ग्लुकोमा काय आहे, काळ्या मोतीबिंदूमुळे डोळे गमावू शकता का?

What Is Glaucoma: ग्लुकोमा डोळ्यांशी संबंधित असा आजार आहे ज्याला काळा मोतीबिंदू नावानेही ओळखले जाते. हा आजार तुमच्या Optic Nerve ला बाधित ठरतो. यामुळे दृष्टी कमकुवत होऊन तुम्हाला आंधळेपणा येण्याची शक्यता असते.

ग्लुकोमा असल्याचे लवकर कळले नाही तर मात्र डोळे गमावू शकता आणि तुम्हाला अधिक नुकसान होण्यापासून वाचायचे असेल तर ग्लुकोमाची लक्षणे, कारणे आणि उपाय या लेखातून आम्ही सांगत आहोत. डॉ. अजय शर्मा मुख्य वैद्यकीय संचालक, EyeQ यांच्याकडून आम्ही ही माहिती घेतली आहे. (फोटो सौजन्य – iStock)

ग्लुकोमाची लक्षणे काय आहेत?

ग्लुकोमाची लक्षणे काय आहेत?

What Are The Symptoms Of Glaucoma: ग्लुकोमाचा सर्वात सामान्य प्रकार म्हणजे प्रायमरी ओपन अँगल ग्लुकोमा. यामध्ये डोळ्यांची दृष्टी हळूहळू कमी होते. याशिवाय याचे कोणतेही स्पष्ट लक्षण नाही. त्यामुळे तुम्ही किमान वर्षभरात एकदा तरी डोळे तपासून घेणे आवश्यक आहे. नेत्र रोग विषेतज्ज्ञ तुम्हाला याबाबत योग्य तो सल्ला देऊ शकतात. तसंच Acute Angle Glaucoma हा नॅरो अँगल ग्लुकोमा नावाने ओळखला जातो आणि हे अत्यंत शेवटचे टोक आहे. याची लक्षणे खालीलप्रमाणे –

  • डोळ्यात अति दुखणे
  • सतत मळमळ होणे
  • उलट्या होणे
  • डोळे लाल होणे
  • दृष्टीमध्ये चारही बाजूने रंगीत गोष्टी दिसणे
  • अचानक दृष्टी कमी होणे
हेही वाचा :  शब्दांवाचून कळले सारे... 20 वर्षानंतर अचानक जोडीदार समोर येऊन बसला अन्...; सेलिब्रिटीचा हा Video पाहाच

ग्लुकोमा का होतो?

ग्लुकोमा का होतो?

What Causes Glaucoma: ग्लुकोमाची अनेक कारणे असतात. डोळ्यांच्या मागच्या बाजूला एक स्वच्छ तरल पदार्थ तयार होत असतो. ज्याला Aqueous Humor म्हटले जाते. हा जेव्हा पूर्ण भरतो तेव्हा डोळ्यांच्या पुढील बाजूला येतो आणि मग कॉर्निया आणि आयरीजमधून बाहेर निघतो. यामुळे नैसर्गिक दबाव येऊन Intraocular Pressure अर्थात IOP वाढते आणि त्याचा सर्व भार ऑप्टिक नर्व्हवर येतो. यामुळे डोळ्यांची दृष्टी कमी होऊ लागते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार याने दबाव अधिक वाढतो –

  • डोळ्यांच्या पुतळ्या मोठ्या करण्यासाठी घालण्यात येणारे आय ड्रॉप
  • डोळ्यातून येणाऱ्या पाण्याच्या नळीमध्ये संक्रमण
  • कोर्टिकोस्टेरॉईड्ससारखी औषधे
  • ऑप्टिक नर्व्हमध्ये रक्तप्रवाह कमी अथवा योग्य नसणे
  • उच्च रक्तदाबाची समस्या

(वाचा – Weight Loss: रोज अर्धा तास व्यायाम की १० हजार पावलं चालणे, वजन कमी करण्यासाठी काय योग्य)

ग्लुकोमाचे प्रकार

ग्लुकोमाचे प्रकार

What Are The Types Of Glaucoma: ग्लुकोमा हे पाच प्रकारचे असतात. साधारणतः यामध्ये काय वेगळेपणा आहे जाणून घ्या.
Open Angle (Chronic) Glaucoma: या ग्लुकोमामध्ये हळूहळू दृष्टी जाते. यात पटकन लक्षणे दिसून येत नाहीत आणि हा सर्वात सामान्य प्रकार आहे
Angle Closer Acute Glaucoma: तुमच्या डोळ्यात अक्वेयस ह्यूमर फ्लुईड हे प्रवाहाच्या विरूद्ध दिशेला जमा झाले तर डोळ्यांवर गंभीर परिणाम होतात. ही शेवटची स्थिती अकते. यामध्ये धुसर दिसणे, डोळ्यांमध्ये आग होणे अशी लक्षणे असतील तर त्वरीत डॉक्टरांकडे जायला हवे
Congenital Glaucoma : कॉग्निटल ग्लुकोमा हा साधारणतः जन्मजात असतो अथवा डोळ्यातून सतत पाणी येणे वा दृष्टीत संवेदनशीलता जाणवणे दिसून येते. हा अनुवंशिक असतो
Secondary Glaucoma : मोतीबिंदू अथवा डोळ्यांचा ट्यूमरसारख्या समस्यांना सेकेंडरी ग्लुकोमा म्हटलं जातं. कोर्टिकोस्टेरॉईड्स औषधांमुळे हा ग्लुकोमा होऊ शकतो
Normal Tension Glaucoma: काही बाबतीत डोळ्यांवर दबाव न येताही ऑप्टिक नर्ववर दबाव आलेला दिसून येतो. याचे कारण स्पष्ट नाही मात्र ऑप्टिक नर्वमध्ये रक्तप्रवाह योग्य नसल्याने हे होऊ शकते

हेही वाचा :  Maharashtra Monsoon News: पुढील 5 दिवस महत्त्वाचे; राज्यातील 'या' भागांना IMD कडून अलर्ट जारी!

(वाचा – Heart Blockage: बायपास सर्जरीशिवायही हार्ट ब्लॉकेजची समस्या होईल दूर, बाबा रामदेवने सांगितले ४ उपाय)

ग्लुकोमाचा सर्वाधिक धोका कोणाला?

ग्लुकोमाचा सर्वाधिक धोका कोणाला?

WHO च्या म्हणण्यानुसार जगभरात आंधळेपणाचे सर्वात मोठे कारण ग्लुकोमा आहे. ६० वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या व्यक्तींना ग्लुकोमाचा अधिक धोका असतो. तर आशियाई व्यक्तींना अँगल क्लोजर ग्लुकोमा होऊ शकतो आणि जपानी मूळ असणाऱ्या व्यक्तींना लो – टेन्शन ग्लुकोमाचा अधिक त्रास होण्याची शक्यता असते.

डोळ्यात सूज अथवा पातळ कॉर्नियामुळेही डोळ्यांवर दबाव येऊन ग्लुकोमाचा धोका वाढतो. अनुवंशिकता, मेडिकल हिस्ट्री, डायबिटीस अथवा हाय ब्लड प्रेशर असणाऱ्यांनाही ग्लुकोमाचा धोका संभवतो.

(वाचा – या खास चटणीने करा युरिक अ‍ॅसिडची समस्या दूर, आहारात करून घ्या समाविष्ट )

ग्लुकोमावरील उपाय

ग्लुकोमावरील उपाय

Glaucoma Treatment: ग्लुकोमाचा उपाय IOP कमी करणे असते जेणेकरून अधिक डोळ्यांचे नुकसान होऊ नये. आयड्रॉपसह याचे उपाय सुरू होतात. मात्र अधिक त्रास होत असल्यास, डॉक्टर योग्य ती औषधे अथवा सर्जरीचा उपाय सुचवतात. यामध्ये ड्रेनेज पुन्हा तयार करून, ब्लॉकेजच्या कारणामुळे तायर होणारे टिश्यू हटविण्यात येतात.

वेळीच ग्लुकोमावर उपाय करून डोळे वाचविण्याची गरज आहे. त्यामुळे डॉक्टर नेहमीच त्वरीत उपाय करण्यावर भर देतात.

हेही वाचा :  "फ्रान्समधली दंगल थांबवायची तर योगींना बोलवा"; युरोपातल्या डॉक्टरची अजब मागणी

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपत्तीची…’, CM एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde on Uddhav Thackeray: धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या निधनानंतर मी उद्धव ठाकरेंना …

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …