Maharashtra Unseasonal Rain : राज्यात पुढचे 2 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा; शेती, द्राक्ष आणि फळबागांचं नुकसान, शेतकरी हवालदिल

Maharashtra Unseasonal Rain : उन्हाळा सुरु झाला असल्या तरी राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहर केला आहे. गारपीट, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरांचं आणि पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका विदर्भ, मराठवाडा आणि नाशिक जिल्ह्याला बसला आहे. (maharashtra unseasonal rain video)

पुढचे दोन दिवस संपूर्ण राज्यात पावसाचा इशारा देण्यात आलाय. मराठवाड्यातल्या धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये गारपीटीचा इशारा देण्यात आलाय. तर विदर्भ,  उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रात  वादळी वा-यासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय. दरम्यान मराठवाडा आणि विदर्भात ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. 

नाशिक 

नाशिकच्या सटाण्यात गारपीट झालीय. सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला. वादळी वाऱ्यासह बोराच्या आकाराच्या गारा बसरल्याने करंजाड, अखातवाडे, भुयाने, बिजोटे, पारनेर परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं.  डाळिंब, काढणीला आलेला कांदा, फळबागा, भाजीपाला पिकांना या पावसाचा फटका बसलाय. (maharashtra unseasonal rain news weather updates warning rain next two days maharashtra houses damages crops in marathi)

बीड

बीड जिल्ह्यात तुफान वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यानं अतोनात नुकसान झालंय. तब्बल एक तास इथं मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे शेतीपिकाचं प्रचंड नुकसान झालय.. वादळी वा-यामुळे मोठ मोठी झाडं उन्मळून पडली आहेत तर काही घरावरील पत्र उडून गेलेत.  केज तालुक्यातील काही गावांमध्ये वादळी वाऱ्यासह गाराचा पाऊस पडला. यात अंबा ,कांदा ,उन्हाळी सोयाबीन,टरबूज, खरबूजासह भाजीपाला शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. 

हेही वाचा :  घरात पार्टी सुरु असताना चिमुकलीच्या घश्यात अडकला मांसाचा तुकडा; 3 वर्षाच्या मुलीचा दुर्देवी अंत

अहमदनगर 

अहमदनगर शहरासह परिसरामध्ये वादळ वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झालीय. आठ वाजेच्या सुमारास पाऊस आणि गारा पडण्यास सुरुवात झाली, तब्बल 15 ते 20 मिनिटे शहरामध्ये गारपीट झाली. शहरातील काही भागात गारांचा खच साचला.  गारपिटीमुळे बहरात आलेल्या फळबागांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. तर पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये मक्याच्या बिया इतक्या आकाराच्या गारा पडल्या आहेत.

अकोला 

अकोला जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वा-यासह जोरदार पाऊस झाला… यामुळे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील फळबागेचे प्रचंड मोठं नुकसान झालंय…. यामध्ये चिकू, आंबा, लिंबू फळबागेचे मोठे नुकसान झालंय….

हिंगोली

हिंगोली जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली…  त्यामुळे हळद पीक काढणी सुरू असताना पावसाचं घोंगावत असलेलं संकट शेतक-यांना पुन्हा अडचणीत टाकणारं आहे… यामुळे शेती पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जातेय…

पंढरपूर

माळशिरस तालुक्यातील गिरवी, इस्लामपूर या भागात मेघगर्जनेसह मुसळधार अवकाळी पावसाने हजेरी लावली. इस्लामपूर येथे झाडावरती वीज पडून झाडांनी पेठ घेतला. पावसामुळे  विविध गावांमध्ये पाणीच पाणी झालेलं पाहायला मिळालं. 

हेही वाचा :  Petrol Diesel Price : महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल महाग की स्वस्त? जाणून घ्या तुमच्या राज्यातील दर

परभणी 

परभणी जिल्ह्यात जोरदार अवकाळी पाऊस झालाय. जिल्ह्यात एकूण पाच ठिकाणी वीज कोसळली असून यात दोघांचा मृत्यू झालाय. शेतात काम करत असतांना एका महिलेचा आणि पुरुषाचा वीज अंगावर कोसळल्यानं मृत्यू झाला. तर काही जनावरं देखिल मृत्यूमुखी पडली.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …