थंडीत दुप्पट वेगाने वाढतं खराब कोलेस्ट्रॉल, चुकूनही खाऊ नका हे 6 पदार्थ

कोलेस्टेरॉल (Cholesterol) एक वेगाने वाढणारी गंभीर समस्या आहे. कोलेस्टेरॉल रक्तात आढळणारा एक पदार्थ आहे जो चांगला (Good Cholesterol) आणि वाईट (Bad Cholesterol) दोन्ही प्रकारचा असतो. शरीराने उत्तम काम करावे म्हणून गुड कोलेस्टेरॉलची खूप जास्त गरज असते तर बॅड कोलेस्टेरॉल मात्र शरीराचा शत्रू असतो. यामुळे हृदयाचे गंभीर आजार, हृद्यविकाराचा झटका (Heart Attack) आणि हार्ट स्ट्रोक (Heart Stroke) सारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

लिव्हरमधून सुद्धा कोलेस्टेरॉलची निर्मिती होते आणि आपण जे अन्न पदार्थ खातो त्यातून देखील हे तयार होते. असे म्हणतात की जास्त फॅट, तेल, मसाले आणि कॅलरी असलेले पदार्थ खाल्ले तर कोलेस्टेरॉल मोठ्या प्रमाणावर निर्माण होते. खाण्याशिवाय कोणत्याही प्रकारची शारीरिक मेहनत न करणे यामुळे सुद्धा कोलेस्टेरॉल वाढते. हिवाळ्यात कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोका जास्त असतो. जाणकारांच्या मते ज्या पद्धतीने थंडीच्या दिवसांत हृद्य रोगांचा धोका वाढतो त्याचप्रमाणे थंडीत रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण देखील वाढते. हेच कारण आहे की हिवाळ्याच्या दिवसांत काही विशिष्ट पदार्थ न खाण्याचा व व्यायाम करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

कोलेस्टेरॉलची लक्षणे काय आहेत?

गंभीर गोष्ट हीच आहे की शरीरात कोलेस्टेरॉलचे कोणतेच स्पष्ट लक्षण दिसत नाहीत त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढले आहे का आणि किती वाढले आहे हे आपण लगेच ओळखू शकत नाही. वास्तवात कोलेस्टेरॉल वाढल्याने रक्त वाहिन्या म्हणजेच रक्ताच्या नसांमध्ये अडथळा निर्माण होती आणी त्यामुळे शरीरातील रक्त प्रवाह हा स्लो होतो.या व्यतिरिक्त असे काही संकेत आहेत जे तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉल वाढले आहे असे सांगतात. ते संकेत नेमके कोणते आहेत हेच आपण आज या लेखातून जाणून घेणार आहोत.

हेही वाचा :  Symptoms of High Cholesterol : कोलेस्ट्रॉल वाढल्यावर येऊ शकतो हार्ट अटॅक, कोलेस्ट्रॉल वाढल्यास डोळ्यांवर दिसतात 'ही' लक्षणे, लगेच करा चेकअप!

(वाचा :- अर्जेंटिनाचा फुटबॉलर मेस्सीला बालपणीच झाला उंची खुंटवणारा गंभीर रोग, उंची वाढत नसल्यास द्या या लक्षणांकडे लक्ष)

हिवाळ्यात वाढते कोलेस्टेरॉल

अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डियोलॉजीने सदर केलेल्या एका रिपोर्टनुसार, ही गोष्ट समोर आली आहे की, थंडीच्या दिवसांत अन्य ऋतूंच्या तुलनेमध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. पुरूषांमध्ये हे कोलेस्टेरॉल थंडीच्या दिवसांत 4 mg/dl एवढे वाढू शकते तर स्त्रियांमध्ये 2 mg/dl एवढे ववाढू शकते. ही वाढ क्रमश: 3.5 आणि 1.7 टक्के एवढी असते. एवढेच नाही तर उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात पुरूषांच्या शरीरातील ट्राइग्लिसराइड्स 2.5 टक्के एवढे वाढते.

(वाचा :- Pancreatic Cancer: अग्नाशय कॅन्सर हाडांत पसरला की दिसतात ही भयंकर लक्षणं, अपचन समजून चुकूनही करू नका दुर्लक्ष)

गोड पदार्थ

हिवाळ्यात गोड जास्त खाण्याची इच्छा होते. लोक अनेकदा चहा आणि कॉफी यांचे या काळात खूप जास्त सेवन करतात. अनेक जण या पदार्थांऐवजी मग आईसक्रिम, केक, पेस्ट्री, कुकीज, मिठाई आणि गजर हलवा यांसारखे गोड पदार्थ देखील खातात. या गोष्टींमध्ये सेच्युरेटेड फॅटची मात्रा मोठ्या प्रमाणावर असते. नेहमी लक्षात ठेवा की शुगरचे अधिक सेवन केल्याने तुमच्या शरीरात ट्राइग्लिसराइड्स आणि बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण वेगाने वाढते.

(वाचा :- Hibiscus for Cancer Treatment : हे छोटंसं व सुंदर फुल आहे भयंकर कॅन्सरवर रामबाण उपाय, कुठेही दिसलं तर घरी आणाच)

हेही वाचा :  रोनाल्डोच्या गर्लफ्रेंडने दिलं भलंमोठं सरप्राईज, तुम्हीही म्हणाल गर्लफ्रेंड हवी तर अशीच

रेड मिट

हिवाळ्यात शरीरामध्ये उष्णता वाढवण्यासाठी लोक मांसचे सेवन वाढवतात. तुम्ही सुद्धा असे करत असाल तर तुम्हाला ही गोष्ट माहित असायला हवी की रेड मीट मध्ये कोलेस्टेरॉल आणि सेच्युरेटेड फॅटची मात्रा अधिक असते. जे व्यक्ती पहिल्यापासून कोलेस्टेरॉलने लढत आहेत त्यांच्यासाठी तर ही गोष्ट अधिकच धोकादायक ठरू शकते. म्हणून हिवाळ्यात रेड मीट कधीच खाऊ नये. या ऐवजी तुम्ही ओमेगा-3 फॅटी एसिडने भरपूर अशी मच्छी आणि चिकन खाऊ शकता.

(वाचा :- Winter Weight Loss: थंडीत व्यायाम व डाएट न करता होईल झटपट वेटलॉस व Belly Fat बर्न, पाण्यासोबत प्या हा एक पदार्थ)

तळलेले पदार्थ

हिवाळ्यात लोकं तळलेले गरमागरम पदार्थ खाण्यावर जास्त भर देतात जसे की सामोसे, वडापाव, भजी, फ्राईज वगैरे आणि असे पदार्थ खायला मज्जा देखील खूप येतेच, पण ही मज्जा सजा सुद्धा होऊ शकते. म्हणून हे पदार्थ जरी खात असाल तरी ते लिमिट मध्येच खावेत. कारण त्यांचे अतिसेवन हे खूप जास्त धोकादायक ठरू शकते. हे सर्व तळलेले पदार्थ कोलेस्टेरॉल वाढवण्याचे काम करतात. कारण या पदार्थांमध्ये मीठाची मात्रा अधिक असते.

(वाचा :- Winter Vitamin D: थंडीत सुर्यप्रकाश नसल्याने शरीराला मिळत नाही व्हिटॅमिन डी, झपाट्याने तुटतात हाडे,करा हे उपाय)

फास्ट फूड

फास्ट फूडचे सेवन लठ्ठपणा, हृदय रोग आणि मधुमेह यांसारख्या आजारांचे प्रमुख कारण आहे. बर्गर, पिझ्झा यांसारख्या पदार्थ केवळ कोलेस्टेरॉलच वाढवत नाहीत तर शरीरातील ब्लड शुगरचे नियंत्रण देखील बिघडवते. म्हणून फस्त फूड पासून शक्य तितके लांब राहणेच उत्तम. जेवढे तुम्ही कमी फास्ट फूड खाल तेवढे जास्त हेल्दी राहाल आणि निरोगी आयुष्य जगाल.

हेही वाचा :  सायंटिस्ट दावा, नसांत साचलेलं घाण विषारी कोलेस्ट्रॉल झटक्यात बाहेर फेकतो कांदा, असा करा वापर

(वाचा :- Weight Loss Drink : नवीन वर्षात हवीये सडपातळ कंबर व सपाट पोट? मग पाण्यात घालून प्या हा घरगुती पदार्थ, बघा कमाल)

चीज

जरी चीज कॅल्शियम आणि प्रथिनांचा एक उत्तम स्त्रोत आहे, परंतु त्यात संतृप्त चरबी देखील जास्त आहे. हिवाळ्यात याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यात भरपूर मीठ देखील असते, ज्यामुळे तुमचा रक्तदाब वाढू शकतो. कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी हिवाळ्यात चीजचे सेवन मर्यादित करा.

(वाचा :- दूध व हे 5 पदार्थ चुकूनही खाऊ नका, शरीराची होईल अशी वाईट अवस्था की डॉक्टरही मानतील हार, Ayurveda Dr मानतात विष)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Pune Loksabha : ना भोंगा ना रिक्षा; पुणे तिथे ‘प्रचार’ उणे, मतदानाच्या टक्केवारीवर होणार परिणाम?

Pune Political News : ना भोंगा फिरवणारी रिक्षा, ना पथनाट्य कलावंतांचा टेम्पो.. ना रॅली ना …

कोकणात सामंत बंधूंमधील वाद चव्हाट्यावर? उदय सामंत म्हणाले ‘जर माझ्या मोठ्या भावाने फोटो काढला…’

कोकणातील सामंत बंधूंमधील (Samant Brothers) वाद चव्हाट्यावर आला आहे. किरण सामंत (Kiran Samant) यांच्या कार्यकर्त्यांनी …