Interesting Fact : दारुच्या ग्लासला Peg का म्हणतात? ‘बसण्या’आधी हे वाचाच

Peg Meaning : ‘थोडी…सी जो पी ली है…. चोरी तो नही की है….’ हे गाणं तुम्ही ऐकलं असेल. या गाण्यामध्ये पिण्याचा संबंध कशाशी आहे हेसुद्धा वेगळं सांगण्याची गरज नाही. हल्ली एखादी पार्टी असो, बऱ्याच वर्षांनी झालेली मित्रमंडळींची भेट असो किंवा मग एखादा कौटुंबीक कार्यक्रम असो. काहींसाठी मद्य/ Drinks ची जोड मिळाल्याशिवाय या गोष्टी पूर्णच होत नाहीत. त्यामुळं बऱ्याच Celebrations मध्ये तुम्हाला दारुचे ग्लास भरलेले दिसतील. ही बाब आता कौतुकाची राहिलेली नाही, पण त्याच अभिमान वाटावं असंही काही नाही. कारण, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक घातकच. हा राहिला वादाचा मुद्दा. पण, तुम्हाला माहितीये का दारुचा ग्लास भरताना कितीचा ‘पेग’ बनवू असा प्रश्न का केला जातो? 

मुळात पेग म्हणजे काय, हाच प्रश्न तुम्हाला पडला ना? 

सोप्या शब्दांत सांगावं तर, पेग म्हणजे एक परिमाण. दारु मापण्यासाठी या परिमाणाचा वापर केला जातो. सहसा 30 मिली, 60 मिली, 90 मिली किंवा काही वेळा 120 मिली (पटियाला पेग) या प्रमाणात दारु ग्लासात ओतताना मोजली जाते. 30 मिली हा सर्वात लहान पेग असतो. भारतात पटियाला पेग (Patiala Peg), म्हणजेच 120 मिली हे सर्वात मोठं परिमाण मानलं जातं. (how a glass of liquor got its name peg read interesting fact )

हेही वाचा :  Bank Job: कमी शिक्षण झालंय? BOI मध्ये मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

 

(Drink Shorts) दारुचे शॉर्ट्सही असतात. ज्यामध्ये सहसा 30 मिली दारु असते. या शॉट्समध्ये कोणत्याही प्रकारचा ज्यूस, सोडा किंवा पाणी मिसळलेलं नसतं. 

पेग या शब्दाची सुरुवात कुठून झाली? (From when people started using term PEG?)

तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, अमुक प्रमाणात दारु ग्लासात ओतल्यानंतर तमुक पेग बनवला असं लोक का म्हणतात? याच्याशीही संबंधित एक कहाणी आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये अतिशय कडाक्याच्या थंडीतही मजूर काम करत होते. जेव्हा ते आपला रोजंदारी भत्ता घेण्यासाठी मालकाकडे जात होते. त्यावेळी खाणीचे मालक मजुरांच्या हाती पगारासोबतच ब्रँडीचा ग्लास (A glass of brandy) देत होते. 

हातात दिलेली  ग्लासभर ब्रँडी पिऊन हे मजुर एकच धमाल करायचे. तेव्हापासून ते या ग्लासाला प्रिशियस इविनिंग ग्लास (Precious Evening Glass) असं म्हणू लागले. पुढे जाऊन याच शब्दाचं लहान स्वरुप म्हणून PEG हा शब्द अस्तित्वात आला आणि प्रचलित झाला. आहे की नाही ही माहिती कमाल? बघा ही माहिती तुमच्याही मित्रांना सांगून… 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Indians in America : अमेरिकेचे नागरिकत्व घेण्यात भारत दुसऱ्या क्रमांकावर, एका वर्षात 65000+ भारतीय झाले अमेरिकन

American Community Survey data in Marathi:  अमेरिकन नागरिक बनणाऱ्या भारतीयांची संख्या सातत्याने वाढत आहे. असे …

Kolhapur LokSabha : शाहू महाराजांविरुद्ध कोण ठोकणार शड्डू? कोल्हापुरात भाजपची तिरकी चाल!

Kolhapur LokSabha Constituency : कोल्हापूर… दक्षिण काशी करवीर निवासिनी महालक्ष्मीची पावन भूमी… स्वराज्याच्या रक्षणासाठी लढलेल्या …