Dolly Chaiwala : बिल गेट्स यांना चहा पाजणारा डॉली चायवाला किती कमावतो?

Bill Gates Chai Video : मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांचा एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातल आहे. बिल गेट्स सध्या भारत दौऱ्यावर आहेत. अशातच अब्जाधीश बिल गेट्स यांना चक्क नागपुरातील एका साध्या चहाविक्रेत्याने भुरळ घातली आहे. बिल गेट्स यांनी हा व्हिडीओ त्यांच्या इन्टाग्राम अकाऊंटवर देखील शेअर केलाय. भारतात तुम्ही जिथेही फिराल तिथे तुम्हाला नावीन्य मिळेल, अगदी साधा कप चहा तयार करतानाही, असं बिल गेट्स यांनी म्हटलं आहे. मात्र, तुम्हाला माहितीये का? बिल गेट्स यांना चहा पाजणारा डॉली चायवाला (Dolly Chaiwala Earning) किती कमावतो?

वन टी प्लीज म्हणत बिल गेट्स यांनी एक व्हिडीओ (Bill Gates Chai Video) शेअर केला अन् काही सेकंदात व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. नागपूरच्या चहाविक्रेत्याचा हा आहे तरी कोण? बिल गेट्स अन् साध्या चहावाल्याची भेट कशी झाली? असा सवाल विचारला जातोय. त्यावर डॉली चायवाल्याने उत्तर दिलं. मला आजिबात माहिती नव्हतं की, हे एवढे मोठे व्यक्ती आहे. मला वाटलं की कोणतरी एक फॉरेनर आहे अन् मला त्याला चहा देयचाय. मी नेहमीप्रमाणे आपलं फक्त काम केलं. दाक्षिणात्य चित्रपट पाहून, त्यांची कॉपी करून मी माझी स्टाइल बनवलीये, असंही डॉली चायवाला म्हणतो. आता मला पंतप्रधान मोदींना माझ्या हातचा चहा पाजायचाय, अशी इच्छा देखील डॉलीने व्यक्त केली आहे.

हेही वाचा :  FIFA World Cup : PM मोदींकडून अर्जेंटिनाचे अभिनंदन, म्हणाले - मेस्सीचे लाखो भारतीय चाहते..

डॉली चायवाला किती कमावतो?

डॉली चायवाला सकाळी कडाक्याच्या थंडीत म्हणजेच सकाळी 6 वाजता चहाचा स्टॉल उघडतो अन् रात्री 9 वाजेपर्यंत त्यांचा स्टॉल सुरू असतो. त्याच्या चहाच्या किंमत त्याने 7 रुपये ठेवली आहे. दिवसाला मी 400 कप चहा विकतो, असं डॉली चहावाला म्हणतो. म्हणजेच माझी दिवसाची कमाई 4 हजार ते 5 हजार आहे, असंही डॉली सांगतो. 

दरम्यान, डॉली चायवाला खास स्टाइलमुळे अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतो.  त्याने दहावीपर्यंत शिक्षण घेतलंय, त्यानंतर त्याने शिक्षण सोडलं. नागपुरातील सिव्हिल लाईन परिसरात गेल्या 16 वर्षांपासून डॉली चायवाला चहाचे दुकान चालवतो. डॉली चायवाला साऊथ सुपरस्टार रजनीकांतच्या स्टाईलमुळे फेमस आहे. आपल्या चवदार चहामुळे देखील अनेकजण त्याच्या स्टॉलवर भेट देतात. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …

घरभर 500 च्या नोटांचे ढीग! ED ला नोकराच्या घरात सापडले 25 कोटी? ‘या’ मंत्र्याशी कनेक्शन

Jharkhand ED Raid: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये आचारसंहिता लागू असतानाच झारखंडमध्ये सक्तवसुली संचलनालयाने मोठी कारवाई केली …