रविंद्र जडेजाने मुलीला दिलं इतकं सुंदर नाव? प्रत्येकजण नावाच्या प्रेमात, अजून एका कारणामुळे ठरतो ‘आदर्श बाबा’

भारतीय खेळाडू रविंद्र जडेजा उत्तम क्रिकेटरच आहेच. त्याची प्रत्येक खेळी क्रिकेटप्रेमींना आनंद देत असते. पण यासोबतच रविंद्र जडेजाला चाहते एक ‘आदर्श बाबा’ म्हणून फॉलो करतात. कारण रविंद्रने आपल्या मुलीबाबत केलेल्या प्रत्येक गोष्टी त्याचे चाहते फॉलो करतात. जसे की, मुलीचे नाव असो किंवा मुलीच्या वाढदिवसाला केलेली खास गोष्ट असो.

रवींद्र जडेजानेही आपल्या मुलीचे नाव खूप विचार करून ठेवल्याचं दिसतं. विराटने मुलीचं नाव ‘वामिका’ आणि धोनीने आपल्या लेकीचं नाव ‘जिवा’ठेवलं आहे. पण रविंद्र जडेजाने आपल्या मुलीला आणखी सुंदर नाव दिले आहे. यामधून आपण रविंद्रच्या मुलीचं सुंदर नाव त्याचा अर्थ समजून घेणार आहोत. सोबतच लेकीच्या वाढदिवसाला अवाजवी खर्च न करता एका सुंदर कृतीतून त्याने “आदर्श बाबा’ म्हणून विचार मांडला आहे. आपण देखील आपल्यापरीने मुलीच्या वाढदिवसाकरता ही खास गोष्ट करायला काहीच हरकत नाही.

​रविंद्र जडेजाच्या मुलीचं नाव

2017 मध्ये जडेजाच्या घरी एका मुलीचा जन्म झाला आणि तिने आपल्या छोट्या चिमुकलीचे नाव ‘निध्याना’ ठेवले. खरंच निध्याना नाव खूप गोंडस आहे. ‘निध्यान’ हे अतिशय वेगळं आहे आणि नावाचा अर्थ अंतर्ज्ञान, सहज ज्ञान आणि सहज बोध असा आहे. हे नाव भारतीय मूळ असलेले नाव आहे.

हेही वाचा :  श्रीलंकेचा पहिला डाव 174 धावांवर गुंडाळला, जडेजाने घेतल्या पाच विकेट

रविंद्र जडेजाने निधान्यावर केलेले संस्कार अतिशय महत्वाचे आहे. मुलीच्या वाढदिवसाला देखील तिच्यासमोर अनोखा आदर्श ठेवला.

(वाचा – मुलांना एकच खोली शेअर करायला देणं योग्य आहे का? ५ गोष्टी ज्या पालकांना माहित असायलाच हव्यात))

रविंद्र जडेजाची पोस्ट

मुलीच्या वाढदिवसाला केली खास गोष्ट

भारतीय क्रिकेट स्टार रवींद्र जडेजा आणि पत्नी रिवाबा जडेजाने मुलीच्या ‘निध्याना’च्या वाढदिवसानिमित्त जामनगरच्या पोस्ट ऑफिसमध्ये 101 सुकन्या समृद्धी खाती उघडणार असल्याची घोषणा केली. जडेजा दाम्पत्य सुरुवातीला प्रत्येक खात्यात ₹11,000 जमा करणार आहेत. मुलीच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त इतकं छान सेलिब्रेशन आपण ऐकलं नसेल. रवींद्र जडेजाने जगासमोर वेगळा अनोखा असा आदर्श ठेवला आहे.

(वाचा – पतीपासून दूर राहूनही ‘या’ पद्धतीने व्हा प्रेग्नेंट, इनफर्टिलिटीला मिळालं वरदान)

(फोटो सौजन्य – रविंद्र जडेजा फेसबुक)

​ध्रुवी

तुम्हीही तुमच्या मुलीला जडेजासारखे संस्कृत नाव देऊ शकता. ध्रुवी नावाचा अर्थ दृढ, गुंतागुंतीचा आणि अटल असा आहे. ध्रुवी खूप गोंडस आणि सुंदर नाव आहे. ध्रुवी हे अतिशय वेगळं नाव आहे. यानावाची निवड तुम्ही तुमच्या मुलीकरता करू शकता. दोन अक्षरी असं हे नाव आहे.

(वाचा – पालकांच्या ‘या’ 6 सवयी मुलांच भविष्य करतात खराब; आजच बदला नाहीतर होईल नुकसान)

हेही वाचा :  Pan Card मधील या दोन चुका पडतील भारी, १० हजाराचा दंड आणि ६ महिन्याची शिक्षा

​ईश्वरी

जर तुमच्या मुलीचे नाव ‘ई’ अक्षरावरून आले असेल तर तुम्ही तिचे नाव ईश्वरी ठेवू शकता. ईश्वरी नावाचा अर्थ पराक्रमी आणि देवी असा आहे. तुम्हाला हे नाव देखील आवडेल.

आता पुन्हा एकदा जुन्या नावांचा ट्रेंड आलाय. अशावेळी तुम्ही या नावाचा विचार करू शकता. ईश्वरी हे नाव तुम्हाला सतत परमेश्वराचं स्मरण करून देईल.
(वाचा – प्रियंका चोप्रा लेकीला अजिबात देणार नाही ‘ही’ गोष्ट, जाणून घ्या पर्सनल लाइफमध्ये कशी आहे ‘आई’)

​हर्षदा

जर तुम्हाला मुलीचे वेगळे पण भारतीय नाव हवे असेल तर तुम्ही हर्षदा हे नाव निवडू शकता. हर्षदा नावाचा अर्थ आनंद आणणारा असा आहे. ‘हर्षदा’ हे नाव जरी तुम्हाला अतिशय कॉमन वाटलं तरी तुम्ही या नावाचा विचार मुलीकरता करू शकता. कारण या नावाच खूप आनंद लपलेला आहे. या नावाच्या मुलीवर हर्षाचे, आनंदाचे संस्कार होतील.

(वाचा – तुमची मुलंसुद्धा मोबाइलमध्ये बिझी असतात, मुलांना Gadget पासून लांब करायचंय? Sudha Murthy यांच्या फायदेशीर टिप्स)

​इरा

जर तुम्हाला तुमच्या मुलीचे नाव ‘इ’ ठेवायचे असेल तर तुम्ही हे छोटे नाव निवडू शकता. इरा नावाचा अर्थ सरस्वती, ज्ञानाची देवी. माता सरस्वतीची अनेक नावे आहेत, त्यापैकी एक आहे इरा. हे अतिशय दोन अक्षरी नाव आहे. पण हे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींशी कनेक्ट करू शकता. तुम्ही हे नाव मुलीकरता नक्कीच निवडू शकता.

हेही वाचा :  चौकशी करा किंवा काही करा, मला काही फरक पडत नाही; मीरा बोरवणकर यांच्या गंभीर आरोपांना अजित पवार यांचे उत्तर

(वाचा – तुमचं मुलं देखील असं एकटं एकटं असतं का? तर त्याच्याशी बोलण्याआधी करा ही 5 कामं)

​प्रेमा

जर तुमच्या मुलीचे नाव ‘प’ अक्षरावरून आले असेल तर तुम्ही तिचे नाव प्रेमा ठेवू शकता. प्रेमा नावाचा अर्थ प्रेम आणि आपुलकी असा आहे. या नावाचा शुभांक २ आहे. तर कन्या ही प्रेमा या नावाची रास आहे. कृतिका हे नक्षत्र आहे.

(वाचा – ब्रेस्टफिडिंग आईने आवर्जून खावा ‘हा’ पदार्थ, व्यवस्थित दूध पियेल बाळ; सुदृढ होईल बाळ यात शंका नाही)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणाऱ्या मतदानात आठ मतदारसंघातल्या उमेदवारांचं भवितव्य …

भोवळ येऊन पडल्यानंतर नितीन गडकरींनी शेअर केली पोस्ट, म्हणाले ‘आता पुढच्या सभेत…’

लोकसभा निवडणुकीच्या प्रचादरम्यान भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना स्टेजवरच भोवळ आली. सुदैवाने …