Pregnancy Weight Loss : लिंबू पाण्यात ‘हा’ पदार्थ मिक्स करून बनवलेलं पेय पिऊन या महिलेने घटवले 25 किलो वजन, करीना कपूर होती इंस्पिरेशन!

गर्भधारणेनंतर वजन कमी करणे खूप आव्हानात्मक असते. कारण यावेळी महिलांचे शरीर फक्त कमकुवतच नसते तर या काळात त्यांना अनेक सौम्य प्रकारच्या आरोग्य समस्यांतून जावे लागते. म्हणूनच खूप मेहनत केल्याशिवाय वजन कमी करणे कठीण आहे. कोलकातास्थित स्नेहा अंकिता दाप्त्रीचे वजनही जुळी मुलं झाल्यानंतर खूप वाढले होते आणि त्यामुळे ती एखाद्या गर्भवती महिलेसारखी दिसत होती. वाढत्या वजनामुळे ती आळशी तर झालीच होती पण तिच्या आत्मविश्वासावरही परिणाम झाला होता. त्यामुळे तिने आपली जीवनशैली बदलून पुन्हा फिटनेस ट्रॅकवर येण्याचा निर्णय घेतला. निरोगी आहार आणि नियमित व्यायामाने तिने वर्षभरात 25 किलो वजन कमी केले. स्नेहासाठी तिचा वजन कमी करण्याचा प्रवास कसा होता ते जाणून घेऊया.

  • नाव – स्नेहा अंकित दाप्त्री
  • वय – 30 वर्षे
  • शहर – कोलकाता
  • व्यवसाय – गृहिणी
  • वाढलेले वजन – 80 किलो
  • कमी केलेले वजन – 25 किलो
  • वजन कमी करण्यासाठी लागलेला वेळ – 1.5 वर्षे

(Image Credit: TOI)

कधी आला टर्निंग पॉइंट

स्नेहा सांगते की, जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर माझे वजन 80 किलोपर्यंत पोहोचले होते. तेव्हा मला जाणवलं की हे वय वाईट दिसण्यासाठी खूप लहान आहे. त्यामुळे मी हार मानली नाही आणि वजन कमी करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा :  नागपुरात ढगफुटीसदृश पाऊस, पुरात तिघांचा मृत्यू; नुकसानग्रस्तांना 10 हजारांची मदत जाहीर

(वाचा :- Diabetes diet tips : खाणं तर दूरच, ‘हे’ 6 पदार्थ चाटूनही बघू नका, नाहीतर होऊ शकतो मृत्यूला निमंत्रण देणारा डायबिटीज!)

वेटलॉसमधून काय शिकवण मिळाली?

स्नेहा सांगते की, वजन कमी करताना मला खूप काही शिकायला मिळाले. लोकांना बोलू जे बोलायचं ते बोलू द्या, फक्त तुमचा निर्धारच तुम्हाला खूप पुढे घेऊन जाणार आहे हे लक्षात ठेवा.

(वाचा :- Bappi Lahiri Death : घोरण्याशी संबंधित ‘या’ विचित्र आजारामुळे झाला बप्पी लहरींचा मृत्यू, या लोकांना असतो याचा सर्वाधिक धोका!)

मोटिव्हेट कशी राहायची?

स्नेहा इतर लोकांच्या वजन कमी करण्याच्या कथा पाहून खूप प्रेरित राहायची. ती म्हणते की जेव्हा गर्भधारणेनंतर वजन कमी करण्याची वेळ आली तेव्हा करीना कपूर ही माझी सर्वात मोठी प्रेरणा होती. तसेच, मी माझे गर्भधारणे पूर्वीचे फोटो पाहिले आणि लगेच लक्षात आले की मी वजन कमी करू शकते.

(वाचा :- Quick weight loss tips : संपूर्ण शरीरावरची चरबी जाईल झटक्यात जळून, करा ‘ही’ 6 अतिमहत्त्वाची कामे!)

लाइफस्टाइलमध्ये काय बदल केले

स्नेहा सांगते की, वजन वाढल्यानंतर मी रोज वर्कआउट करायचे. कंटाळा आला तरीही रूटीन स्किप करत नाही.

हेही वाचा :  World TB Day 2022 :- 'या' 5 प्रकारच्या लोकांना एका क्षणात विळख्यात घेतो टीबी, दुर्लक्ष करू नका अन्यथा बेतेल जीवावर..!

(वाचा :- Lassa fever : ओमिक्रॉनमध्येच आता लासा तापाने वाढवली चिंता, ‘या’ लोकांना आहे जास्त धोका, लक्षणं व उपाय जाणून घ्या!)

ओव्हरवेट झाल्याने काय समस्या आल्या?

वाढत्या वजनासोबत आळस आणि आत्मविश्वास कमी होणे ही चिंतेची बाब आहे. स्नेहाच्या म्हणण्यानुसार, जास्त वजनामुळे अनेक आरोग्य समस्या देखील वाढतात. ज्यामुळे अनेकजण खिल्ली उडवतात आणि आपल्याला नापसंत करतात. ती म्हणते की माझ्यासाठी ही सर्वात वाईट गोष्ट होती.

(वाचा :- Weight loss inspiration : 122 किलो वजनामुळे लठ्ठ म्हणून उडवली जायची खिल्ली, सकाळी लिंबू पाणी व मध आणि लंचनंतर हे खास पाणी पिऊन घटवलं तब्बल 41 किलो वजन!)

डाएट काय फॉलो केलं?

सुकामेवा, पोहे, उपमा आणि भाज्यांचा ज्यूस

  • दुपारचे जेवण –

२ चपात्या, डाळ, भात आणि भाजी

  • रात्रीचे जेवण –

भाजी आणि २ चपात्या

  • वर्कआऊट करण्यापूर्वी –

लिंबू आणि गुळाचे कोमट पाणी

  • व्यायाम केल्यानंतरचे मील –

नाश्त्यातील पदार्थ

  • कमी कॅलरीयुक्त रेसिपी –

स्नेहा सांगते की, खजूरासारख्या नॅच्युरल स्विटरसोबत नारळाच्या दुधात भिजवलेले ओट्स आणि फळांसारखे पदार्थ खाल्ल्याने खूप फायदा झाला.

हेही वाचा :  Gmail वर आलेल्या अनावश्यक मेल्सने त्रस्त आहात?, अशी चुटकीसरशी समस्या सोडवा, पाहा सोपी ट्रिक्स

(वाचा :- Bathing Habit : आजच सोडा अंघोळीबाबतची ‘ही’ घाणेरडी सवय, दीर्घायुष्यासाठी हार्वर्ड एक्सपर्ट्सनी सांगितली अंघोळ करण्याची योग्य पद्धत..!)

टीप – वर सांगितलेला अनुभव हा तुमच्यासाठी सुद्धा लाभदायक असेलच असे नाही. त्यामुळे वरील टिप्स जशाच्या तशा फॉलो न करता तज्ज्ञ व जाणकारांचा सल्ला घ्या आणि तुमच्या शारीरिक स्थितीनुसार योग्य डाएट आणि वर्कआउट प्लान तयार करूनच वजन कमी करण्याचा प्रवास सुरु करा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले ‘आता पुढील शिक्षण…’

Shrirang Barane Passed SSC Exam : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, माणूस आयुष्यभर विद्यार्थी दशेतच …