सिद्धार्थ-कियारावर चाहत्यांकडूनही शुभेच्छांचा वर्षाव!

Celebs Reaction On Sidharth Malhotra Kiara Advani Wedding : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा आडवाणी (Kiara Advani) नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. जैसलमेरच्या सूर्यगढ महालात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. सध्या सोशल मीडियावर सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नसोहळ्याची चर्चा रंगली आहे. करण जौहरपासून कतरिना कैफपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी सिद्धार्थ-कियाराला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

वरुण धवनने (Varun Dhawan) सिड-कियाराचा लग्नसोहळ्यातील फोटो शेअर करत लिहिलं आहे,”आयुष्यभर एकमेकांवर प्रेम करा..शुभेच्छा”. सिद्धार्थ-कियाराने लग्नात फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने (Manish Malhotra) डिझाईन केलेले कपडे परिधान केले होते. मनीषने सिड-कियाराचा रोमॅंटिक फोटो शेअर करत लिहिलं आहे,”मिसेस आणि मिस्टर मल्होत्राला खूप प्रेम आणि आशीर्वाद”. 


करण जौहरच्या पोस्टने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष 

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नसोहळ्यात करण जौहरनेदेखील (Karan Johar) हजेरी लावली होती.  करणने सिड-कियाराचा फोटो शेअर करत लिहिलं आहे,”सिड-कियाराला मी गेल्या 15 वर्षांपासून ओळखत आहे. मी त्यांना पहिल्यांदा भेटलो त्याचवेळी मला जाणवलं होतं की, शांत आणि संवेदशनशील असणारे हे दोघेही एकमेकांसाठी योग्य आहेत. त्यांना एकत्र पाहताना खूप छान वाटत आहे. मला त्यांचा अभिमान वाटतोय आणि खूप आनंददेखील झाला आहे. आय लव्ह यू सिड… आय लव्ह यू की”. 


कतरिना-विकीने दिल्या शुभेच्छा!

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ, विकी कौशल, आयुष्मान खुरानासह अनेक सेलिब्रिटींनी कतरिना-विकीला शुभेच्छा दिल्या आहेत. कतरिनाने लिहिलं आहे,”दोघांनाही शुभेच्छा… खूप छान”. विकीनेदेखील ‘अभिनंदन’ असं म्हणत दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. आलिया भट्टनेदेखील सिड-कियाराला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा :  Siddharth Jadhav : अन् 'आपला सिद्धू' भाव खाऊन गेला...

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी 7 फेब्रुवारी 2023 रोजी लग्नबंधनात अडकले आहेत. सिद्धार्थ-कियाराच्या डेस्टिनेशन वेडिंगने सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. पण ‘नो फोन पॉलिसी’मुळे चाहते मात्र नाराज झाले आहेत. आजवर अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकले असून ‘नो फोन पॉलिसी’ असूनही त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो-व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण कियारा आणि सिडने मात्र ‘नो फोन पॉलिसी’चा अत्यंत चांगल्याप्रकारे वापर केला आहे. सिड-कियाराने लग्नानंतर स्वत: सोशल मीडियावर लग्नसोहळ्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. 

संबंधित बातम्या

Sidharth Malhotra, Kiara Advani wedding: शुभमंगल सावधान! सिद्धार्थ आणि कियाराचा विवाह सोहळा संपन्न; राजस्थानमध्ये घेतले सात फेरेSource link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …