महागड्या डाएट प्लान आणि जिमला करा बाय बाय, CDC ने सांगितलेले ‘हे’ 4 उपाय करा, झटक्यात कमी होईल वजन!

लठ्ठपणा ही एक गंभीर समस्या आहे ज्यामुळे आजकाल प्रत्येक व्यक्ती त्रस्त आहे. वजन कमी करण्यासाठी बरेच लोक जिममध्ये तासनतास घाम गाळतात किंवा महागडे डाएट प्लॅन फॉलो करतात. एक्सपर्ट्स म्हणतात की वजन कमी करण्यासाठी व्यायामाबरोबरच चांगला आहारही आवश्यक आहे. काही लोक वजन कमी करण्यासाठी कमी खातात किंवा अनेक गोष्टी खाणं सोडून देतात, हा वजन कमी करण्याचा सर्वात वाईट आणि अनहेल्दी मार्ग आहे. यामुळे आरोग्याची गंभीर हानी होऊ शकते. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) नुसार, निरोगी मार्गाने वजन कमी करण्यासाठी आहारात सर्व काही समाविष्ट केले पाहिजे.

तुमच्या ताटात वेगवेगळ्या रंगाचे पदार्थ समाविष्ट करा. म्हणजे तुमची जेवणाचे ताट इंद्रधनुष्याच्या रंगांनी सजलेले पाहिजे. सीडीसीने शिफारस केली आहे की जलद वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारात विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींचा समावेश असावा, ज्यात हिरव्या पालेभाज्या, फळे आणि भाज्या जसे की संत्री आणि टोमॅटो ज्यात जीवनसत्त्वे, फायबर आणि खनिजे भरपूर प्रमाणात आहेत. फ्रोझन मिरी, ब्रोकोली आणि कांदे इत्यादी गोष्टी एकत्र करून स्टॉज आणि ऑम्लेट बनवणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. (फोटो साभार: TOI)

फळे

ताजी, फ्रोजन किंवा डब्बाबंद असलेली फळे उत्तम पर्याय आहेत. सफरचंद आणि केळी व्यतिरिक्त आंबा, अननस किंवा किवी ही फळे खावीत. जेव्हा ताज्या फळांचा हंगाम नसतो तेव्हा फ्रोजन, डब्बाबंद केलेली किंवा ड्राय असलेली फळे खाण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा की वाळलेल्या आणि डब्बाबंद केलेला फळांमध्ये साखर किंवा सिरप असू शकतात. त्यामुळे त्यांचे सेवन मर्यादित प्रमाणातच करावे.

हेही वाचा :  जिमला न जाता अगदी घरबसल्या खा हे ५ पदार्थ, वजनात आपोआप दिसेल फरक

(वाचा :- Weight loss hacks : भात शिजवताना टोपात एक चमचा ‘ही’ एक गोष्ट घाला, आपोआप गळून पडेल संपूर्ण शरीरावरची चरबी..!)

भाज्या

निरोगी मार्गाने वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारात ग्रील्ड किंवा वाफवलेल्या भाज्यांमध्ये रोझमेरी सारख्या अनेक औषधी वनस्पतींचा समावेश करावा. नॉन-स्टिक पॅनमध्ये थोडेसे कुकिंग स्प्रे ऑइल टाकून भाज्या भाजून किंवा फ्राय करून घेऊ शकता. याशिवाय तुम्ही डब्बाबंद केलेल्या भाज्या मायक्रोवेव्हमध्ये बवनून खाऊ शकता. लक्षात ठेवा की डब्बाबंद केलेल्या भाज्यांमध्ये मीठ, लोणी किंवा क्रीम सॉस इत्यादी नसावेत. तसेच दर आठवड्याला वेगवेगळ्या भाज्या खाण्याचा प्रयत्न करावा.

(वाचा :- Bad Habits : विषासमान आहेत तुमच्या सकाळच्या या 5 सवयी, लवकरात लवकर बदला अन्यथा धोक्यात येईल आयुष्य..!)

कॅल्शियमवाले पदार्थ

तुम्ही दररोज फॅट फ्री किंवा लो फॅट दुधाव्यतिरिक्त साखर न घातलेले कमी फॅटचे दही खाऊ शकता. ते विविध फ्लेवरमध्ये मिळतात. त्यामध्ये प्रथिने आणि कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. लक्षात ठेवा या गोष्टी कधीही साखर घालून खाऊ नयेत.

(वाचा :- Weight loss drink : अगदी वेगाने गळून पडेल संपूर्ण शरीरावरची चरबी, फक्त सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास या पदार्थाचं पाणी!)

हेही वाचा :  थायलंडमध्येही आहे एक 'अयुथ्या'; येथे राजाच्या नावामागे 'राम' लावण्याची प्रथा, रामायणाशी कनेक्शन काय?

ग्रिल्ड चिकन

जर तुम्हाला मांस, मासे किंवा चिकन खायला आवडत असेल तर ते तळण्याऐवजी ग्रील करून खा. तुम्ही शाकाहारी असाल तर मांसाऐवजी वाळलेल्या बीन्सचा समावेश करा. याशिवाय तुमच्या आहारात कमी कॅलरी असलेल्या गोष्टींचा समावेश करा. हेल्दी पद्धतीने वजन कमी करण्यासाठी नेहमी एकच पदार्थ खाऊ नका तर नेहमी वेगवेगळ्या गोष्टींचा आहारात समावेश करण्याचा प्रयत्न करा.

(वाचा :- Gas remedy : थोडंसं खाल्यावरही पोट एकदम टम्मं भरलेलं वाटतं किंवा गच्चं होतं? करा हा उपाय 2 मिनिटात शरीरातील सर्व गॅस पडेल बाहेर!)

याव्यतिरिक्त हे पदार्थ खा

1. अंजीर – हे स्नॅक्ससाठी आरोग्यदायी पर्याय मानले जातात. कारण त्यात कॅलरी आणि चरबी कमी असते. त्यामध्ये भरपूर अँटिऑक्सिडंट असतात जे तुमच्या शरीरातील पेशींमधील हानिकारक पदार्थ कमी करण्यास मदत करतात. यामुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी आपल्या आहारामध्ये अंजीरचा समावेश नक्की करा.

2. ग्रीन टी – हे एक उत्तम पेय आहे. जे वजन कमी करण्यास आणि पोटावरील चरबी बर्न करण्यास मदत करते. त्यात भरपूर अँटीऑक्सिडंट्स आणि कॅटेचिन्स देखील असतात. जे तुमच्या यकृताला चरबीच्या पेशींमधून चरबी बाहेर टाकण्यास मदत करतात. तसेच या चरबीचे ऊर्जेत रूपांतर करण्यास मदत होते. तुम्ही तुमच्या ग्रीन टीमध्ये लिंबू घालू शकता.

हेही वाचा :  मुळव्याध, पोट साफ न होणं, डायबिटीज यासारखे शरीर आतून पोखरणारे तब्बल 20 भयंकर आजार मुळापासून उपटतात या 6 गोष्टी

3. अंडी – एक शक्तिशाली सुपरफूड आहे. अंडी जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स आणि निरोगी चरबीने समृद्ध असतात, तसेच त्यात असलेले कोलीन चयापचय गतिमान करू शकते. यामुळे वजन कमी करण्याठी आणि चयापचय दर वाढवण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये अंड्याचा समावेश करणे फायदेशीर आहे.

(वाचा :- सकाळी रिकाम्या पोटी हे फळ खाल्यास आतड्यांमधील घाण, नसांमध्ये चिकटलेले कोलेस्ट्रॉल, म्हातारपण व कॅन्सरचा धोका होईल दूर!)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …