सारा अली खानची आश्चर्यचकित करणारी वेट लॉस जर्नी, ४० किलो वजन घटवत केले सर्वांना अवाक्

सारा अली खानने फारच कमी वेळात आपल्या अभिनयाने आणि चांगुलपणाने सर्वांचे मन जिंकून घेतले आहे. सारा अली खान हे नाव सर्वांनाच आता परिचित आहे. वडील सैफ अली खान आणि आई अमृता सिंग यांची मुलगी ही ओळख पुसून टाकत साराने स्वतःचे असे नाव निर्माण केले आहे. पण हीच सारा एकेकाही ओळखताही येणार नाही इतक्या वजनाची होती. ९६ किलो वजनाची सारा ती हीच का? असा प्रश्न पडावा इतकी सारा बारीक झाली आहे. एखाद्याने मनात आणलं तर काहीच कठीण नाही, हे साराने करून दाखवले आहे. साराच्या या वजन कमी करण्याच्या प्रवासाबाबत जाणून घेऊया. (सौजन्य – @saraalikhan95 Instagram)

साराचे वजन का वाढले होते?

साराचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. तर अनेकदा तिचे काही वर्षांपूर्वीचे फोटो आणि व्हिडिओदेखील व्हायरल झाले होते, ज्यात साराचे वजन अत्यंत जास्त दिसून येत होते. साराला अभिनेत्री व्हायचे होते. मात्र ९६ किलो वजनाची अभिनेत्री कोणालाच पाहायला आवडणार नाही याची जाणीव झाल्यानंतर आपल्या आईच्या मदतीने वजन कमी केले. आई अमृता सिंगने नेहमीच तिला पाठिंबा दिला. साराला पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम अर्थात PCOD या समस्येचा सामना करावा लागला होता. त्यामुळे तिचे वजन झपाट्याने वाढले. ही एक हार्मोन्सशी संबंधित समस्या आहे. तसंच सारा जंक फूड जास्त प्रमाणात खायची. पण या सगळ्यानंतरही साराने केवळ २ स्टेप्सचा वापर केला आणि दीड वर्षात आपले ४० किलो वजन कमी केले. त्यामुळे तिच्याकडून नक्कीच प्रेरणा घेण्यासारखी आहे.

हेही वाचा :  आलियाच्या प्लंजिंग नेकलाईन ऑलिव्ह ग्रीन ड्रेसची किंमत ऐकाल, तर चाटच पडाल

सलाडचा पर्याय

साराने वजन कमी करण्यासाठी सर्वात पहिला पर्याय निवडला तो म्हणजे हेल्दी खाणे आणि जंक फूड सोडणे. पिझ्झा, आईस्क्रिम, चॉकलेट्स याशिवाय राहू न शकणाऱ्या साराला वजन कमी करण्यासाठी हे सर्व सोडावे लागले. मात्र आता काही वेळा सारा चीट डे करते आणि तिचे आवडते पदार्थ खातेदेखील. या सर्व पदार्थांच्या ऐवजी साराने सलाड खाण्याला प्राधान्य दिले. त्यामुळे तिचे वजन वेगाने कमी होऊ लागले.

(वाचा -रोज १५ मिनिट्स मारा दोरीच्या उड्या आणि करा झटपट वजन कमी, दोरी उड्या मारण्याचे फायदे)

पिलाटिस स्ट्रेंथ ट्रेनिंग

साराला नेहमी पापाराझ्झी पिलाटिस क्लासच्या बाहेर घेरतात. साराने आपले वजन कमी करण्यासाठी वर्कआऊट हा पर्याय निवडला. मात्र त्यातही तिने पिलाटिसचा आधार घेतला. फिटनेस तज्ज्ञ नम्रता पुरोहितकडे तिने ट्रेनिंगला सुरूवात केली. जास्तीत जास्त मेहनत घेत आपले वजन कमी करण्याचा साराने प्रयत्न केला. इतकंच नाही अजूनही सारा नियमितपणे पिलाटिस ट्रेनिंग करत आहे.

(वाचा – Weight Loss: सोनाक्षी सिन्हाने असे केले होते ३० किलो वजन कमी, वेट लॉसची सोपी पद्धत)

साराचा वजन कमी करण्याचा प्रवास

हेही वाचा :  Ink Attack : चंद्रकांत पाटील यांच्या आवाहनानंतरही 11 पोलीस कर्मचारी निलंबित

६ दिन वर्कआऊट आणि ७ व्या दिवशी चीट डे

स्वतःच्या शरीरासाठी आणि मनसाठी जास्त कठीण आणि त्रासदायक वागणं बरं नाही असं साराला वाटतं. त्यामुळे ती चीड डे पण पाळत होती. पण आधी तिचे वजन कमी होत नव्हते आणि ती जास्त वर्कआऊट करत होती. मात्र आपली ट्रेनर नम्रता पुरोहितशी चर्चा केल्यानंतर साराला कळले की, ६ दिवस व्यवस्थित वर्कआऊट करून ७ व्या दिवशी चीट डे करता येतो. सारा नेहमीच आपल्या जिममध्ये घाम गाळताना दिसते. आताही फिगर मेंटेन ठेवण्यासाठी नियमित सारा व्यायाम करण्यासाठी जाते.

तुम्हालाही साराप्रमाणे निर्धार करून वजन कमी करायचे असेल तर योग्य ट्रेनरची मदत घ्या आणि त्याशिवाय आपल्या आहारात हेल्दी बदल करा. चुकीचे डाएट फॉलो करू नका. डॉक्टरांच्या आणि जिम ट्रेनरच्या सल्ल्याप्रमाणे वागूनच तुम्ही तुमचे वजन कमी करू शकता.

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …

‘आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपत्तीची…’, CM एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde on Uddhav Thackeray: धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या निधनानंतर मी उद्धव ठाकरेंना …