बिर्ला ग्रुपच्या मालकाची मुलगी अनन्या बिर्लाचा ग्लॅमरस थाट पाहिला का? अदा अन् रूप बघून विसरून जाल अंबानींच्या सुना-लेकी

Aditya Birla group चेअरमन Kumar mangalam Birla यांची मुलगी ananya birla मीडियाच्या लाइमलाइटपासून दूर राहते, पण तिचे सिंगिंग टॅलेंट काही जगापासून लपलेले नाही. देशात असो किंवा परदेशात, अनन्याच्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये हजारो लोक हजेरी लावतात. 2020 मध्ये रिलीज झालेल्या ‘डे गोज बाय’ या गाण्याने तर तिला खूप प्रसिद्धी मिळवून दिली आणि तिची खूप प्रशंसा सुद्धा झाली.

अनन्या बिर्ला केवळ सिंगरच नाही तर तिचा स्वत:चा बिझनेस देखील आहे, हा व्यवसाय तिने वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी सुरू केला होता आणि आता यशस्वीपणे चालवून दाखवला हे विशेष! अनन्याचे सोशल मीडिया अकाऊंट कधीतरी नक्की पहा, तुम्हाला दिसेल की ही कर्तबगार मुलगी किती लॅव्हीश लाईफ जगते. तिची ही लाईफ आणि ग्लॅमरस स्टाईल कित्येक बॉलीवूड डिव्हाजना सुद्धा तगडी टक्कर देणारी आहे. इतंकच काय या अब्जाधिश बिझनेसमॅनच्या मुलीला पाहून तुम्ही अंबानी घराण्यातील सुना व लेकींनाही काही काळ विसराल ज्या सदैव लाईमलाईटमध्येच असतात. (फोटो सौजन्य :- इंस्टाग्राम @ananyabirla)

नुसते स्टायलिश फोटोज

नुसते स्टायलिश फोटोज

अनन्याचे इंस्टाग्राम स्टायलिश फोटोजने अगदी भरलेले आहे, ज्यामधून तिच्या फॅशन सेन्सची उत्तम झलकही पाहायला मिळते हे विशेष! तिचा हा फोटोच पहा ना, या फोटोमध्ये ती फिटिंग ड्रेसमध्ये दिसत आहे. या फोटोतून दिसते आहे की भले ही सौंदर्यवती बिझनेसवूमन असेल पण ती तिच्या फिटनेसची देखील खूप काळजी घेते. तिच्या फिट बॉडीमुळेच ती बिनधास्त स्वत:साठी असे बॉडीकॉन आऊटफिट्स निवडते आणि त्यात पाहणाऱ्याला घायाळ देखील करते. सिल्वर दागिन्यांसह तिने ज्या पद्धतीने हा स्टायलिश लूक कॅरी केला आहे तो खरंच वाखाणण्याजोगा आहे.

हेही वाचा :  लंडनच्या आलिशान घरात सोनमची जंगी पार्टी, वाईन रेड कलर स्कर्टमध्ये केले थेट काळजावर वार

(वाचा :- हि-यांनी जडलेला लाखो रूपयांचा नेत्रदिपक बॉडीकॉन ड्रेस, दिशा पाटणीचा इंटरनेटवर आग लावणारा ब्लास्ट लुक आला समोर)​

हा कुल लुक तर पहा

हा कुल लुक तर पहा

अनन्या नेहमीच स्वत:ला अशाप्रकारे स्टाईल करते की त्यातून तिची कुल स्टाईल दिसून येते. तुमचा लुक देखील हटके आणि कुल बनवण्यासाठी तुम्ही तिच्या या फोटोंमधून टिप्स घेऊ शकता. एका बाजूला, तिने निळा प्रिंट केलेला ओव्हरसाईज टी-शर्ट आणि रिप्ड डेनिम शॉर्ट्स घातलेली दिसत आहे, ज्यामध्ये तिने सिल्वर दागिन्यांचा वापर केला आहे. दुसरीकडे, तिने पांढरे जॉगर्स आणि काळ्या शूजसह कस्टम मेड स्वेटशर्ट घातलेले दिसते आहे. तुम्ही तुमचे नाव किंवा आडनाव देखील अशा प्रकारेचं प्रिंट करू शकता.

(वाचा :- पद्मश्री सन्मान मिळताच रविना टंडन नखशिखांत सजून पडली घराबाहेर, क्रॉप चोळी व ब्राऊन लेहंग्यात केला कलेजा खल्लास)​

परफेक्ट आहे प्रोफेशनल लुक

परफेक्ट आहे प्रोफेशनल लुक

अनन्याच्या या लूकवरून ऑफिसला जाणार्‍या मुली स्वतःसाठी जबरदस्त टिप्स निवडू शकतात. यामध्ये अनन्याने ब्राऊन अँड व्हाईट रंगाच्या चेक प्रिंटच्या शर्टसोबत ब्लेझर ट्राउजर पँट कॅरी केली होती. तिने चेक प्रिंट ब्लेझर आणि त्यालाच मॅचिंग ट्राऊजर्स कॅरी केली होती. या कपड्यांचे कलर कॉम्बिनेशन इतके परफेक्ट होते, की हा प्रोफेशनल लुक एकदम परफेक्ट दिसत होता. पांढऱ्या शूज आणि लग्झरी घड्याळामुळे या लुकला कम्प्लीटपणा मिळत होता.

हेही वाचा :  वेटलॉस, डायबिटीज, पोट साफ होणं, थायरॉइड, सर्दी-खोकला झटक्यात दूर होतील 15 रोग, करा..

(वाचा :- अक्षर पटेलची पडली विकेट, क्रिकेटर्सनी लावला लग्नाचा धडाका,सफेद मोत्यांत विणलेला नवरीबाईचा लेहंगा घालतोय मोहिनी)​

ट्रेडीशनल लुक सुद्धा आहे खास

ट्रेडीशनल लुक सुद्धा आहे खास

अनन्या फक्त वेस्टर्न लूकमध्येच स्टायलिश दिसते असे नाही, तर एथनिक लूकही तिला खूप शोभतो. या फोटोत तुम्ही पाहू शकता की तिने एका बाजूला ब्लॅक कलरचा लेहेंगा घातलेला आहे, ज्यावर एम्ब्रॉईडरीचे नाजूक नक्षीकाम केलेले दिसत आहे. दुसरीकडे, ती क्रीम रंगाच्या लेहेंगा सेटमध्ये खूप सुंदर दिसत आहे. या लेहेंग्यावर पिंक कलर एम्ब्रॉयडरी करण्यात आली होती, जी तिला सुंदर लुक देत होती. हे सर्व लुक पाहता अनन्याच्या फॅशन चॉईस अप्रतिम आहेत यात शंकाच नाही.

(वाचा :- गडगंज श्रीमंत असूनही नीता अंबानीने मुलाच्या साखरपुड्यात केली ही अनपेक्षित गोष्ट, ज्याचा वाटला पूर्ण जगाला हेवा)​

स्टाईल बाबतीत असते खूप सतर्क

स्टाईल बाबतीत असते खूप सतर्क

अनन्य एका श्रीमंत घरात वाढलेली मुलगी तर आहेच पण शिवाय ती आजच्या पिढीतील मॉडर्न नारी सुद्धा आहे. त्यामुळे तिला स्वत:ची स्टाईल आणि स्वत:ची एक फॅशन आहे आणि ती जपण्यासाठी ती नेहमीच सतर्क असते हे तिच्या वेगवेगळ्या लुक मधून दिसून येतच असतं. तुम्ही सुद्धा तुमची अशीच युनिक स्टाईल जपली पाहिजे कारण यातून आपण गर्दीतही वेगळे दिसून येतो आणि आपली एक वेगळी ओळख देखील निर्माण होते.

हेही वाचा :  "गौतमी पाटील आणि इंदुरीकर महाराज सारखेच, दोघांनाही....", ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांची जाहीर टीका

(वाचा :- वाईन कलर साडी, सोन्याचे भरगच्च दागिने, 53 वर्षांच्या भाग्यश्रीचं विशीतल्या मुलीला लाजवणारं तारूण्य करतंय अवाक्)​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात …