केन विल्यमसनचा न्यूझीलंडच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा

Kane Williamson Step Down As New Zealand Test Captain: न्यूझीलंड क्रिकेट संघाचा (Team New Zealand) दिग्गज फलंदाज केन विल्यमसननं (Kane Williamson) कसोटी संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. केन विल्यमसननंतर अनुभवी गोलंदाज टीम साऊथी (Tim Southee) न्यूझीलंडच्या कसोटी संघाची धुरा सांभाळताना दिसणार आहे. महत्वाचं म्हणजे, केन विल्यमनसनं कसोटी संघाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतला असला तरी तो मर्यादीत षटकाच्या क्रिकेटमध्ये म्हणजेच एकदिवसीय आणि टी-20 संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे. 

ट्वीट-

 

केन विल्यमसन काय म्हणाला?
न्यूझीलंड कसोटी संघाचं कर्णधारपद सोडण्याबाबत केन विल्यमसन म्हणाला की, “कसोटीचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ आहे’. कसोटी संघाचे कर्णधारपद भूषवणं हा माझ्यासाठी बहुमान आहे. कसोटी क्रिकेट माझ्यासाठी अव्वल दर्जाचे आहे आणि त्याचा कर्णधार म्हणून मी आव्हानांचा आनंद घेतला. कर्णधार म्हणून तुमचे काम आणि कामाचा ताण वाढतो. माझ्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर मला वाटले की कसोटी कर्णधारपद सोडण्याची हीच योग्य वेळ आहे.”

हेही वाचा :  फॉफ डू प्लेसिसचे डेव्हिड वार्नर आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघावर गंभीर आरोप

सर्वोत्तम कर्णधार
केन विल्यमसन हा न्यूझीलंडच्या महान कसोटी कर्णधारांपैकी एक आहे. केनच्या नेतृत्वाखाली किवी संघानं भारताचा पराभव करून पहिलं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकलं होतं. केनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडच्या संघानं 38 पैकी 22 सामने जिंकले आहेत. तर, आठ सामने गमावले आहेत आणि आठ सामने अनिर्णित ठरले आहेत. 

टीम साऊथी न्यूझीलंडच्या कसोटी संघाचा नवा कर्णधार
केन विल्यमसननं राजीनामा दिल्यानंतर न्यूझीलंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साऊथीच्या खांद्यावर कसोटी संघाची जबाबदारी सोपवण्यात आली. पाकिस्तान दौऱ्यात टीम साऊथी न्यूझीलंडच्या कसोटी संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे. तर, टॉम लॅथम संघाच्या उपकर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. टीम साऊथी हा न्यूझीलंड संघाचा 31वा कसोटी कर्णधार बनला आहे. याआधी त्यानं न्यूझीलंडच्या टी-20 संघाचं नेतृत्वदेखील केलं आहे. 

हे देखील वाचा-



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …