FIFA World Cup : PM मोदींकडून अर्जेंटिनाचे अभिनंदन, म्हणाले – मेस्सीचे लाखो भारतीय चाहते..

PM Modi Reaction On FIFA World Cup Final : कतार येथे झालेल्या फिफा विश्वचषक फायनलमध्ये (FIFA World Cup 2022) अर्जेंटिनाने (Argentina) फ्रान्सचा (France) पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 असा पराभव केला. तसेच अर्जेंटिनाने 1978 आणि 1986 नंतर तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे. फिफा विश्वचषक चॅम्पियन झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रविवारी अर्जेंटिनाचे अभिनंदन केले. हा अंतिम सामना फुटबॉलमधील सर्वात रोमांचक सामन्यांपैकी एक म्हणून लक्षात राहील, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

“मेस्सीचे कोट्यवधी भारतीय चाहते या विजयाने खूश”

पंतप्रधान मोदी म्हणाले की, अर्जेंटिना आणि मेस्सीचे कोट्यवधी भारतीय चाहते या महान विजयाने खूश आहेत. पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की, “हा आतापर्यंतचा सर्वात रोमांचक फुटबॉल सामना म्हणून लक्षात ठेवला जाईल! फिफा विश्वचषक चॅम्पियन बनल्याबद्दल अर्जेंटिनाचे अभिनंदन! त्यांनी संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. अर्जेंटिना आणि मेस्सीचे लाखो भारतीय चाहते आहेत. तसेच हा विजय साजरा करत आहे.” यासोबतच पंतप्रधान मोदींनी फ्रान्सच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दलही त्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, फिफा विश्वचषकातील उत्साही कामगिरीबद्दल फ्रान्सचेही अभिनंदन. त्यांनी आपल्या कौशल्याने आणि खेळाडू वृत्तीने फुटबॉल चाहत्यांची मने जिंकली.

हेही वाचा :  मिनी ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्स होणार सहभागी, 'या' तीन खेळाडूंवर असणार संघ व्यवस्थापनाची नजर

 

News Reels

 

मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधींकडून अभिनंदन
फिफा विश्वचषक फायनलमधील रोमहर्षक विजयाबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी अर्जेंटिनाचे अभिनंदन केले. राहुल गांधी म्हणाले की, या सामन्याने पुन्हा एकदा दाखवून दिले की, खेळ सीमांशिवाय कसे एकत्र येतात. काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनीही शानदार कामगिरी केल्याबद्दल आणि फिफा विश्वचषक चॅम्पियन बनल्याबद्दल अर्जेंटिनाचे अभिनंदन केले. मेस्सीचा शानदार खेळ लाखो चाहत्यांच्या अपेक्षांवर खरा ठरला, असे खर्गे यांनी ट्विट केले. तर, राहुल गांधी ट्विटमध्ये म्हणाले, किती सुंदर खेळ! रोमहर्षक विजयाबद्दल अर्जेंटिनाचे अभिनंदन. फ्रान्सनेही चांगला खेळ केला. मेस्सी आणि एमबाप्पे दोघेही खऱ्या चॅम्पियनसारखे खेळले! भारत जोडो यात्रे दरम्यान राहुल गांधी आणि इतर लोकांनी 2022 चा FIFA विश्वचषक अंतिम सामना स्क्रीनवर पाहिला.

हेही वाचा :  चांद्रयान 3 चं पुढे काय झालं? विक्रम लँडर, प्रज्ञान रोव्हरसंदर्भात माजी इस्रोप्रमुखांनी केला मोठा उलगडा

पश्चिम बंगालमध्ये अर्जेंटिनाच्या समर्थकांचा जल्लोष
कोलकाता आणि पश्चिम बंगालच्या इतर भागांतील अर्जेंटिनाच्या समर्थकांनी फिफा विश्वचषक विजेतेपदाचा मुकुट मिळाल्याने आनंद व्यक्त केला. यावेळी समर्थकांनी फटाके फोडले आणि त्यांच्या आवडत्या संघाच्या निळ्या आणि पांढर्‍या जर्सीमध्ये अर्जेंटिनाचा राष्ट्रध्वज फडकावत विजय साजरा केला. विश्वचषक अंतिम सामन्यामध्ये आपल्या आवडत्या संघाच्या विजयानंतर अर्जेंटिनाचे काही समर्थक एकमेकांना मिठी मारताना आणि मिठाई वाटताना दिसले. 

इतर बातम्या

In Pics : दीपिकाचे ‘फिफा’च्या अंतिम सामन्यातील ट्रॉफीचे अनावरण करतानाचे फोटो समोर



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …