Lower Cholesterol Diet : वयाच्या 30 शीतच खायला सुरू करा ‘हे’ 5 पदार्थ, म्हातारपणापर्यंत शरीरात घुसणार नाही हार्ट अटॅकला जबाबदार कोलेस्ट्रॉल..!

जसजसे वय वाढत जाते तसतसे शरीरातील अनेक अवयव कमकुवत होऊ लागतात. उदाहरणार्थ, हृदयाच्या भिंती जाड होतात, हाडे कमकुवत होतात आणि धमन्या किंवा रक्तवाहिन्या कडक होतात. यामुळे हृदयाशी संबंधित अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. विशेषतः वयाच्या 30 नंतर शरीरात असे बदल जास्त होतात. वाढत्या वयानुसार, हृदयाशी संबंधित विकारांचे सर्वात मोठे कारण म्हणजे कोलेस्टेरॉल वाढणे. शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची वाढ अनेक घटकांवर अवलंबून असते ज्यात आनुवंशिकता, धूम्रपान, अतिप्रमाणात मद्यपान, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि वाढलेले वजन इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.

लक्षात ठेवा की शरीरातील कोलेस्टेरॉल वाढल्याने तुम्हाला अनेक हृदयविकार जसे की स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका यांसारख्या जीवघेण्या आजारांचा धोका होऊ शकतो. कोलेस्टेरॉलचा धोका कमी करण्यासाठी टिप्स म्हणून डॉक्टर आणि हेल्थ एक्सपर्ट्स वयाच्या 30शी नंतर आरोग्याची जोखीम वाढवणाऱ्या गोष्टी सोडण्याची आणि आरोग्यदायी गोष्टींचे सेवन वाढवण्याची शिफारस करतात. सुदैवाने, कोलेस्टेरॉल शरीरात जाण्यापासून रोखण्यासाठी काही आरोग्यदायी पदार्थ अस्तित्वात आहेत जे वयाच्या 30 शी नंतर तुम्ही तुमच्या आहारात समाविष्ट करू शकता. (फोटो साभार: istock by getty images)

हेही वाचा :  Immunity booster foods : इम्युनिटी होईल 100 पट मजबूत, डाएटिशियनने सांगितले ब्रेकफास्ट, लंच व डिनरमध्ये काय खाणं गरजेचं..!

विद्रव्य फायबर खा

यासाठी विद्राव्य फायबरचे सेवन वाढवावे. हे ओट्स, सफरचंद आणि पेर यांसारख्या फळांमध्ये आणि अनेक प्रकारच्या शेंगांमध्ये आढळते. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी हे उत्तम पोषक तत्व आहेत. ‘स्पोर्ट्स न्यूट्रिशन प्लेबुक’चे लेखक एमी गुडसन यांचं असं मानणं आहे की हे एक पोषक तत्व आहे जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करू शकते कारण ते पाण्यात मिक्स होऊन किंवा विरघळून जेलसारखे पदार्थ तयार करतात.

(वाचा :- Unusual Symptoms of Diabetes : सावधान, ‘ही’ 5 विचित्र लक्षणे दिसल्यास व्हा ताबडतोब सावध, असू शकते डायबिटीजची सुरूवात, दुर्लक्ष केल्यास होईल पश्चाताप!)

हेल्दी फॅट खा

या वयानंतर तुम्ही अन्नामध्ये हेल्दी फॅट घेतले पाहिजे. आहारातील सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण कमी करावे, कारण यामुळे खराब कोलेस्ट्रॉल वाढू शकते. तळलेले अन्न टाळावे. त्याऐवजी पॉलीअनसॅच्युरेटेड आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स असलेल्या गोष्टी खाव्यात. यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईल, कॅनोला ऑइल, लीन मीट, नट्स, एवोकॅडो आणि मासे यासारख्या गोष्टी खाऊ शकता.

(वाचा :- आहे त्या वयापेक्षा 10 ते 15 वर्षांनी दिसाल लहान व तरूण, डाएटिशियनने सांगितलेल्या ‘या’ टिप्स करा ताबडतोब फॉलो..!)

हेही वाचा :  Blood sugar : सावधान, रक्तातील साखरेची उच्च पातळी तुमच्या डोळ्यांवर करेल भयानक परिणाम

फळे व भाज्या खा

जर तुम्हाला कोलेस्ट्रॉल कमी करायचे असेल तर फळे आणि भाज्यांचे सेवन जास्तीत जास्त करावे. फळे आणि भाज्यांचे सातत्याने सेवन केल्याने शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करणारी संयुगे वाढू शकतात, ज्यांना प्लांट स्टॅनॉल किंवा स्टेरॉल म्हणतात, जे विद्रव्य फायबरसारखे कार्य करतात.

(वाचा :- किडनीमध्ये चिकटलेले विषारी पदार्थ व घाण बाहेर काढून किडनी हेल्दी व मबजूत बनवतात ‘या’ 8 भाज्या..!)

गोड पेय पदार्थ पिणं बंद करा

जास्त साखर खाल्ल्याने कालांतराने कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते यावर तज्ञ देखील सहमत आहेत. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की जे जास्त साखरयुक्त पेये घेतात त्यांना ट्रायग्लिसराईड होण्याची शक्यता 53% जास्त असते.

(वाचा :- Dal Bhat Or Dal Chapati : डाळ-भात की भाजी-चपाती? डाएटिशियनकडून जाणून घ्या झटपट वजन घटवण्यासाठी कोणतं कॉम्बिनेशन आहे सर्वात बेस्ट?)

कमी खा आणि थोड्या थोड्या अंतराने खा

वयाच्या 30 शीनंतर, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी दिवसभरात कमी प्रमाणात आणि थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने जेवणे आवश्यक आहे. संशोधनात असे दिसून आले आहे की जे लोक त्यांच्या शरीराचे वजन 5-10% कमी करतात ते त्यांचे एकूण आणि खराब कोलेस्टेरॉल कमी करू शकतात. वजन कमी करण्यासाठी थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने आणि कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो.

हेही वाचा :  महाराष्ट्रात महाराजांच्या वाघनखांचा राजकीय कोथळा! वाघनखं आणण्यासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार लंडनला रवाना

(वाचा :- Summer foods for Cholesterol : सावधान, वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे वाढतो हार्ट स्ट्रोक व हार्ट अटॅकचा धोका, आताच खायला घ्या ‘हे’ 6 पदार्थ!)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ठाणे पालिकेतील सफाई कर्मचारी महिलेचा मुलगा बनला अधिकारी, UPSC साठी ‘अशी’ केली तयारी

UPSC Success Story: आपल्या मुलाने चांगल शिक्षण घेऊन मोठा अधिकारी व्हावं असं प्रत्येक आईला वाटत …

चंद्र एकाच जागी स्थिरावणार; तब्बल इतक्या वर्षांनी आकाशात दिसणार भारावणारं दृश्य

Lunar Standstill : चंद्र… इथं पृथ्वीवर प्रेमाच्या आणाभाकांपासून खगोलीय घटनांपर्यंत महत्वाच्या भूमिकांमध्ये आणि रुपांमध्ये हा …