Mobile Phone Tips : मोबाईल हरवल्यास सर्वात आधी करावं हे काम; नाही तर बँक खाते होईल रिकामं

मुंबई : आजच्या काळात स्मार्टफोन हा आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनला आहे. फोनशिवाय काही काळ जगणे कठीण होऊन बसते. आजकाल लोक अनेक वैयक्तिक गोष्टी आणि कागदपत्रे मोबाईलमध्ये जतन करून ठेवतात. यासोबतच मोबाइल बँकिंग आणि बँक खात्याशी संबंधित तपशीलही मोबाइलमध्ये सेव करीत असतो.

अशा परिस्थितीत तुमचा मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला तर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता. कारण स्मार्टफोनमध्ये असलेल्या बँक डिटेल्सचा वापर करून चोर तुमच्यासोबत फसवणूक करू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही तुमचा मोबाईल हरवल्यास होणारी फसवणूक टाळू शकता.

सिम कार्ड त्वरित ब्लॉक करा

स्मार्टफोन हरवल्यानंतर किंवा चोरीला गेल्यावर, तुम्हाला सर्वप्रथम तुमचे सिम कार्ड ब्लॉक करा. जेणेकरून फोन चुकीच्या हातात गेला असेल आणि तुमच्या बँक तपशीलाशी छेडछाड केली जात असेल, तर सिमवरील ओटीपी पोहोचणार नाही. नंतर, तुम्ही तोच नंबर नवीन सिममध्ये सक्रिय करू शकता. टेलिकॉम कंपनीच्या कस्टमर केअरला फोन करून तुम्ही हे काम पूर्ण करू शकता.

हेही वाचा :  Used Electric Devices: घरात जुन्या इलेक्ट्रिक वस्तू ठेवल्याने होऊ शकतं नुकसान, आजच करा टाटा-बाय बाय

मोबाइल बँकिंग ब्लॉक करा

लॅपटॉप किंवा इतर कोणत्याही फोनच्या मदतीने तुम्ही तुमची बँक खाती ब्लॉक करा. जेणेकरून कोणीही तुमच्या खात्याचा गैरवापर करू शकणार नाही. आपण बँकेला कॉल करून देखील खाते बंद करू शकता.

मोबाइल वॉलेटचा एक्सेस देखील ब्लॉक करा

फोन चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास बँक खात्यात तसेच मोबाईल वॉलेटमधील एक्सेस ब्लॉक करा. कारण तुम्ही ते अनेक ठिकाणी पेमेंटसाठी वापरता त्याचा चोर गैरवापर करू शकतात.

CEIR पोर्टलवरून फोन ब्लॉक करा

याशिवाय, तुम्ही सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (CEIR) पोर्टलद्वारे चोरीला गेलेला किंवा हरवलेला मोबाइल ब्लॉक करू शकता. यासोबतच त्याच्या मदतीने फोन ट्रॅकही करता येतो.

पोलिस स्टेशनला तक्रार करा

जर तुमचा मोबाईल चोरीला गेला असेल किंवा कुठेतरी हरवला असेल तर तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनला कळवा. जेणेकरून कोणी त्याचा गैरवापर करत असेल तर तुमचे नुकसान होणार नाही.Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Safest SUV Cars in India: भारतामधील सर्वात सुरक्षित SUV Cars ची यादी पाहिली का? सर्वाधिक विकली जाणारी Car ही यादीत

Global NCAP Rating Top 5 Safest SUVs: कोणतीही वस्तू विकत घेताना ती नेमकी किती सुरक्षित आहे …

PAN Aadhaar Linking Status : पॅन-आधार कार्ड लिंकची डेडलाइन, घरी बसून असं चेक करा स्टेट्स

नवी दिल्लीःPAN Aadhaar Linking Status: पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्याची डेडलाइन जवळ आली आहे. …