मुळव्याध, पोट साफ न होणं, डायबिटीज यासारखे शरीर आतून पोखरणारे तब्बल 20 भयंकर आजार मुळापासून उपटतात या 6 गोष्टी

प्रोटिन, जीवनसत्त्वे, कॅल्शियम, आयर्न मॅग्नेशियम, झिंक, तांबे, सेलेनियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम यांसारखी सर्व आवश्यक पोषक तत्त्वे शरीराच्या चांगल्या कार्यासाठी आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहेत. या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे तुमच्या शरीराचे प्रमुख भाग कमकुवत आणि आजारी होऊ शकतात चांगली गोष्ट म्हणजे या सर्व पोषक तत्वांनी भरलेली फळे आणि भाज्या हिवाळ्यात भरपूर उत्पादन करतात. लक्षात घ्या की हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होण्याचा आणि व्हायरल इनफेक्शन होण्याचा धोका देखील दुप्पटीने वाढतो.

अशा परिस्थितीत, आपल्या आहारात त्या सर्व गोष्टींचा समावेश असणे खूप महत्वाचे आहे, जे आपल्या शरीराला आतून आणि बाहेरून मजबूत बनवून रोगांपासून दूर ठेवू शकतात. आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार यांनी थंडीत आढळणाऱ्या अशा काही गोष्टींबद्दल सांगितले आहे, ज्या तुम्हाला Diabetes, Cancer, Obesity, किडनीचे आजार, त्वचा रोग, ऑस्टिओपोरोसिस आणि पचनाच्या विकारांपासून दूर ठेवण्यास मदत करू शकतात. (फोटो सौजन्य :- iStock)

कोथिंबीर

कोथिंबीर

हिरवी कोथिंबीर वर्षभर उपलब्ध असली तरी थंडीच्या ऋतूत त्याचे भरपूर उत्पादन मिळते. कोथिंबीर जेवणाची चव आणि प्रेझेन्टेशन दोन्ही वाढवण्याचे काम करते. पण तुम्हाला माहित आहे का कोथिंबीर फायबरसाठी देखील एक उत्तम पर्याय आहे? तसेच डोळे, हृदय, त्वचा आणि यकृत यांच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. कोथिंबीर भूक वाढवण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करते. तुमच्या यकृतासाठी डिटॉक्स म्हणून काम करते.

हेही वाचा :  अचानक 'औरंग्या'च्या इतक्या अवलादी कुठून पैदा झाल्या? देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला सवाल

(वाचा :- 2023 Budget – खनिज व व्हिटॅमिनचं भांडार आहेत हे पदार्थ, रोज खाल्ले तर वयाच्या 60 नंतरही होणार नाहीत गंभीर आजार)​

हिरवी लसूण आणि कांदा

हिरवी लसूण आणि कांदा

लसूण आणि कांदा हे कच्चे मसाले असले तरी प्रत्येकजण जेवणात ते वापरतातच. परंतु जेव्हा त्यावर हिरवी पाने येतात तेव्हा त्यांची पोषकता आणि चव अधिक असते. या दोन्ही गोष्टी कोलेस्ट्रॉल कमी करण्यास, शरीरातील जळजळ कमी करण्यास आणि सर्दी, खोकला आणि फ्लूपासून संरक्षण करण्यास मदत करतात.

(वाचा :- शास्त्रज्ञांचा शोध – हाडांचा भुगा होऊ नये म्हणून Vitamin D नाही ही 1 गोष्ट खाणं गरजेची, प्रत्येक घरी सहज मिळते)​

हिरवे मटार

हिरवे मटार

वाटाणे हे प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत आहे. व्हिटॅमिन के आणि सी, लोह आणि मॅंगनीज सारखी खनिजे देखील त्यात मोठ्या प्रमाणात आढळतात. इतकेच नाही तर मटारचे छोटे दाणे अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतात, जे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे काम करतात.

(वाचा :- आरोग्य मंत्र्याला गोळी झाडून ठार करणा-या पोलिसाला हा भयंकर आजार, हे रूग्ण छोट्याशा गोष्टीसाठी करतात थेट हत्या)​

टोमॅटो

टोमॅटो

व्हिटॅमिन सी ने समृद्ध असलेले टोमॅटो केवळ जेवणाची चवच वाढवत नाही तर ते त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि ऊर्जा वाढवण्यासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण योगदान देते. मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांसाठी टोमॅटो हा उत्तम पर्याय आहे. दृष्टी वाढवण्यासाठी आणि पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यासाठी टोमॅटो खाण्याचा सल्ला जाणकार देखील देतात.

हेही वाचा :  कॉंग्रेसला खिंडार पाडण्याच्या तयारी! भाजपकडून ऑफर आल्याचा ज्येष्ठ नेत्याचा गौप्यस्फोट

(वाचा :- आतड्यातील विषारी घाण झटक्यात काढून फेकतात हे 5 पदार्थ, गॅस, अपचन, पोट साफ न होणं सर्व समस्यांचा उपाय किचनमध्ये)

बोर

बोर

बोर हे असे फळ आहे, जे बद्धकोष्ठता दूर करण्याचे काम करते. हे रक्तदाब नियंत्रित करू शकते, चिंता दूर करू शकते आणि चांगली झोप देखील देऊ शकते. या हिरव्या फळामध्ये मॅग्नेशियम, तांबे, मॅंगनीज आणि पोटॅशियम सारखे आवश्यक पोषक घटक असतात, जे ऑस्टियोपोरोसिसशी लढतात आणि हाडांचे आरोग्य सुधारतात.

(वाचा :- या 3 चुकांमुळे तांब्याच्या भांड्यातील पाणी होतं विषारी, पिताच सर्व अवयवांत पसरतात अनेक रोग व होतात भयंकर वेदना)

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

अनेक आजारांवर उपाय आहेत हे पदार्थ



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …