने 55.22 कोटींची कमाई केली आहे. तर दुसरीकडे स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) आणि सुबोध भावेच्या (Subodh Bhave) ‘वाळवी’लादेखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

KL Rahul Athiya Shetty Wedding : केएल राहुल आणि अथिया शेट्टीचं शुभमंगल सावधान, खंडाळ्यातील फार्महाऊसवर पार पडला विवाह सोहळा

KL Rahul Athiya Shetty Wedding : बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) अखेर लग्नबंधनात अडकले आहेत. सुनील शेट्टीच्या (Suniel Shetty) खंडाळ्यातील फार्महाऊसवर दाक्षिणात्य पद्धतीने त्यांनी लग्न केलं आहे. 

हेही वाचा :  Prabhas Wedding : ‘डार्लिंग’ प्रभास अजूनही अविवाहित का? पाहा काय म्हणाला ‘बाहुबली’...

100 पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार!

अथिया आणि केएल राहुल (KL Rahul Athiya Shetty Wedding) फक्त 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकले आहेत. यात बॉलिवूड आणि क्रिकेटविश्वातील अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. लग्नानंतर केएल आणि अथियाने मनोरंजन आणि क्रिकेटविश्वातील मंडळींसाठी खास भव्य रिसेप्शनचं आयोजन केलं आहे. यात रिसेप्शनला अनेक उद्योगपती आणि राजकारणीदेखील उपस्थित राहणार आहेत.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …