Royal Enfield ची सर्वात स्वस्त बाईक; आता कमी बजेटमध्येही तुम्हाला परवडणार

Royal Enfield ची सर्वात स्वस्त बाईक; आता कमी बजेटमध्येही तुम्हाला परवडणार

Royal Enfield ची सर्वात स्वस्त बाईक; आता कमी बजेटमध्येही तुम्हाला परवडणार

मुंबई : Royal enfield या कंपनीची बाईक रस्त्यावरून जात असताना त्याचा होणारा आवाज आणि ती बाईक चालवताना झळकणारा रुबाब हे सारंकाही बऱ्याच बाईकप्रेमींना हवंहवंसं वाटणारं. 

सध्याच्या घडीला एनफिल्डला मिळणारी लोकप्रियता कमी झाली नसली, तरीही या बाईकला टक्कर देण्यासाठी बजाज आणि ट्रायम्फ यांनी काबी नव्या बाईक बाजारात आणण्याची तयारी सुरु केली आहे. (Royal Enfield )

हे पाहता आता एनफिल्डनंही 4-5 नव्या बाईकचं अनावरण करण्याचं ठरवलं आहे. 

हंटर 350 ही त्यापैकीच एक असून, मीटिओर 350 प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात येत आहे. 

ही नवी मोटरसायकल मीटिओर 350 प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात येत आहे.  एनफिल्डची हंटर 350 बी जे प्लॅटफॉमवर साकारली जाईल. यामघ्ये 349 सीसी इंजिन, 22 बीएपची पॉवर आणि 27 पीक टॉर्क तयार करेल. 

यासोबत कंपनीकडून 5 स्पीड गिअरबॉक्स देण्यात येईल, असं म्हटलं जात आहे, की या नव्या मोटरसायकलचं वजनही तुलनेने कमी असेल. 

सेमी डिजिटल कंसोल आणि ट्रिपर नॅव्हिगेशन सिस्टममुळं ही बाईक आणखी लक्षवेधी ठरत आहे. 

असंही म्हटलं जात आहे की, हंटर 350 ही या विभागातील सर्वात स्वस्त दरातील बाईक असेल. पण, यामध्ये एलईडी डीआरएल आणि ब्लिंकर्स दिले न जाण्याचीही शक्यता आहे. 

हेही वाचा :  आता कार्ड, UPIची कटकट सोडा, हात दाखवूनही होईल पेमेंट, कसं ते पाहा!

भारतात या बाईकला CB350RS, जावा स्टँडर्ड 300, जावा फोर्टी टू आणि बेनेली इंपीरियाले यांची टक्कर असणार आहे. अंदाजे या बाईकसाठी एक्स शोरूम किंमत 1.70 लाख रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. 

त्यामुळे एनफिल्ड घेऊन ऑफरोडिंगला निघण्याच्या बेतात असाल तर या बाईकसाठी वाट पाहणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरु शकतं. Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ना पेट्रोल, ना डिझेल आणि CNG, ‘या’ देशात पाण्यावर चालणार कार?

ना पेट्रोल, ना डिझेल आणि CNG, ‘या’ देशात पाण्यावर चालणार कार?

आता तुम्हाला गाडी चालवण्यासाठी पेट्रोल, डिझेल किंवा सीएनजीची गरज लागणार नाही. कारण तुमची कार पाण्यावर …

‘मूर्ती सर, तुमच्या इन्फोसिस टीमला आठवड्यातून 1 तास तरी काम करायला सांगा म्हणजे..’; लोकांचा संताप

‘मूर्ती सर, तुमच्या इन्फोसिस टीमला आठवड्यातून 1 तास तरी काम करायला सांगा म्हणजे..’; लोकांचा संताप

Narayana Murthy Ask Your Infosys Team To…: आयकर परतावा भरण्याची शेवटची तारीख जवळ येत आहे …