‘छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याचे भाग्य…’; अक्षयनं शेअर केली खास पोस्ट

Vedant Marathe Veer Daudale Saat: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. अक्षयच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. लवकरच त्याचा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ (Vedant Marathe Veer Daudale Saat)  हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अक्षय हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या लूकमुळे गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. आता ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. अक्षयनं नुकतीच या एक खास पोस्ट शेअर करुन या चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे. 

अक्षयची पोस्ट: 

अक्षयनं एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोला अभिवादन करताना दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देऊन अक्षयनं खास कॅप्शन देखील दिलं. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठी चित्रपटाच्या शूटिंगला आजपासून सुरुवात होत आहे. या चित्रपटात मला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याचे भाग्य लाभले आहे. त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आणि माँ जिजाऊंच्या आशीर्वादाने मी पूर्ण प्रयत्न करेन. सर्वांनी आशीर्वाद द्या.’ असं कॅप्शन अक्षयनं या पोस्टला दिले आहे. अक्षयच्या या पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. 


“वेडात मराठे वीर दौडले सात” या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं आहे. या चित्रपटात अक्षयसोबतच अभिनेता प्रवीण तरडे, हार्दिक जोशी, विशाल निकम, विराट मडके, सत्या मांजरेकर, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट मराठी, हिंदी आणि तेलगू भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे.

हेही वाचा :  स्वरा आणि फहाद यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Vedat Marathe Veer Daudle Saat: छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कशी मिळाली? अक्षय कुमार म्हणाला…



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …