टांझानियाच्या किली पॉलच्या बहिणीने गायलं गाणं, नेटकऱ्यांनी केलं कौतुक

Kili Paul : सोशल मीडियावर (Social Media) वेगवेगळे रील्स व्हायरल होत असतात. टांझानियाच्या किली पॉलच्या (Kili Paul) रील्सला नेटकऱ्यांची पसंती मिळते. बॉलिवूडमधील वेगवेगळ्या कलाकारांच्या गाण्यावरचे रील्स किली पॉल सोशल मीडियावर शेअर करतो. नुकताच एक खास व्हिडीओ किली पॉलने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये किली पॉलसोबतच त्याची बहिण नीमा पॉल देखील दिसत आहे. किली आणि नीमा यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

नीमाने गायलं गाणं

नीमानं कला या चित्रपटातील ‘जाने बलमा घोडे पे क्यों सवार है’ हे गाणं गायलं आहे. किलीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये नीमा ही गाणं गाताना दिसत आहे, तर किली हा गाण्यावर लिप सिंक करताना दिसत आहे. किली आणि नीमा यांच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. किलीने या व्हिडीओला कॅप्शन दिलं, ‘हा नीमाचा आवाज आहे. तुम्हाला हे गाणं कसं वाटलं? मला कमेंट्स करुन कळवा.’

नीमा आणि किलीच्या व्हिडीओला मिळाली नेटकऱ्यांची पसंती

नीमा आणि किलीच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 2.3 मिलियन युझर्सनं पाहिला आहे तर अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओला कमेंट्स केल्या आहेत. ‘तुम्ही या गाण्यासाठी हिंदी शिकलात का?’ अशी कमेंट एक युझरने केली. तर अनेकांनी या व्हिडीओला कमेंट करुन नीमाच्या आवाजाचं कौतुक केलं. 

हेही वाचा :  नितेश राणेंच्या आरोपावर पूजा भटने मौन सोडले..

पाहा व्हिडीओ


‘जाने बलमा घोडे पे क्यों सवार है’ हे गाणं कला या नेटफ्लिक्सवरील चित्रपटामधील आहे. हे गाणं श्रीरेषा भगवतुलानं गायलं आहे.

किलीसोबतच त्याची बहिण नीमा पॉल देखील सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. या दोघांच्या हिंदी गाण्यांवरील व्हिडीओला नेटकऱ्यांची विशेष पसंती मिळते. बिजली बिजली, टिप टिप बरसा पानी आणि कूसू कूसू या हिंदी गाण्यांवरील व्हिडीओ किलीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Viral Video : टांझानियाच्या किली पॉलला KGF 2 चं वेड, लिप-सिंक करत बनवला व्हिडीओ, तुम्हीही नक्की पाहा



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …