Mahindra Thar Booking: Thar 4X4 पेक्षाही अधिक Popular झाली ही कार; लॉन्च होताच Waiting Period दीड वर्षांवर

Mahindra Thar RWD Waiting Period: महिंद्राने सन 2020 मध्ये आपली थार एसयूव्हीचं (Mahindra Thar SUV) नवं व्हर्जन लॉन्च केलं होतं. लॉन्चिंगनंतर या गाडीला उत्तम प्रतिसाद मिळाला. थार आपल्या 4X4 फिचरमुळे तरुणांच्या आवडत्या गाड्यांपैकी एक असून लाइफस्टाइल कार्सच्या श्रेणीमध्ये अव्वल दर्जाची कार आहे. कंपनीने या गाडीचं RWD (रियर व्हील ड्राइव्ह) व्हर्जन लॉन्च केलं असून या नव्या व्हर्जनची किंमत फारच कमी आहे.

दोन पर्याय उपलब्ध

महिंद्रा थारचं हे नवं व्हर्जन बाजारामध्ये लॉन्च झाल्यानंतर त्याला तुफान प्रतिसाद मिळत आहे. या गाडीचं RWD (रियर व्हील ड्राइव्ह) व्हर्जनला आधीच्या मूळ व्हर्जनपेक्षा अधिक प्रतिसाद मिळत आहे. नवी थार एसयूव्हीमध्ये पेट्रोल आणि डिझेल इंजिनच्या पर्यायसहीत उपलब्ध आहे. ही गाडी थ्री ट्रिम लेव्हलमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. 

जुलै 2024 पर्यंत पहावी लागणार वाट

मीडिया रिपोर्ट्सनुसार थार RWD डिझेल व्हर्जनचं वेटिंग पीरिएड जवळजवळ 16 ते 18 महिने आहे. मात्र या गाडीच्या पेट्रोल व्हर्जनचं वेटिंग 3 महिन्यांचं आहे. तुम्ही सुद्धा ही नवी थार विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला वेटिंग पिरिएडचा विचार करावा लागेल. कारण डिझेल व्हर्जन तुम्ही आज बूक केल्यास ती जुलै 2024 ला मिळेल. 

हेही वाचा :  ​GB WhatsApp म्हणजे नक्की काय? काय आहे याचा वापर? कसं कराल डाऊनलोड? सर्व माहिती एका क्लिकवर

दोन इंजिन…

Mahindra Thar RWD मध्ये दोन इंजिन ऑप्शन देण्यात आला आहे. पहिलं इंजिन हे 1.5 लीटर डिझेल (117bhp आणि 300 Nm) इंजिन आहे. हे महिंद्राच्या एक्सयूव्ही 300 मध्ये वापरण्यात आलं आहे. यामध्ये मॅन्युअल ट्रान्समिशनसहीत उपलब्ध आहे. हे इंजिन थारच्या सर्वात स्वस्त व्हेरिएंटमध्ये मिळणार आहे. तर दुसरं इंजिन हे 2.0 लीटर TGDI पेट्रोल (150bhp आणि 320 Nm)  इंजिन आहे. दुसरा पर्याय ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध आहे. 

व्हेरिएंट कोणते आणि किंमत किती हे पाहूयात

AX(O) RWD Diesel MT – 9.99 लाख रुपये
LX RWD – Diesel MT – 10.99 लाख रुपये
LX RWD – Petrol AT – 13.49 लाख रुपये



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Bajaj ची दमदार Pulsar NS400 लाँचिंगच्या तयारीत, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Bajaj Pulsar NS400: भारतीय बाजारपेठेत दुचाकींमध्ये पल्सरची एक वेगळी ओळख आणि दबदबा आहे. आजही लोक …

Pixel पासून iPhone 14 पर्यंत; घसघशीत सवलतीसह खरेदी करा बेस्ट स्मार्टफोन

Smartpone On Lowest Price In Flipkart Amazon : येत्या काही दिवसांमध्ये तुम्हीही स्मार्टफोन, चांगला आणि …