मुळापासून उपटून टाका घाणेरडं कोलेस्ट्रॉल, आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले १० टिप्स

हाय कोलेस्ट्रॉल लेवल (High Cholesterol Level) मुळे हृदयाच्या आरोग्यावर खूप गंभीर परिणाम होऊ शकतो. रक्तात जमा झालेला हा घाणेरडा पदार्थ हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि हृदयाशी संबंधित आरोग्यांकरता कारणीभूत असतो. यामुळे झपाट्याने आरोग्याशी संबंधीत समस्या निर्माण होतात. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, बैठी जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. चुकीच्या जीवनशैलीचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो.

कोलेस्ट्रॉल हा मेणासारखा चिकट पदार्थ आहे. जो चरबीयुक्त पदार्थांच्या अतिसेवनामुळे रक्ताच्या नसांमध्ये जमा होतो. यामुळे, रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो आणि रक्त प्रवाह मंदावतो. ज्यामुळे अनेक रोगांचा धोका वाढतो.

कोलेस्ट्रॉलवर आयुर्वेदिक उपचार काय आहेत? कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे अनेक मार्ग आहेत. परंतु सर्वप्रथम तुम्ही चरबीयुक्त पदार्थांपासून दूर राहावे. यापदार्थाचे चरबीत रुपांतर होण्याआधीच व्यायामाच्या माध्यमातून ते बाहेर काढून टाकावे. यासाठी दररोज न चुकता व्यायाम करावा. कोलेस्ट्रॉलवर आयुर्वेदिक उपचारही आहेत. नोएडा येथील E-260 सेक्टर 27 येथे असलेल्या ‘कपिल त्यागी आयुर्वेद क्लिनिक’चे संचालक डॉ कपिल त्यागी तुम्हाला काही आयुर्वेदिक उपाय सांगत आहेत. ज्यामुळे कोलेस्ट्रॉल 5 दिवसात बरे होऊ शकते. (फोटो सौजन्य – iStock)

लसूण

लसूण

लसणात सल्फर आढळते. हे असे पोषक तत्व आहे, जे उच्च कोलेस्ट्रॉल पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. यावर घरगुती उपाय म्हणजे 6-8 पाकळ्या लसूण बारीक करून 50 मिली दूध आणि 200 मिली पाण्यात उकळून घ्या.

हेही वाचा :  लावणी सम्राज्ञी शांताबाई कोपरगावकर यांच्या मदतीला सरसावले अनेक हात; महिला आयोगाकडून दखल

​(वाचा – चहामध्ये आहेत आरोग्याचे असंख्य फायदे, मात्र चुकूनही करू नका ही गोष्ट, पोटात खोलवर होतील जखमा)​

मध खा

मध खा

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मध रक्त वाहिन्यांमध्ये खराब कोलेस्ट्रॉल जाण्यापासून थांबवतात. याकरता दररोज 1 कप गरम पाण्यात १ चमचा मध, लिंबूचा रस आणि सफरचंदाचे व्हिनेगरचे काही थेंब मिसळा आणि ते प्या.

​ (वाचा – १० प्रकारच्या लोकांनी दुधाला तोंडही लावू नये, हाडांमधील कॅल्शियम खेचून निघेल, कॅन्सरचाही धोका, रिसर्चमध्ये दावा)​

मेथी खा

मेथी खा

मेथीच्या बियांमध्ये पोटॅशियम, लोह, जस्त, कॅल्शियम आणि इतर पोषक तत्व असतात. ज्यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलचे शोषण कमी होते. यासाठी एक चमचा मेथी पावडर दिवसातून दोनदा कोमट पाण्यासोबत घ्या.

​(वाचा – मिनी हार्ट अटॅक अधिक धोकादायक, त्याची लक्षणे इतर रोगांसारखी दिसतात, त्वरीत करा हे काम)​

हळद फायदेशीर

हळद फायदेशीर

हळद हा एक असा मसाला आहे जो रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर जमा होणारा प्लेक कमी करतो आणि नसांमध्ये जमा होणारे कोलेस्टेरॉल तोडतो. यासाठी कोमट पाण्यात हळद मिसळून पिऊ शकता.

(वाचा – नाभी सरकणे, नळ भरणे या समस्येवर आयुर्वेदाचा तगडा उपचार, बद्धकोष्ठता-सततच्या पोटदुखीवर ५ घरगुती उपाय)

हेही वाचा :  हार्ट अटॅक येण्याआधी कोलेस्ट्रॉल एका झटक्यात फेकतं गाळून बाहेर,खा हे 12 ही महिने मिळणारं फळ

धणे

धणे

धणे त्याच्या हायपोग्लाइसेमिक प्रभावामुळे उच्च कोलेस्ट्रॉल कमी करू शकते. धणे मधुमेहाच्या रुग्णांसाठीही गुणकारी असून रक्तातील साखर कमी करण्याचे काम करतात. यासाठी १ कप पाण्यात २ चमचे हळद टाकून उकळा. दूध, साखर आणि वेलची पावडर एकत्र करून दिवसातून दोनदा प्या.

(वाचा – वजन कमी करण्यासाठी वापरली जाते बुलेट कॉफी? या कॉफीचे फायदे आणि शरीरावर होणारा परिणाम)​

सफरचंद

सफरचंद

सफरचंद पेक्टिनमध्ये समृद्ध असतात आणि त्यात फ्लेव्होनॉइड्स नावाचे नैसर्गिक अँटिऑक्सिडंट असतात. जे उच्च कोलेस्टेरॉलची पातळी कमी करतात आणि तुमचे फुफ्फुस आणि हृदय देखील निरोगी ठेवतात. यासाठी रोज एक सफरचंद खा.

(वाचा – Rose Day 2023 : वेट लॉस, एनर्जी बुस्टर, स्किन ग्लो गुलाबाचे ८ जबरदस्त आरोग्यदायी फायदे)​

बीटरूट

बीटरूट

बीटरूटमध्ये कॅरोटीनॉइड्स आणि फ्लेव्होनॉइड्स असतात जे एलडीएल म्हणजेच गलिच्छ कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. ही अशी भाजी आहे, जी रक्तातील साखर आणि रक्तदाब देखील नियंत्रित करू शकते. यासाठी तुम्ही याचा समावेश सॅलडमध्ये करू शकता किंवा त्याचा रस पिऊ शकता.

​(वाचा – आतड्यांना पिळवटून टाकणाऱ्या मुळव्याधावर आयुर्वेदिक उपाय, ऑपरेशनशिवाय व्हाल बरे)​

हेही वाचा :  Maharashtra Unseasonal Rain : राज्यात पुढचे 2 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा; शेती, द्राक्ष आणि फळबागांचं नुकसान, शेतकरी हवालदिल

सफरचंद व्हिनेगर

सफरचंद व्हिनेगर

ऍपल सायडर व्हिनेगर उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते आणि किमान एक महिना दिवसातून 2-3 वेळा सेवन केले जाऊ शकते. याचा वापर करण्याचा मार्ग म्हणजे एक ग्लास पाण्यात 1 चमचे सफरचंद सायडर व्हिनेगर मिसळा आणि ते नियमितपणे प्या. या व्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या आहारात पालकाचा समावेश करू शकता आणि दालचिनी आणि मधाच्या मिश्रणाने तयार केलेला चहा दिवसातून दोनदा घेऊ शकता.

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बारामतीत पोलीस बंदोबस्तात पैशांचा पाऊस’, ‘मध्यरात्रीनंतरही बँक सुरु’; कारमध्ये 500 च्या नोटा

Loksabha Election 2024 Baramati Constituency: बारामती मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मतदारांना पोलीस संरक्षणामध्ये पैसे वाटप झाल्याचा गंभीर …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …