पुणेकर महिलेने या सोप्या घरगुती ट्रिकने काही दिवसांत घटवले तब्बल 15 किलो वजन, हसणा-यांची बोलती बंद

Corona Virus चा काळ आपल्या सर्वांसाठीच खूप वेदनादायी व संकटमय होता. कारण या काळात इतक्या समस्यांचा सामना आपल्या सर्वांनाच करावा लागला की आता पुन्हा असे दिवस नको असे म्हणायची वेळ आली आहे. तशा तर या काळात अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. पण त्यापैकी सर्वात मोठी समस्या होती ती आरोग्याची! या आरोग्य समस्यांमध्ये देखील अनेकजण वाढत्या वजनामुळे त्रस्त होता. घरात बसल्यामुळे शारीरिक व मानसिक अवस्था जवळजवळ ठप्प होती अन् याचा आयुष्यावर खूप मोठा परिणाम झाला.

अनेकांनी या आव्हानापुढे हार मानली. पण अनेकजण असे होते जे वाढत्या वजनाशी लढले आणि त्यांनी हे आव्हान यशस्वीपणे पेलवून दाखवले. पुण्याच्या संपदा धोंगडे हिची कहाणी देखील अशीच आहे. लॉकडाऊनमध्ये तिचे वजन वेगाने वाढले. पण तिने ते अगदी काहीच महिन्यांत कमी करून दाखवले. तिची ही प्रेरणादायी कहाणी वेटलॉस जर्नीवर असणाऱ्या असंख्य लढवय्यांसाठी प्रेरणादायी आहे असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. (फोटो सौजन्य :- TIO)

  1. नाव – संपदा धोंगडे
  2. व्यवसाय – कंटेट मॅनेजर
  3. शहर- पुणे
  4. पूर्वीचे वाढलेले वजन – 70 किलोपेक्षा जास्त
  5. किती वजन कमी केले – 10 किलोपेक्षा जास्त
  6. वजन कमी करण्यासाठी लागलेला वेळ – 6 महिने

कसा आला टर्निंग पॉइंट?

कसा आला टर्निंग पॉइंट?

वेटलॉसचा जेव्हा प्रश्न समोर येतो तेव्हा सगळ्यात आधी लठ्ठपणा का निर्माण होतो हा प्रश्न विचारला जातो. कंटेंट मॅनेजर संपदा सांगतात की, लॉकडाऊन दरम्यान त्यांचे खूप वजन वाढले होते. तेलकट अन्नपदार्थ खाणे आणि व्यायाम न करणे हे त्यामागचे कारण होते. पण इथूनच समस्या सुरू झाल्या. संपदा यांनी सांगितले की, जेव्हा त्यांचे वजन 70 किलोपेक्षा जास्त वाढले तेव्हा त्यांना वाटले नव्हते की त्या एक किलोही वजन आयुष्यात कधी कमी करू शकतील. कारण, त्यांच्या शरीरातील एनर्जीचच कमी झाली होती. पायऱ्या चढल्यावर सुद्धा त्यांना धाप लागायची आणि त्या थकून जायच्या. खरंतर हे सर्व पोस्ट कोविडमुळेही घडत होते. पण, या समस्यांमुळे त्यांनी ठरवले की आता या संकटामधून दूर होऊन दाखवायचेच. संपदा धोंगडे यांचा वजन कमी करण्याचा प्रवास कसा सुरू झाला ते आता जाणून घेऊया.

हेही वाचा :  Optical Illusion: 'या' फोटोत लपलेला पोपट शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

(वाचा :- Strawberry : या छोटाशा फळात आढळणारं व्हिटॅमिन आहे युरिक अ‍ॅसिडचं दुश्मन, क्षणभरात हे 12 भयंकर आजार करतं छुमंतर)​

डाएट प्लान

डाएट प्लान

संपदा म्हणतात की, एखादा न्यूट्रिशनिस्ट आपल्याला वजन कमी करायला मदत करू शकतो यावर त्यांचा विश्वास नव्हता. त्यामुळे न्यूट्रिशनिस्टचा सल्ला घ्यायला त्या टाळाटाळ करायच्या. शिवाय फॅड डायट आणि प्रोटिन पावडर यांसारख्या वजन कमी करण्याच्या पद्धतींपासून त्या दूर राहणेच पसंत करत होत्या. पण त्यांच्या चुलत बहिणीने न्यूट्रिशनिस्टबद्दलचा गैरसमज मनातून दूर केला आणि त्यांना अनुभवी डाएटिशियनचा नंबर देऊन त्याच्याकडे पाठवले. डाएटिशियनने तिला केवळ घरचे साधे अन्नच खाण्याचा सल्ला दिला. ज्याच्या जोरावर तिने मैलाचा दगड गाठला.

(वाचा :- Vitamin D Food हाडाचा सुकलेला सांगाडा बनवते तुमची ही 1 चुक, आयुष्यभर जागेवर खिळण्याआधी खायला घ्या हे 10 पदार्थ)​

वर्कआउट आणि फिटनेस

वर्कआउट आणि फिटनेस

वजन कमी करण्यासाठी संपदा यांनी डाएटसोबत साध्या वर्कआउटचीही मदत घेतली. त्या रोज 5000 पावले चालायच्या आणि आठवड्यातून 5 दिवस जिम करायच्या. डाएट प्रमाणेच त्यांचं वर्कआउट रूटीनही अगदी सोपं होतं. त्यांनी कुठेही स्वत:ला मर्यादेबाहेर झोकून दिले नाही आणि जे आपल्या शरीराला आणि स्वत:ला झेपेल तेच केले आणि हळूहळू का होईना त्याचाच परिणाम त्यांना दिसून आला.
(वाचा :- ही 8 लक्षणं ओरडून सांगतात की हार्ट वॉल्व झालाय ब्लॉक, सतत धाप लागली व थकवा जाणवला तर ताबडतोब करा हे काम नाहीतर)​

हेही वाचा :  'तुमच्या मुलानं बलात्कार केलाय', सायबर भामट्यांचा नवा फंडा; पालकांनो आत्ताच सावध व्हा!

स्वत:ला कशी दिली प्रेरणा?

स्वत:ला कशी दिली प्रेरणा?

संपदा सांगतात की, बॉडी शेमिंग हेच माझ्यासाठी मोटिवेशन होते. माझ्या वाढलेल्या शरीराकडे पाहून हसणाऱ्यांना मला गप्प करायचे होते आणि तेच उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून मी कामाला लागले. जेव्हा कधी मला वाटले मी हे करू शकत नाही तेव्हा मी हे मोटिव्हेशन समोर ठेवले आणि अखेर वजन कमी करून त्या सर्व लोकांना चोख प्रत्युत्तर दिले. एकदा का रिझल्ट दिसायला लागले की मग मोटिव्हेशन स्वत:च निर्माण होते.
(वाचा :- Diabetes Tips : या स्टेजमध्ये कायमचा संपतो डायबिटीज, फक्त हे 2 उपाय करणा-यांना स्पर्शही करत नाही Blood Sugar..)​

लठ्ठपणामुळे कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले?

लठ्ठपणामुळे कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले?

जास्त वजन असल्याने संपदा यांना नेहमी सुस्ती आणि थकवा जाणवत होता. हीच त्यांची सर्वात मोठी समस्या होती, पण वजन कमी केल्यानंतर मात्र आता त्यांना खूप हलके वाटू लागले. मंडळी, तुम्ही देखील संपदा यांच्याप्रमाणे एक ध्येय डोळ्यापुढे ठेवून मार्गक्रमण केले तर तुम्हाला देखील नक्की यश मिळेल आणि तुमची वेटलॉस जर्नी देखील 100 टक्के यशस्वी होईल व इतरांना प्रेरणा देईल.

(वाचा :- Marburg Virus : मारबर्ग व्हायरसने 9 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर WHO हादरलं, चालता चालता सुरू होतात ‘ही’ 2 लक्षणं)

हेही वाचा :  International Women Day 2023: 8 मार्च रोजीच का साजरा केला जातो महिला दिन? जाणून घ्या महत्त्व, इतिहास आणि यंदाची थीम

टीप :- संपदासाठी जे उपाय कामी आले ते तुम्हालाही फायदा देतीलच असं मुळीच नाही. त्यामुळे या लेखात नमूद केलेल्या डाएट-वर्कआउटचे आंधळेपणाने पालन करणे टाळा आणि तुमच्या शरीरासाठी काय चांगले आहे ते शोधा.

हा लेख इंग्लिशमध्ये वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …

‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला …