छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अक्षय कुमार; शेअर केला व्हिडीओ

Vedant Marathe Veer Daudale Saat: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ (Vedant Marathe Veer Daudale Saat) या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. अक्षयनं आज एक पोस्ट शेअर करुन चित्रपटाबाबत माहिती दिली. आता नुकताच अक्षयनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अक्षय हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहे. 

अक्षयची पोस्ट 

अक्षयनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमध्ये दिसत आहे. व्हिडीओला अक्षयनं कॅप्शन दिलं, ‘जय भवानी, जय शिवाजी’. अक्षयनं शेअर केलेल्या व्हिडीओला काही नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.  आतापर्यंत आठ हजारपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी या व्हिडीओला लाइक केलं आहे. 

पाहा व्हिडीओ: 

News Reels


नेटकऱ्यांच्या कमेंट्स
अनेक नेटकऱ्यांनी अक्षयनं शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट्स करुन त्याला ट्रोल केलं. एका नेटकऱ्यानं अक्षयनं शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट केली, ‘रणवीर सिंहनं तुझ्यापेक्षा चांगलं काम केलं असतं.’ तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, ‘शरद केळकर छत्रपती शिवाजी महारजांची भूमिका चांगली साकारु शकतो.’ ‘हा लूक पर्फेक्ट वाटत नाही.’ अशी कमेंट देखील एका नेटकऱ्यानं केली. तर काही नेटकऱ्यांनी कमेंट करुन अक्षयचं कौतुक देखील केलं आहे. 

हेही वाचा :  चाहत्यांनी विचारले हटके प्रश्न; शाहरुख उत्तर देत म्हणाला...

 “वेडात मराठे वीर दौडले सात” या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं आहे. या चित्रपटात अक्षयसोबतच अभिनेता प्रवीण तरडे, हार्दिक जोशी, विशाल निकम, विराट मडके, सत्या मांजरेकर, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट मराठी, हिंदी आणि तेलगू भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Akshay Kumar: ‘माँ जिजाऊंच्या आशीर्वादाने…’; अक्षय कुमारनं शेअर केली खास पोस्ट



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …