या आजाराने गळतात केसांचे पुंजकेच्या-पुंजके, 1 दिवसात पडतं टक्कल,शास्त्रज्ञांचे हे 8 उपाय देतात लांब-घनदाट केस

Best oil for hair loss and regrowth : केस गळणे ही सध्याच्या काळातील सर्वात गंभीर समस्यांपैकी एक समस्या बनली आहे. सगळ्यात जास्त टेन्शन तर तेव्हा येते आपले केस एखाद्या आजारामुळे झपाट्याने गळत असतात आणि आपल्याला या आजाराची जाणीवही नसेल. अनेकदा असे दिसून येते की, काही लोकांच्या केसांचे पुंजकेच्या पुंजके पडतात आणि डोक्यावर रिकामे पॅच तयार होतात. तर मंडळी, याचे कारण म्हणजे एलोपेसिया एरीटा (Alopecia Aerate) हा आजार होय. एलोपेसिया एरीटा हा एक आजार आहे ज्यामध्ये केवळ डोक्यावरचेच नाही तर शरीराच्या कोणत्याही भागावरचे केस पुंजक्यांच्या स्वरूपात गळू लागतात.

हा एक प्रकारचा ऑटोइम्यून डिसऑर्डर आहे ज्यामध्ये पीडित व्यक्तीला शारीरिक वेदना किंवा आजार जाणवत नाही. पण मनोवैज्ञानिक रूपाने हा विनाशकारी आजार असू शकतो. सर्वात वाईट आणि गंभीर गोष्ट म्हणजे हा आजार कोणतीही लक्षणं न दाखवता कोणालाही, कधीही आणि कोणत्याही वयात होऊ शकतो. जाणून घेऊया हा आजार नेमका काय आहे व याची लक्षणे, कारणे आणि उपाय काय? (फोटो सौजन्य :- iStock)

एलोपेसिया एरेटा नक्की काय आहे?

एलोपेसिया एरेटा नक्की काय आहे?

AADA च्या रिपोर्टनुसार, एलोपेसिया एरेटा या आजारात तुमची रोगप्रतिकारक शक्ती अर्थात इम्युन सिस्टमच तुमच्या केसांच्या रोम छिद्रांवर (Hair Follicles) हल्ला करू लागते. यामुळे प्रभावित भागात केस गळतात आणि टक्कल पडते.

(वाचा :- हा कॅन्सर लक्षणं न दाखवता जन्मापासून शरीरात कणाकणाने वाढतो, मेंदू व हाडांत पसरण्याआधी दाखवतो फक्त हे एकच लक्षण)​

हेही वाचा :  Hair Growth : 1 महिन्यात कंबरेपेक्षाही लांब व घनदाट होतील केस, टक्कल पडलेल्या जागीही येतील केस, फक्त करा ‘हे’ घरगुती उपाय!

काय आहेत या आजाराची लक्षणे?

काय आहेत या आजाराची लक्षणे?

केस गळणे, नखांचा आकार, पोत किंवा रंग बदलणे, तणाव किंवा चिंता ही लक्षणे या आजाराची प्राथमिक लक्षणे असून याव्यतिरिक्त जर तुम्हाला अचानक थायरॉईड, त्वचारोग, ल्युपस, सोरायसिस, IBD संधिवात आणि इतर ऑटोइम्युन डिसऑर्डरची लक्षणे जाणवू लागली असतील तर नक्कीच हा आजार झाल्याची शक्यता असते. अशावेळी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधून लगेच उपचार घ्यावेत.

(वाचा :- हे 6 पदार्थ किडनीचे फिल्टर करतात कायमचे खराब, झपाट्याने वाढतात हे 7 भयंकर आजार, किडनी फेलमुळे होऊ शकतो मृत्यू)​

आजारावरचे घरगुती उपाय

आजारावरचे घरगुती उपाय

एलोपेसिया एरेटा आजराच्या उपचारासाठी काही पारंपारिक औषधे आणि क्रीम आहेत ज्या सामान्यतः डॉक्टरांकडून केसांची पुन्हा वाढ होण्यासाठी दिली जातात. पण अशा औषधांचे अनेक दुष्परिणाम देखील आहेत. या आजारामुळे होणारी केसगळती थांबवण्यासाठी आणि केसांची पुन्हा वाढण्यासाठी काही घरगुती उपाय देखील आहेत, जे तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करतात आणि सूज कमी करतात. शिवाय केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या पोषक तत्वांची कमतरता देखील भरून काढतात.

(वाचा :- Cholesterol Chutney नसांत घाणेरडं कोलेस्ट्रॉल साचल्याने येतो हार्ट अटॅक,हा हिरवा पदार्थ नसा करतो मुळापासून साफ)​

प्रोबायोटिक्स

प्रोबायोटिक्स

पचनसंस्थेचा आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो. म्हणूनच प्रोबायोटिक्स एलोपेसिया एरेटा रोगासह अनेक ऑटोइम्युन डिसऑर्डरवर उपचार करण्यास मदत करू शकतात. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांना असे आढळले की, उंदरांना प्रोबायोटिक बॅक्टेरिया खाऊ घातल्याने त्यांच्यात अनेक चांगले बदल दिसून आले. त्यांची केस आणि त्वचा मऊ व हेल्दी झाली.

हेही वाचा :  Golden Blood Group : देवतांचा रक्तगट माहितीये? जगभरात अवघ्या 45 लोकांकडे आहे ‘हा’ गोल्डन ब्लड ग्रुप

(वाचा :- बापरे, WHO दिला धोक्याचा इशारा, करोनासारखं एवियन व्हायरस घालणार कहर, चिकन खाणा-यांनो सावधान, ही 9 लक्षणं भयंकर)​

झिंक

झिंक

झिंक हा एलोपेसिया एरिटासाठी एक उत्तम उपाय आहे कारण झिंक हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि तुमचे आतडे दुरुस्त करते. तसेच हे केसांच्या फॉलिकल्सचे कार्य सुधारते. इंटरनॅशनल जर्नल ऑफ डर्मेटोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या 2016 च्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, झिंक सप्लिमेंट्स घेतल्याने केस गळणे कमी होण्यास मदत होते आणि केसांची वाढ वेगाने होते. भोपळ्याच्या बिया, चणे, काजू, दही, पालक यासारख्या गोष्टी झिंक मिळवण्यासाठी खाव्यात.

(वाचा :- सकाळीही फ्रेश वाटत नसेल, फक्त 4 कामं करून थकत असाल तर तुम्ही आहात या आजाराचे बळी, ताबडतोब जेवणात घाला हा मसाला)​

जिनसेंग

जिनसेंग

जिनसेंग हे एक लोकप्रिय हर्बल औषध आहे ज्यामध्ये विविध औषधी तत्वे असतात. हे सूज कमी करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करते. कोरिया युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिसीन येथे 2012 साली केल्या गेलेल्या अभ्यासात असे आढळून आले की लाल जिनसेंग हे अलोपेसिया एरियाटासाठी प्रभावी आणि नैसर्गिक उपचार म्हणून कार्य करते.

(वाचा :- Diabetes Yoga: डायबिटीज करतो किडनी, डोळे, लिव्हरसारखे महत्त्वाचे अवयव कायमचे निकामी, लगेच घरीच करा ‘हे’ एक काम)​

लॅव्हेंडर इसेन्शियल ऑईल

लॅव्हेंडर इसेन्शियल ऑईल

लॅव्हेंडर तेल एक शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट म्हणून कार्य करते आणि सूज कमी करते. 2016 मध्ये उंदीरांवर केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की जेव्हा संशोधकांनी उंदरांच्या टक्कल पडलेल्या पॅचवर लॅव्हेंडर ऑईल लावले तेव्हा केसांच्या रोम छिद्रांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली, केसांचे रोम छिद्र पूर्ववत झाले आणि त्वचेचा थर सुद्धा योग्य स्थितीमध्ये आला.

हेही वाचा :  Mira Rajput hair fall : केस गळतीने वैतागलेल्या मीरा राजपूतने कापले पौर्णिमेच्या दिवशी केस, सांगितले किती कामी आला ‘हा’ उपाय..!

(वाचा :- Causes of Uric Acid : ‘ही’ 7 फळं पोटात जाऊन बनवतात भयंकर युरिक अ‍ॅसिड, मुतखडा होऊन किडनी होऊ शकते कायमची फेल..)​

रोझमेरी इसेन्शियल ऑईल

रोझमेरी इसेन्शियल ऑईल

रोझमेरी तेलाचा वापर सामान्यतः केसांची जाडी वाढण्यासाठी आणि वाढ अधिक वेगाने होण्यासाठी केला जातो. हे तेल सेल्युलर चयापचय वाढवते ज्यामुळे केसांची जलद वाढ होते. असे म्हटले जाते की याचा प्रभाव हा मिनॉक्सिडिल सारखाच आहे जो की एलोपेसिया एरिटासाठी पारंपारिक उपचार आहे. याव्यतिरिक्त, तुम्ही अँटी-इंफ्लेमेट्री फूड्सचे सेवन केले पाहिजे. शिवाय तणाव टाळा आणि क्वेर्सेटिन वापरा जे फ्लेव्होनॉइड अँटीऑक्सिडंट आहे.

(वाचा :- Weight Loss: हा पदार्थ लंचमध्ये खा,बसल्या बसल्या पोट-मांड्यांवरची चरबी मेणासारखी वितळेल,जिम-डाएटला कराल गुडबाय)​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मराठी माणूस यांची चड्डीपण..’, ‘बिनशर्ट’वरुन मनसेचा ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, ‘हिरव्या..’

Uddhav Thackeray Vs Raj Thackeray: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त दिलेल्या …

घरातील नोकरचाकरांना 654 रुपये पगार, पण कुत्र्यांवर खर्च केले 8,09,384; हे’ भारतीय अब्जाधीश कुटुंब अडकलं वादात

Hinduja Family Accused Of Exploiting Staff : जगभरातील अनेक धनाढ्य कुटुंबांविषयी, त्यांच्या जीवनशैलीविषयी सामान्यांना कायमच …