आता इंटरनेट नसतानाही पाठवता येतील पैसे, RBI ने लाँच केली ‘ही’ खास सुविधा; जाणून घ्या संपूर्ण माहिती

नवी दिल्ली : सध्या Digital Payment चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यासाठी Google Pay, PhonePe, Paytm सारख्या अ‍ॅप्सचा वापर केला जातो. हे अ‍ॅप्स वापरण्यासाठी इंटरनेट आणि स्मार्टफोन असणे गरजेचे आहे. परंतु, तुमच्याकडे स्मार्टफोन आणि इंटरनेट नसतानाही आता पेमेंट करणे शक्य आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) घोषणा केली आहे की, फीचर फोन यूजर्स देखील यूपीआयचा वापर करून पेमेंट करू शकतील. फीचर फोन यूजर्ससाठी आरबीआयने यूपीआय आधारित पेमेंट्स प्रोडक्ट्स आणले आहे. आरबीआयने UPI आधारित 123Pay ही सुविधा फीचर फोन यूजर्ससाठी लाँच केली आहे. UPI123Pay सुविधेच्या माध्यमातून फीचर फोन यूजर्स स्मार्टफोन यूजर्सप्रमाणेच डिजिटल पेमेंट करू शकतील.

वाचा: गर्मीपासून होईल सुटका, फक्त ४३९ रुपये सुरुवाती किंमतीत घरी आणा ‘हा’ पोर्टेबल AC; पाहा डिटेल्स

या सुविधेच्या माध्यमातून यूजर्सला छोटी रक्कम सहज पाठवता येईल. आरबीआयने डिजिटल पेमेंट्ससाठी २४x७ हेल्फलाइन डिजीसाथीला देखील लाँच केले आहे. या हेल्पलाइनद्वारे यूजर्सला शिक्षित व जागरुक केले जाईल. स्मार्टफोनच्या तुलनेत फीचर फोनमध्ये कमी फीचर्स मिळतात. फीचर फोनचा प्रामुख्याने वापर कॉल आणि टेक्स्ट मेसेजसाठी केला जातो. परंतु, आता फीचर फोन यूजर्स विना इंटरनेट डिजिटल पेमेंट करू शकतील. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, फीचर फोन यूजर्ससाठी डिजिटल पेमेंट सुविधा उपलब्ध करणे खूपच महत्त्वाचे आहे. फीचर फोन यूजर्स एसएमएसच्या माध्यमातून पेमेंट करू शकतील व यासाठी इंटरनेट कनेक्शनची देखील गरज नाही.

हेही वाचा :  मोठी बातमी! बँक परवाना रद्द झाल्यानंतर सरकार देतंय 8516 कोटी रुपये, कसं ते जाणून घ्या

भारतामध्ये जवळपास ११८ कोटी यूजर्सचा एका मोठा मोबाइल फोन कंझ्यूमर बेस आहे. यातील बहुतांश यूजर्स आजही फीचर फोनचा वापर करतात. रिपोर्टनुसार, जुलै २०२१ पर्यंत जवळपास ७४ कोटी यूजर्सकडे स्मार्टफोन होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच *99# सेवा सर्व मोबाइल यूजर्ससाठी सुरू करण्यात आली आहे. ही सुविधा स्मार्टफोन आणि फीचर फोनच्या सर्व मॉडेल्सला सपोर्ट करते. तसेच, UPI द्वारे पेमेंट करण्यासाठी फोन नंबर बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे. या सुविधेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही इंटरनेट कनेक्शन नसतानाही फीचर फोनवरून देखील ऑनलाइन पेमेंट करू शकता.

वाचा: दमदार फीचर्ससह येणाऱ्या Dizo च्या ‘या’ स्वस्तात मस्त स्मार्टवॉचचा आज पहिला सेल, किंमत फक्त…

वाचा: फक्त ६ हजार रुपयात घरी घेवून जा Samsung चा ‘हा’ शानदार स्मार्ट टीव्ही, मिळतील जबरदस्त फीचर्स; पाहा ऑफर्स

वाचा: निम्म्या किंमतीत मिळेल स्मार्टफोन, स्मार्टवॉचसह अनेक प्रोडक्ट्स, सुरू होतोय ‘हा’ खास सेल; पाहा डिटेल्स

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महारेराचा बिल्डर लॉबीला दणका; पार्किंचा वाद टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

MAHARERA: बिल्डिंगमध्ये अपुऱ्या जागेच्या अभावी पार्किंग करण्यास अडचणी येतात. हल्ली काही बिल्डर घर खरेदी केल्यानंतरच …

Viral Video : बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडणाऱ्या तरुणाकडून शेवटच्या दिवशी ढोलताशे वाजवत कंपनीला निरोप

Pune Job News : सरकारी नोकरीवर (Government Jobs) असणाऱ्या अनेकांचाच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना हेवा …