केन विलियमसनला तर रिलीज केलं, मग हैदराबादचं नेतृत्व कोणाकडं? आकाश चोप्रा म्हणतोय…

IPL 2023: आयपीएल 2023 च्या मिनी ऑक्शनपूर्वी (IPL Mini Auction ) सर्व 10 फ्रँचायझींनी आपल्या रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादीत बीसीसीआयकडं सोपवली आहे.  या लीगमधील सर्व 10 फ्रँचायझींना त्यांचे खेळाडूंना रिटेन किंवा रिलीज करण्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंतचा वेळ देण्यात आला होता. दरम्यान, सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांनी सर्वांना आश्चर्यचकीत केलं. दोन्ही फ्रँचायझीनं आपपल्या कर्णधारांनाच रिलीज केलंय. जगातील उत्कृष्ट कर्णधारांपैकी एक असलेल्या केन विल्यमसनला (Kane Williamson) संघातून रिलीज केल्यानंतर हैदराबादच्या नेतृत्वाची जबाबदारी कोणत्या खेळाडूवर सोपवली जाणार? असा प्रश्न सर्वांसमोर पडलाय. यावर भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रानं (Aakash Chopra) आपलं मत मांडलंय. 

आयपीएलच्या मिनी ऑक्शनपूर्वी हैदराबादच्या संघानं त्यांच्या 12 खेळाडूंना रिटेन केलंय. ज्यात कर्णधार केन विल्यमसनचाही समावेश आहे. आयपीएलच्या पुढच्या हंगामात भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारवर हैदराबादच्या संघाची धुरा सोपवली जाईल, अशी शक्यता आकाश चोप्रानं व्यक्त केलीय. तसेच आकाश चोप्रानं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून भुवनेश्वर कुमार हैदराबाद पुढचा कर्णधार असेल का? असा प्रश्न विचारलाय.

हेही वाचा :  IND vs SL : आज भारत विरुद्ध श्रीलंका 'करो या मरो'चा सामना, कसा आहे आजवरचा इतिहास?

हैदराबादनं रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी
अब्दुल समद, एडन मार्कराम, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, मार्को जेन्सन, वॉशिंग्टन सुंदर, फजलहक फारुकी, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन आणि उमरान मलिक.

हैदराबादनं रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी
केन विलियमसन, निकोलस पूरन, जगदीश सुचित, प्रियम गर्ग, रविकुमार समर्थ, रोमारियो शेफर्ड, सौरभ दुबे, सीन एबॉट, शशांक सिंह, श्रेयस गोपाल, सुशांत मिश्रा आणि विष्णु विनोद.

Reels

सनरायजर्स हैदराबादकडं किती पैसै शिल्लक
सनराइजर्स हैदराबादने केन विल्यमसनसह एकूण 12 खेळाडूंना रिलीज केलं आहे. ज्यामुळं आगामी आयपीएल 2023 च्या मिनी ऑक्शनवेळी त्यांच्याकडं सर्वाधिक म्हणजेच 42.25 कोटी रुपये असणार आहेत.

ट्वीट-

 

हे देखील वाचा-

  • पोलार्ड-ब्रावो रिलीज, कार्तिक-जाडेजाला केलं रिटेन, पाहा CSK, DC, RCB, SRH, KKR, PBKS, LSG, RR, MI, GT संघातील खेळाडूंची यादी



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …