सायंटिस्ट दावा, नसांत साचलेलं घाण विषारी कोलेस्ट्रॉल झटक्यात बाहेर फेकतो कांदा, असा करा वापर

Cholesterol वाढणे ही एक गंभीर समस्या आहे, यामुळे तुम्हाला हृदयविकार, Heart Attack आणि Heart Stroke चा धोका होऊ शकतो. कोलेस्टेरॉल दोन प्रकारचे असतात. गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल! शरीराच्या चांगल्या कार्यासाठी गुड कोलेस्टेरॉल आवश्यक आहे परंतु समस्येचे खरे मूळ हे बॅड कोलेस्ट्रॉल आहे. रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात शास्त्रज्ञांना असे मत मांडले आहे की, कांद्याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते.

मात्र या शिवाय सुद्धा कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी तज्ज्ञ आणि डॉक्टर सांगतात की निरोगी पदार्थ खाणे आणि दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे. अनेकदा लोक कोलेस्ट्रॉल कमी करणारी औषधेही खातात. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आयुष्यभर औषधांवर अवलंबून राहायचे नसेल तर कांद्याचे सेवन सुरू करावे. कांद्याचे कोणते गुणधर्म आहेत आणि ते कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी कसे उपयोगी ठरू शकते ते जाणून घेऊया. (फोटो सौजन्य :- iStock)

कोलेस्ट्रॉल आहे तरी काय?

कोलेस्ट्रॉल आहे तरी काय?

कोलेस्ट्रॉल हा एक मेणासारखा, चिकट पदार्थ आहे जो आपल्या शरीरामधील रक्तवाहिन्यांमध्ये तयार होतो. मुळात आपण जे काही पदार्थ सेवन करतो त्यातूनच कोलेस्ट्रॉल तयार होते. असे म्हणतात की जेव्हा कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते तेव्हा त्यामुळे शिरा ब्लॉक होतात. यामुळे रक्तप्रवाह थांबतो आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
(वाचा :- Yoga for Sleep: झटक्यात पोट साफ होते, चिंता व स्ट्रेस मुळापासून उपटून अंथरूणात पडताच सुखाची झोप देतात हे 5 उपाय)​

हेही वाचा :  ही लक्षणे दिसताच समजून जा नसांमध्ये अडकलाय High Cholesterol, उशिर व्हायच्या आधीच खायला सुरू करा हे ५ पदार्थ

कांदा आहे प्रभावी

कांदा आहे प्रभावी

चीनी संशोधकांनी कांद्याचा कोलेस्ट्रॉलवर होणाऱ्या परिणामाबाबत एक अभ्यास केला आहे. संशोधकांना ह्या अभ्यासात आढळून आले की कांदा गुड कोलेस्ट्रॉल राखून आणि शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल काढून टाकून हृदयविकाराचा धोका कमी करू शकतो.
(वाचा :- Amitabh Bachchan यांना झाला Callus आजार, तळव्याच्या या आजाराने आहेत भयंकर वेदनेत, यामागची 5 कारणं आणि उपाय काय)​

कमी झाले उंदरांमधले कोलेस्ट्रॉल

कमी झाले उंदरांमधले कोलेस्ट्रॉल

कांदे कोलेस्ट्रॉल कसे कमी करू शकतात हे शोधण्यासाठी संशोधकांनी उंदरांवर अभ्यास केला. त्यांनी 8 आठवडे उंदरांच्या एका गटाला कांद्याची पूड सेवन करायला दिली. त्यात संशोधकांना असे आढळले की या कालावधीनंतर तउंदरांच्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल 11.2 ते 20.3 टक्क्यांनी कमी झाले आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढले.
(वाचा :- Liver Damage: पोटाच्या या भागावर स्पर्श करून ओळखा लिव्हर झालं खराब, ही 9 लक्षणं दिसल्यास ताबडतोब करा हे 5 उपाय)​

कांद्याने कसे कमी होते कोलेस्ट्रॉल

कांद्याने कसे कमी होते कोलेस्ट्रॉल

NCBI वर प्रकाशित झालेल्या आणखी एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, कांद्यामध्ये quercetin नावाचे महत्त्वाचे संयुग असते. हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. कांदे सूज रोखतात आणि रक्तवाहिन्या मजबूत करतात. आणि हीच गोष्ट उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते.
(वाचा :- भारतावर H3N2 व COVID-19 चा डबल अटॅक, डॉक्टरांची चेतावणी – 5 पद्धतींनी लक्षणांतील फरक ओळखून लगेच करा हे 8 उपाय)​

हेही वाचा :  पावसाळ्यात साप चावल्यास घाबरुन जाऊ नका, असा करा बचाव!

कांद्याचा वापर कसा करावा?

कांद्याचा वापर कसा करावा?

शास्त्रज्ञांनी त्यांच्या अभ्यासपूर्ण संशोधानावेळी कांद्याची पावडर वापरली, जी त्यांनी कांदे उकळून आणि वाळवून तयार केली होती. कांदा खाण्याचे इतरही मार्ग आहेत जसे की तुम्ही त्याची भाजी बनवा, कोशिंबीर मध्ये कांदा वोरा किंवा कोणत्याही सँडविच किंवा बर्गरसोबत कांदा खा. तुम्हाला खाण्याच्या इतर पद्धती माहित असतील तर त्यात कांदा टाका. तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही सुद्धा कांदा पावडर तयार करून वापरू शकता.
(वाचा :- डायबिटीजचे दुश्मन आहेत नैसर्गिक इन्सुलिन वाढवणारी ही 5 ड्रिंक्स, कितीही गोड खाल्लं तरी वाढतच नाही Blood Sugar)​

कांद्यामधील पोषक तत्वे

कांद्यामधील पोषक तत्वे

तुमच्याही मनात हा प्रश्न आला असेल की कांद्यांमध्ये अशी कोणती पोषक तत्वे असतात? तर मंडळी कांद्यांमध्ये जीवनसत्त्वे ए, सी आणि ई, पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, फायबर, कार्बोहायड्रेट, क्वेर्सेटिन आणि प्रथिने यांसारखे अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात. कांद्याचे सेवन मधुमेह नियंत्रित करणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, त्वचा आणि केसांच्या समस्या सोडवणे इत्यादीसाठी फायदेशीर आहे.

(वाचा :- हार्ट अटॅक येण्याआधी कोलेस्ट्रॉल व ट्राईग्लिसराईड एका झटक्यात फेकतं गाळून बाहेर, खा हे बाराही महिने मिळणारं फळ)
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

हेही वाचा :  पोटात या ५ पातळ पदार्थांमुळे तयार होतो घाणेरडा कोलेस्ट्रॉल, कधी पण येऊ शकतो Heart Attack

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रात पुन्हा ‘सैराट’! लव्ह मॅरेजला विरोध करत आई-वडिलांनीच केली लेकीची हत्या

Maharashtra Crime News: महाराष्ट्राला हादरवणारी घटना परभणीत घडली आहे. प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडिलांनीच पोटच्या …

राज ठाकरे खरंच दुपारी झोपेतून उठतात का? स्वत: खुलासा करत म्हणाले, ‘माझ्याबद्दल…’

Raj Thackeray Morning Wake Up Time: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या त्यांनी लोकसभा …