Vivek Agnihotri : ‘द कश्मीर फाइल्स’च्या वादादरम्यान विवेक अग्निहोत्रींची मोठी घोषणा

Vivek Agnihotri On The Kashmir Files Unreported : ‘द कश्मीर फाइल्स’च्या (The Kashmir Files) वादादरम्यान दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट करत ‘द कश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड’ (The Kashmir Files Unreported) बनवणार असल्याची माहिती दिली आहे. 

53 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नुकताच गोव्यात पार पडला. दरम्यान नदाव लॅपिड (Nadav Lapid) यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं. ते म्हणाले,”द कश्मीर फाइल्स’ या सिनेमाचा ‘इफ्फी’ सारख्या महोत्सवात समावेश होणं ही धक्कादायक बाब  आबे. तसेच हा सिनेमात प्रपोगंडा आणि वल्गर सिनेमा आहे”. 

‘द कश्मीर फाइल्स’ हा सिनेमा नव्व्दच्या दशकात काश्मीर खोऱ्यातील पंडितांच्या हत्येच्या आणि अमानुष अत्याचारांच्या घटणांचे वर्णन करणारा आहे. विवेक अग्निहोत्री यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. आता ‘द कश्मीर फाइल्स’च्या वादादरम्यान विवेक अग्निहोत्री यांनी द कश्मीर फाइल्स’चा पुढचा भाग ‘द कश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड’ बनवणार असल्याची घोषणा केली आहे.

‘द कश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड’ हा एक माहितीपट असणार आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ला विरोध झाल्यामुळे ‘द कश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड’लादेखील विरोध होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ‘द कश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड’मध्ये नेमकं काय असेल हे अद्याप समोर आलेलं नाही. 

हेही वाचा :  Pathaan : शाहरुख खान 'पठाण'ची रिलीज डेट बदलणार?

सुपरहिट ‘द कश्मीर फाइल्स’

‘द कश्मीर फाइल्स’ हा सिनेमा 11 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. एकीकडे या सिनेमाला विरोध होत होता. तर दुसरीकडे कमाईच्या बाबतीत हा सिनेमा आघाडीवर होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 250 कोटींचा गल्ला जमवला होता. त्यामुळे ‘द कश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड’ या सिनेमाचं कथानक काय असेल, हा सिनेमा कधी प्रदर्शित होईल, कोणते कलाकार असतील, हा सिनेमादेखील वादाच्या भोवऱ्यात अडकेल का?, असे अनेक प्रश्न आता सिनेरसिकांना पडले आहेत. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 

संबंधित बातम्या

The Kashmir Files: ‘मी चॅलेंज करतो…’; द कश्मीर फाइल्सबाबत इफ्फीच्या ज्युरीनं केलेल्या वक्तव्यावर विवेक अग्निहोत्रींची प्रतिक्रिया



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …