झुंड पाहिल्यानंतर धनुष भारावला; म्हणाला, ‘हा अनुभव…’

Jhund :  प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळेचा (Nagraj Manjule) आणि त्याच्या टीमचा झुंड (Jhund) हा चित्रपट उद्या (4 मार्च) प्रदर्शित होतोय. अनेक जण या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहात आहेत. झुंड चित्रपटात अमिताभ बच्चन, आकाश ठोसर आणि रिंकू राजगुर यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट काही दिवसांपूर्वी अभिनेता आमिर खानने (Aamir Khan) पाहिला होता. आता अभिनेता धनुषसाठी (Dhanush) देखील या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित केले होते. हा चित्रपट पाहिल्यानंतर धनुषनं चित्रपटाच्या टीमचे कौतुक केले आहे. 

धनुषची प्रतिक्रिया 

झुंड पाहिल्यानंतर धनुष म्हणला, ‘मला कळत नाहिये मी काय बोलू, खूप छान चित्रपट आहे. या चित्रपटातील संदेश हा सर्वांनी ऐकला पाहिजे. मी या चित्रपटातील हजारपेक्षा जास्त चांगल्या टेक्निकल गोष्टी सांगू शकतो.  चित्रपट पाहण्याचा अनुभव  प्रत्येकानं घ्यावा. हा मास्टरपीस आहे. हा चित्रपट अनेकांचे लक्ष वेधणार आहे. चित्रपट पाहिल्यानंतर मला आनंद झाला.  चित्रपटात काम केलेल्या मुलांनी माझे मन जिंकल आहे. अमिताभ बच्चन तुम्ही खूपच छान काम केले आहे. पूर्ण टीमनं  चांगले काम केले आहे. नागराजचे मी आभार मानतो त्याने एवढा चांगला चित्रपट तयार केला. मी सर्व टीमला शुभेच्छा देतो.’

हेही वाचा :  'किंग ऑफ कोठा 'मध्ये दुलकर सलमान दिसणार खास भूमिकेत, धडाकेबाज लुक प्रदर्शित 

झुंड हा चित्रपट स्लम सॉकरटचे संस्थापक विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित आहे. अमिताभ बच्चन हे या चित्रपटात फुटबॉल कोच ही भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती  टी सीरिजनं केली आहे.

संबंधित बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …