जाणून घ्या मिसेस वर्ल्डचा खिताब पटकवणारी सरगम ​​कौशलबद्दल

Sargam Koushal: भारताच्या सरगम ​​कौशलने (Sargam Koushal) अमेरिकेत आयोजित केलेल्या मिसेस वर्ल्ड 2022-23 (Mrs. World 2022-23 Pageant) या स्पर्धेचे विजेते पद पटकावलं आहे. लास वेगसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या  ‘मिसेस वर्ल्ड 2022’ या स्पर्धेत 63 देशांमधील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. 21 वर्षांनी भारतात सरगमने 21 वर्षांनंतर हा मुकुट भारतात आणला आहे. सध्या देशभरातील लोक सरगमला शुभेच्छा देत आहेत.  सरगम ​​कौशल हिच्याबद्दल जाणून घेऊयात…

सरगम ही जम्मू-काश्मिरची असून सध्या ती मुंबईमध्ये राहते. तिनं इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. तिने विशाखापट्टणम येथील शाळेत शिक्षिका म्हणूनही काम केले आहे. पुढे शिक्षकी पेशा सोडून सरगमनं मॉडेलिंग क्षेत्रात एन्ट्री केली. मिसेस इंडिया वर्ल्ड 2022 हा किताब देखील सरगमनं जिंकला. भारतीय नौदलातील अधिकारी आदित्य मनोहर शर्मा यांच्याशी 2018 मध्ये सरगमनं लग्न केलं. 

सगरम ही सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. ती वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करते. सगरमला तीस हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. 


सरगम ​​कौशलच्या आधी 2001 मध्ये  अभिनेत्री अदिती गोवित्रीकरने (Aditi Govitrikar) हा किताब जिंकला होता.  अदिती गोवित्रीकरनं भेजा फ्राय, दे दना दन, स्माइल प्लीज या चित्रपटांमध्ये काम केले.  अभिनेत्री सोहा अली खान, विवेक ओबेरॉय, मोहम्मद अझरुद्दीन, कॉउचर डिझायनर मौसमी मेवावाला आणि माजी मिसेस वर्ल्ड अदिती गोवित्रीकर यांनी  ‘मिसेस वर्ल्ड 2022’ या स्पर्धेला हजेरी लावली. 

हेही वाचा :  Sagar Karande : विनोदवीर सागर कारंडेचा 'चला हवा येऊ द्या'ला रामराम

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Sargam Koushal : अभिमानास्पद! सरगम ​​कौशलनं तब्बल 21 वर्षांनंतर पटकावला ‘मिसेस वर्ल्ड 2022’ चा किताब; व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …