पावसाळ्यात तुमचे केसही खूप गळतात? मग ‘या’ टिप्स करा फॉलो

Hair Fall in Monsoon : आता पावसाळा आला आहे. पावसाळ्यात आपण सगळ्याच गोष्टीची खूप काळजी घेतो कारण या वातावरणात खूप लवकर आजार पसरतात. इतकंच नाही तर या काळात आपण त्वचेवर आणि केसांवर खास लक्ष देणं महत्त्वाचं असतं. कारण या काळात केस गळण्याची समस्या उद्भवते. अनेकांना ही समस्या खूप जास्त प्रमाणात होते की केस विरळ होतात. कारण असं म्हटलं जातं की पावसाळ्यात केस खूप जास्त गळतात. तज्ञ्यांच्या मते पावसाळ्यात खूप घास येतो आणि दमट वातावरणामुळे केस गळण्याची समस्या उद्भवते. अशात काय करायला हवं हे जाणून घेऊया…

हेअर केअर रुटिन
तुम्हाला जर तुमचे केस जसे आहेत तसे रहावे अशी इच्छा असेल तर त्यांच्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. कंटाळ करणं किंवा दुर्लक्ष केल्यानं केस गळण्याची समस्या वाढू शकते. त्यासाठी एक रुटिन फॉलो करा. 

 पावसात चुकून भिजलात की लगेच शॅम्पू करा
पावसाळ्यात जर तुम्ही चुकून भिजलात तर शॅम्पू करा. पावसाच्या पाण्यात केमिकल असतात आणि ते आपल्या शरिरासाठी योग्य नाही. 

पाण्यात असलेल्या केमिकलनं होते केस गळण्याची समस्या
पाऊस पडतो त्या पाण्यात खूप केमिकल असतात त्याचं कारण प्रदुषण आहे. तेच पाणी जर केसात बराच वेळ राहिल तर त्यानं स्कॅल्प आणि केस दोन्ही ड्राय होतात.

हेही वाचा :  बीडमध्ये कोट्यवधींचा GRB घोटाळा, 2 हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक

केस धुताना कोमट पाणी वापरा
कोमट पाण्यानं केस धुवा जेणे करून केसात असलेला चिकटपणा निघून जाईल. 

केस स्ट्रेटनिंग करणे टाळा
जर तुम्ही केस स्ट्रेटनिंग करण्यासाठी सतत स्ट्रेटनरचा वापर करत असाल तर ते टाळा. त्यामुळे केस कमकुवत होतात आणि केस गळण्याची समस्या वाढू शकते. 

पावसाळ्यात घराबाहेर पडण्यापूर्वी घ्या ही काळजी

ओले केस बांधणे टाळा
ओले किंवा ओलसर असताना केस बांधणे टाळा. ओले केस तुटण्याची अधिक शक्यता असते आणि ते घट्ट बांधल्याने केस गळण्यास सुरुवात होते. केस बांधण्यापूर्वी ते पूर्णपणे कोरडे करण्यास विसरू नका. 

मोठ्या दातांचा कंगवा वापरा
तुमच्या केसातला गुंता काढण्यासाठी मोठ्या दातांचा कंगवा वापरा. ओले केस नाजूक असतात आणि तुटण्याची अधिक शक्यता असते, म्हणून केस ओले असताना तुम्ही केस विंचरू नका.

संतुलित आहार घ्या
तुमच्या केसांचे आरोग्य राखण्यासाठी फक्त वेगवेगळे प्रोडक्ट्स वापरू नका तर त्यासाठी योग्य आहार असणे पण गरजेचे आहे. त्यामुळे तुमच्या आहारात फळे, भाज्या, अंडी आणि काजू यांसारख्या जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रथिने समृध्द पदार्थांचा समावेश करा. 

हेही वाचा : Monsoon: पावसाळ्याच्या आनंद घेण्यासाठी ‘या’ औषधी वनस्पतींचे करा सेवन, होणार नाही कोणताच त्रास

हेही वाचा :  Valentine’s Day 2022: व्हॅलेंटाईन डे चे हे Messages, WhatsApp Status पाठवून तुमच्या जोडीदाराला करा इम्प्रेस!

हायड्रेटेड रहा
केसांच्या आरोग्यासाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. हे तुमचे केस आणि टाळू हायड्रेटेड ठेवते, कोरडेपणा होऊन केस गळण्याची समस्या उद्भवते. दररोज किमान 8 ग्लास पाणी प्या.

स्ट्रेस कमी घ्या
जास्त स्ट्रेस घेतल्यानं देखील केस गळती होती. व्यायाम, योगा करा. त्यानं केस गळण्याची समस्या दूर होईल. 

केस नियमित ट्रिम  करा 
तुमचे केस नियमितपणे ट्रिम केल्याने स्प्लिट एंड्सपासून सुटका होते. अशात निरोगी केस ठेवण्यासाठी दर 6-8 आठवड्यांनी नियमित केस ट्रिम करा.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …