प्रतिक बब्बर पुन्हा पडलाय प्रेमात; शेअर केली खास पोस्ट

Prateik Babbar: अभिनेता प्रतिक बब्बर (Prateik Babbar) हा वेगवेगळ्या चित्रपटांमधून आणि वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतो. प्रतिक हा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’ (Valentine’s Day) ला प्रतिकनं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टच्या माध्यमातून प्रतिकनं त्याच्या रिलेशनशिपची माहिती चाहत्यांना दिली. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

अभिनेत्री प्रिया बॅनर्जीला (Priya Banerjee) सध्या प्रतिक बब्बर हा डेट करत आहेत. प्रिया आणि प्रतिक यांनी त्यांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करुन त्यांच्या रिलेशनशिपची माहिती नेटकऱ्यांना दिली. प्रतिकनं शेअर केलेल्या फोटोमध्ये प्रिया आणि प्रतिक यांनी काढलेला टॅटू दिसत आहे. या टॅटूमध्ये हार्ट इमेजी आणि पी-बी हे लेटर्स दिसत आहेत. प्रतिकच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले. प्रतिकची बहीण जुही बब्बर, रिद्धीमा पंडित यांनी प्रतिक आणि प्रियानं शेअर केलेल्या पोस्टला कमेंट्स केल्या आहेत. 

प्रतिक हा स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा आहे. प्रतिकनं 23 जानेवारी 2019 रोजी  सान्या सागरसोबत लग्नगाठ बांधली. पण सान्या आणि प्रतिक हे विभक्त झाले आहेत, असं म्हटलं जात आहे. 


प्रतिकचे चित्रपट

2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटामधून प्रतिकनं अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. प्रतिकनं ओटीटीवर हिट चित्रपट आणि सीरिजमध्ये काम केलं आहे. धोबी घाट, माय फ्रेंड पिंटो, इश्क, बाघी-2 या चित्रपटांमध्ये त्यानं काम केलं. तर फोर मोर शॉर्ट्स प्लिज, चक्रव्यूह या सीरिजमध्ये देखील त्यानं काम केलं. तर अभिनेत्री प्रिया बॅनर्जीनं 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या जज्बा या चित्रपटामधून अभिनयक्षेत्रात एन्ट्री केली. प्रिया आणि प्रतिकनं शेअर केलेल्या पोस्टला अनेकांनी कमेंट्स करुन त्यांना शुभेच्छा दिला आहेत.

हेही वाचा :  आक्राळ विक्राळ क्रियेचर 'ट्रोल'

प्रिया आणि प्रतिक हे दोघेही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. प्रियाला इन्स्टाग्रामवर 820K फॉलोवर्स आहेत. तर प्रतिकला इन्स्टाग्रामवर 548K फॉलोवर्स आहेत. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. 

महत्वाच्या इतर बातम्या :

Kohli’s Pathaan Step Viral: विराट आणि जाडेजाचा डान्स पाहून शाहरुख झाला इम्प्रेस; म्हणाला, ‘यांच्याकडून शिकावं लागेल’



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …