IFFI : ‘इफ्फी’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला उद्यापासून सुरुवात

International Film Festival : भारतीय सिने-सृष्टीत सध्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (International Film Festival) म्हणजेच ‘इफ्फी’ची (IFFI) चर्चा आहे. उद्यापासून भारतातील या सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवाला सुरुवात होणार आहे. गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान हा महोत्सव पार पडणार आहे. 

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी सिनेमांचा डंका!

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पाच मराठी सिनेमांची निवड करण्यात आली आहे. यात विक्रम पटवर्धन यांचा ‘फ्रेम’, दिग्पाल लांजेरकचा ‘शेर शिवराज’, डॉ. सलील कुलकर्णी यांचा ‘एकदा काय झालं’, प्रवीण तरडे यांचा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ आणि शेखर रणखांबे यांच्या ‘रेखा’ या सिनेमांचा समावेश आहे. 


Reels

सिनेमाप्रेमींना मनोरंजनाची मेजवानी!

मराठीसह हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेमांचं खास स्क्रिनिंग असणार आहे. सिनेमाप्रेमींना आठवडाभर मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. जवळपास आठ दिवस हा महोत्सव सुरू असणार आहे. अनेक दिग्गज कलाकार मंडळींच्या उपस्थितीत हा महोत्सव पार पडणार आहे. त्यामुळे यंदा कोणते कलाकार चित्रपट महोत्सवाला उपस्थित राहणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 

‘IFFI 2022’ खास काय?

’53 वा गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ खूप खास असणार आहे. या महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी बॉलिवूड अभिनेता अजय देवगनच्या बहुचर्चित ‘दृश्यम 2’चे खास स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले आहे. तसेच एसएस राजामौलींचा ‘आरआरआर’ आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘अभिमान’ हा सिनेमादेखील प्रेक्षकांना महोत्सवाच्या पहिल्या दिवशी पाहता येणार आहे. 

हेही वाचा :  'हर हर महादेव' बाबत राज ठाकरेंचे मनसेच्या प्रवक्त्यांना महत्त्वाचे आदेश

IFFI मध्ये कोणते हिंदी सिनेमे पाहायला मिळणार?

‘थ्री ऑफ अस’, ‘द स्टोरी टेलर’, ‘मेजर’, ‘सिया’, ‘द कश्मीर फाइल्स’ हे हिंदी सिनेमे दाखवले जाणार आहेत. तसेच एस.एस राजामौलींचा ‘आरआरआर’ हे तेलुगू वर्जनमधील सिनेमा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

संबंधित बातम्या

International Film Festival: शेर शिवराज, आरआरआर आणि द कश्मीर फाइल्स; 53 व्या इफ्फीमध्ये हे चित्रपट दाखवले जाणार, पाहा संपूर्ण यादी



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …