Chandrayaan 3 च्या लँडिंगपूर्वी ISRO नं शेअर केला 42 सेकंदांचा नवा व्हिडीओ

Chandrayaan-3 Live Updates: भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’नं जुलै महिन्यात चांद्रयान अवकाशात पाठवलं आणि त्या क्षणापासून या चांद्रयानावरच सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. सध्या चांद्रयान चंद्राच्या पृष्ठापासून काही अंतरच दूर असून अवघ्या काही तासांनी ते चंद्रावर पोहोचणार आहे. तत्पूर्वी इस्रो चांद्रयान 3 च्या लहानमोठ्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मोहिम अंतिम टप्प्यात असतानाच इस्रोनं एक व्हिडीओही ट्विट केला आहे. 

सोशल मीजियावर अवघ्या 42 सेकंदांचा व्हिडीओ ट्विट करत इस्रोनं ही मोहीम निर्धारित वेळेतच पार पडत असल्याचं सांगितलं. सध्या मोहिमेशी संबंधित यंत्रणा नियमित चाचण्या पार करत आहे. शिवाय कोणत्याही व्यत्ययाशिवाय चांद्रयानाचा प्रवासही सुरु आहे. मिशन ऑपरेशंस कॉम्प्लेक्स (MOX) मध्ये पुरेशी उर्जा असून, मोहिमेसाठीचा उत्साहसुद्धा आहे. मोहिमेसंदर्भातील महत्त्वाची माहिती शेअर करताना इस्रोनं त्याचं थेट प्रक्षेपण भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी सायंकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी सुरु होणार असल्याचं सांगितलं. 

यावेळी इस्रोकडून Lander Position Detection Camera (LPDC)तून टीपण्यात आलेली चंद्राची काही छायाचित्रसुद्धा शेअर केली. या कॅमेरामुळं लँडरला चंद्राच्या पृष्ठावर उतरण्यास मोठी मदत होणार आहे. 

सध्या कुठे आहेत लँडर आणि रोवर? 

खगोलशास्त्रज्ञ प्रोफेसर आर.सी. कपूर यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना लँडर आणि रोवर चंद्राच्या प्री लँडिंग कक्षेत परिक्रमण करत असल्याची माहिती दिली. यावेळी इस्रोनं मागील मोहिमेत आलेल्या अपयशातून धडा घेत लँडर आणि रोवरला परिस्थितीला अनुसरूनच तयार केलं असून, लेग मॅकेनिजमवरही अधिक भर दिला आहे. 

हेही वाचा :  Gold Price : सोन्याचे रेकॉर्डवर रेकॉर्ड ब्रेक! 10 ग्रॅमची किंमत ऐकून तुम्हाला बसेल धक्का, पाहा तुमच्या शहरातील दर

चांद्रयानाच्या सॉफ्ट लँडिंगचीच इतकी चर्चा का सुरुये? 

चांद्रयान 3 नं चंद्राच्या रोखानंप्रवास सुरु केल्याक्षणीच चर्चा सुरु झाली ती म्हणजे त्याच्या लँडिंगची. पण, या लँडिंगलाच इतकं महत्त्वं का? सोप्या भाषेत सांगावं तर, एखादं अंतराळयान जेव्हा कोणत्या ग्रहावर उतरवलं जातं तेव्हा त्याचं कोणत्याही प्रकारे नुकसान न होणं या संपूर्ण परिस्थितीला Soft  Landing म्हणून संबोधलं जातं. याविरुद्ध वापरात येणारी आणखी एक संज्ञा आहे, जिथं यानातील उपकरणांमध्ये बिघाड होण्याचा धोका संभवतो. संपूर्ण मोहिमही यामुळं अपयशी ठरू शकते. त्यामुळंच चांद्रयान 3 चं सॉफ्ट लँडिंगही सर्वतोपरी महत्त्वाचं आहे. 

 

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …