आयपीएल 2023 च्या मिनी ऑक्शनमध्ये ‘या’ पाच खेळाडूंवर मोठी बोली लागण्याची शक्यता

IPL 2023 Mini Auction: आयपीएल 2023 साठी सर्व आययपीएल फ्रँचायझी त्यांच्या खेळाडूंना रिटेन आणि रिलीज केल. या लीगमधील सर्व 10 फ्रँचायझींना त्यांचे खेळाडूंना रिटेन किंवा रिलीज करण्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंतचा वेळ देण्यात आला होता. मागच्या हंगामाच्या ऑक्शनमध्ये शिल्लक राहिलेले पैसे आणि सोडण्यात आलेल्या खेळाडूंच्या पैशांव्यतिरिक्त फ्रँचायझीला आणखी पाच कोटी रुपये देण्यात आले. रिटेंशन प्रक्रियाच्या समाप्तीनंतर सर्व संघाचं लक्ष 23 डिसेंबरला कोची येथे पार पडणाऱ्या आयपीएलच्या मिनी ऑक्शनकडं लागलंय. या मिनी ऑक्शनमध्ये खालील पाच खेळाडूंवर मोठी बोली लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

केन विल्यमसन
टी-20 विश्वचषकच 2022 च्या अंतिम सामन्यात इंग्लडच्या संघानं पाच विकेट्स राखून पाकिस्तानचा धुव्वा उडवला. इंग्लंडच्या विजयात वेगवान गोलंदाज सॅम करननं मोलाचा वाटा उचलला आहे. कुरननं सहा सामन्यात 11.38 च्या सरासरीनं 13 विकेट घेतल्या. दरम्यान, दुखापतीमुळं सॅम करननं आयपीएलच्या मागच्या हंगामातून माघार घेतली होती. मात्र, यंदाच्या हंगामात तो खेळणार असल्याचं स्पष्ट झालंय. आयपीएल 2023च्या मिनी ऑक्शनमध्ये सॅम करन सर्वात महागडा खेळाडू ठरू शकतो. त्यानं आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपरकिंग्जच्या संघाचं प्रतिनिधित्व केलंय. तो गोलंदाजीसह फलंदाजीतही चांगली कामगिरी करण्याची क्षमता आहे. 

हेही वाचा :  न्यूझीलंडनं सामना गमावला पण ब्रेसवेलनं मनं जिंकली, चाहत्यांनी ठोकला कडक सॅल्यूट

बेन स्टोक्स
इंग्लंडच्या संघाचा स्टार ऑलराऊंडर बेन स्टोक्स सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध विजयी खेळी साकारली होती. आयपीएल आगामी मिनी ऑक्शनमध्ये बेन स्टोक्स आपलं नाव देणार असल्याचं त्यानं संकेत दिले आहेत.यापूर्वीही बेन स्टोक्सनं आयपीएलमध्ये अनेक संघाचं प्रतिनिधित्व केलंय. आयपीएल 2017 च्या लिलावात रायझिंग पुणे सुपरजायंट्सनं बेन स्टोक्सवर 14.5 कोटी रुपयांची यशस्वी बोली लावली होती.बेन स्टोक्समध्ये एकहाती सामना जिंकून देण्याची क्षमता आहे. यामुळं यंदाच्या महागड्या खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश होण्याची शक्यता आहे. 

कॅमेरून ग्रीन
आयपीएलच्या आगामी मिनी ऑक्शनमध्ये ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर कॅमेरून ग्रीनला आपल्या संघात सामील करून घेण्यासाठी सर्व फ्रँचायझी जोर लावतील. टी-20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियन संघ भारत दौऱ्यावर आला, तेव्हा कॅमेरून ग्रीनने बॅटनं अप्रतिम खेळ दाखवला. कॅमेरून ग्रीनमुळं फलंदाजीसह गोलंदाजीतही उत्तम पर्यात उपलब्ध होतो, जो टी-20 क्रिकेटच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे. 

Reels

मयांक अग्रवाल
आयपीएल 2023 च्या मिनी ऑक्शनमध्ये मयंक अग्रवालला मोठी रक्कम मिळण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या मागच्या हंगामात मयांकला काही खास कामगिरी करता आली नाही. तसेच पंजाब किंग्जला प्लेऑफमध्ये नेण्यात तो अपयशी ठरला. मयांकची आयपीएलमधील एकूण कामगिरी वाईट नाही. त्यानं या लीगमधील दोन हजार धावांचा टप्पा ओलांडलाय. ऑक्शनमध्ये त्याला मोठी किंमत मिळाल्यास यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काही नसेल. 

हेही वाचा :  आज दिल्ली विरुद्ध मुंबई भिडणार, रोहित शर्मा आणि ऋषभ पंत आमने सामने

निकोलस पूरन
निकोलस पूरनने आयपीएलच्या मागच्या हंगामात सनरायझर्स हैदराबादसाठी एकूण 14 सामने खेळले. ज्यात त्यानं 38.25 च्या सरासरीनं 306 धावा केल्या. म्हणजेच त्याची कामगिरी तितकीशी वाईट नव्हती. निकोलस पूरनकडं मॅचविनिंग इनिंग खेळण्याची क्षमता आहे आणि हे त्याने अनेक प्रसंगी सिद्ध करून दाखवलंय.

हे देखील वाचा-

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …