Weight Loss: या अभिनेत्रींनी केले असे डाएट, वजन कमी करून चाहत्यांना केले प्रेरित

वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी खूपच कष्ट घ्यावे लागतात. तुम्हाला जर असं वाटत असेल की हे केवळ आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठीच आहे तर असं अजिबात नाही. अनेक सेलिब्रिटींनाही याचा सामना करावा लागला आहे. बरेचदा कोणत्याही गोष्टीसाठी माणसाला प्रेरणा हवी असते आणि ती प्रेरणा आपल्या आदर्श व्यक्तींकडून मिळते. वजन कमी करायचे असेल तर मालिकेतील अशा काही प्रसिद्ध सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी वजन कमी करून आपल्यासमोर आदर्शच ठेवला आहे. कशा पद्धतीने या अभिनेत्रींनी वजन कमी केले आणि त्यांच्या डाएटमध्ये कोणत्या पदार्थांचा त्यांनी समावेश केला त्याबाबत जाणून घेऊया. तुम्हीही तुमचे Weight Loss करण्यासाठी हा लेख नक्की वाचा आणि प्रेरणा घ्या.

भारती सिंहचे डाएट

अभिनेत्री आणि कॉमेडियन असणारी भारती सिंह ही जगप्रसिद्ध आहे. पण मुलाच्या जन्माआधीपासूनच भारतीचे झालेले ट्रान्सफॉर्मेशन हे आश्चर्यचकित करणारे आहे. भारती सिंहला हेल्दी आणि गुंतागुंत नसणारी प्रेग्नन्सी हवी होती आणि म्हणूनच तिने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. १० महिन्यात १६ किलो वजन भारतीने कमी केले. यासाठी भारतीने इंटरमिटेंट फास्टिंगची मदत घेतली. भारतीने सांगितले की तिने आपल्या डाएटमध्ये नक्की काय काय फॉलो केले. दुपारचे जेवण भारती १२ वाजता जेवायची आणि शेवटचे ती संध्याकाळी ७ वाजता खायची. त्यानंतर ती काहीही खायची नाही. या वेळेदरम्यान ती तिच्या आवडीचे सर्व पदार्थ खात होती मात्र संध्याकाळी ७ नंतर तिने काहीही खाल्ले नाही. याचाच तिला वजन कमी करण्यासाठी फायदा झाला. इतकंच नाही तर तिच्या मुलाच्या जन्माच्या वेळी अगदी पहिल्या दिवशीपर्यंत ती काम करत होती.

हेही वाचा :  महागड्या डाएट प्लान आणि जिमला करा बाय बाय, CDC ने सांगितलेले ‘हे’ 4 उपाय करा, झटक्यात कमी होईल वजन!

शहनाझ गिलने केले १२ किलो वजन कमी

बिग बॉस १३ च्या सीझननंतर शहनाझ गिल हे नाव घराघरात प्रसिद्ध झालं. गोलमटोल आणि अवखळ अशी शहनाझ अनेकांची आवडती झाली. पण घराच्या बाहेर आल्यानंतर जर शहनाझने सर्वात पहिले काम केले ते म्हणजे वजन कमी करण्याचे. काही महिन्यातच शहनाझने आपला संपूर्ण लुक बदलला. आपल्या डाएटबाबत शहनाझने एका मुलाखतीत सांगितले की, डाएटिंग आणि योग्य आहारामुळेच तिचे वजन कमी झाले. चॉकलेट, आईस्क्रिम आणि मांसाहारी पदार्थ शहनाझने खाणे बंद केले. याशिवाय तिने आपल्या आहारात फेरबदल केला आणि खाण्याचा पोर्शनही कमी केला. असे डाएट फॉलो करून शहनाझने १२ किलो वजन काही महिन्यातच कमी केले.

(वाचा – Weight Loss करण्यासाठी चपाती योग्य की भाकरी, रिसर्चमध्ये काय आहे)

स्मृती ईराणींमधील बदल

मालिकेतील नावाजलेला चेहरा आणि त्यानंतर राजकारण उतरल्यावर स्मृती ईराणी बऱ्याच वेळा आपल्या वाढत्या वजनावरून ट्रोल झाल्या. स्ट्रिक्ट डाएट आणि आपल्या तब्बेतीकडे व्यवस्थित लक्ष पुरवत स्मृती ईराणीने आपले वजन कमी केल्याचे दिसून आले. डाएट केल्यानंतर स्मृती ईराणीने शेअर केलेला फोटा तुफान व्हायरल झाला होता. यासाठी स्मृती ईराणी यांनी ग्लुटन फ्री आणि नॉन – डेअर उत्पादनांचा डाएटमध्ये समावेश करून घेतला होता असं सांगण्यात येतं. डेअरी उत्पादनांचा पूर्ण त्याग करून हे डाएट फॉलो करण्यात आलं होतं.

हेही वाचा :  Weather Updates : दिवाळीच्या उत्साहावर पावसाचं पाणी? हवामान विभागानं इशारा देत वाढवली चिंता

(वाचा – Weight Loss Tips: काय आहे ८०/२० नियम, कसे होते वजन कमी)

अविका गोर

अविका गोर हे नाव टेलिव्हिजनमध्ये खूपच मोठं आहे. बालिका वधू म्हणून अविकाने नाव कमावलं. पण वाढत्या वजनामुळे तिला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. एक वेळ अशी होती की, आपल्याला स्वतःला आरशासमोर उभं राहावंसं वाटत नाही असं अविकाने सांगितलं होतं. त्यानंतरच तिने वजन कमी करण्याचे ठरवलं. चुकीची खाण्याच्या निवडीमुळे अविकाचं वजन वाढलं होतं. रूटीन लाईफ आणि योग्य आहार डाएट फॉलो करून अविकाने १३ किलो वजन कमी केले. आहारामध्ये तेलकट, तूपकट पदार्थ अविकाने टाळले आणि डाएटिशियनने दिलेल्या तक्त्याप्रमाणेच तिने संपूर्ण फॉलो केले. त्याचा उत्तम परिणाम तिला मिळाला.

(वाचा – चालणे की धावणे? काय आहे हृदयाच्या आरोग्यासाठी प्रभावी)

दीपिका सिंह

संध्या बिंदणी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या दीपिका सिंहचे वजन बाळाच्या जन्मानंतर खूपच वाढले होते आणि यामुळे तिला डिप्रेशनचा त्रासही झाला होता. तसंच वजन कमी करण्यासाठी तिला बराच त्रासही सहन करावा लागला होता. तिचे वजन ७२ किलो झाले होते. मात्र डॉक्टरांनी दिलेल्या डाएटनुसार आणि व्यायाम करून दीपिकाने १६ किलो वजन कमी करत ५६ किलोपर्यंत आणले. तसंच आपल्या मुलाला स्तनपान करूनही वजन कमी करण्यास मदत मिळाली असंही दीपिकाने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. याशिवाय आहारात बदल करून फास्ट फूडकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. त्यामुळेच दीपिकाचे वजन नियंत्रणात आले.

हेही वाचा :  Father Daughter Marriage : ऐकावं ते नवलंच! चक्क बापासोबत लावलं जातं मुलीचं लग्न, आजही 'या' शहरात पाळली जाते परंपरा..

वजन कमी करण्यासाठी मनाची तयारी असणे अत्यंत गरजेचे आहे. तसंच या अभिनेत्रींनी आहारामध्ये योग्य बदल करून डॉक्टरांशी सल्लामसलत करून वजन कमी केले आहे. अशाच योग्य पद्धतीने तुम्हीही वजन कमी करण्यासाठी प्रेरणा घेऊ शकता.

(फोटो क्रेडिटः Instagram)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रात पुन्हा ‘सैराट’! लव्ह मॅरेजला विरोध करत आई-वडिलांनीच केली लेकीची हत्या

Maharashtra Crime News: महाराष्ट्राला हादरवणारी घटना परभणीत घडली आहे. प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडिलांनीच पोटच्या …

राज ठाकरे खरंच दुपारी झोपेतून उठतात का? स्वत: खुलासा करत म्हणाले, ‘माझ्याबद्दल…’

Raj Thackeray Morning Wake Up Time: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या त्यांनी लोकसभा …