वेगाने येणाऱ्या ट्रेनजवळ बाईक घेऊन गेलेल्या व्यक्तीसोबत पुढे घडलं पाहा व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडिया हे एक असं प्लॅटफॉर्म आहे. जेथे आपल्याला अशा काही गोष्टी पाहायला मिळतात, जे आपलं मनोरंजन करतात. ज्यामुळे आपला वेळ येथे कसा निघून जातो हे आपल्यालाच कळत नाही. येथे कॉमेडी आणि डान्स व्हिडीओ शिवाय असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात, जे आपल्यासाठी उदाहरण ठेवतात. अशाच पद्धतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो एका बाईक स्वाराचा आहे. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती वाऱ्याच्या वेगाने येणाऱ्या ट्रेनच्या जवळ असा काही उभा असतो की, त्याला काही फरकच पडत नाही. परंतु ज्यावेळेला तेथून रेल्वेचं इंजीन जातं, ते दृश्य अंगावट काटा आणणारं आहे.

खरंतर रस्त्यावरील रेल्वे क्रॉसिंगवर ट्रेन येणार म्हणून सगळ्या गाड्या रुळापासून लांब थांबल्या होत्या. परंतु एक बाईकस्वार आपल्या जीवाची पर्वा न करता गोणी भरलेल्या सामानासह आपली बाईक घेऊन रेल्वेच्या रुळाजवळ जाऊन उभा राहिला. यावेळेला इतर लोक या व्यक्तीला मागे येण्यासाठी सांगत असतात. परंतु तो स्वत:चीच मनमानी करतो.

तेवढ्यात तेथून वाऱ्याच्या वेगाने रेल्वेचं इंजिन जातं तेव्हा, तो व्यक्ती वाऱ्याच्या वेगामूळ हलू लागला, परंतु त्याचं नशीब चांगलं होतं, म्हणून त्याला काही झालं नाही. परंतु यापूर्वी अशा अनेक घटना घडला आहेत, ज्यामध्ये अशाप्रकारे चुकी केल्यामुळे लोकांचं खूप नुकसान झालं आहे. तर अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

परंतु या व्यक्तीचं नशीब चांगलं होतं की, याचं काहीही नुकसान झालेलं नाही. परंतु त्यानंतर या व्यक्तीसोबत जो प्रकार घडतो तो फारच मनोरंजक आहे.

हेही वाचा :  Crime News : कुत्र्याच्या मृत्यूमुळे दोन वर्षापूवी झालेल्या महिलेच्या हत्येचे रहस्य उलगडले

कारण तेथे जो रेल्वेचा व्यक्ती असतो, तो येऊन या व्यक्तीचे कान धरतो. हे दृश्य फारच मनोरंजक आहे. परंतु ही गोष्ट लक्षात ठेवा की, या व्हिडीओमधून तुम्ही देखील शिकवण घ्या आणि अशी चूक तुम्ही कधीही करु नका.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत लिहिलं ‘जय श्री राम’, शिक्षकाने केलं पास.. विद्यापिठाकडून कारवाई

Trending News : उत्तर प्रदेशमधल्या जौनपूर इथल्या वीर बहाद्दूर सिंह पूर्वांचल युनिव्हर्सिटीतल्या उत्तर पत्रिका तपासणीतल्या …