हार्वर्डने मानले चिंता कमी करणारे हे भारतीय योग प्रकार आहेत जबरदस्त

भारतात ‘योग’ ही एक प्राचीन पद्धत आहे. योग केल्याने सुंदर जीवनशैली निर्माण होण्यास मदत होते.भारतीय संस्कृतीत योग या प्रकाराला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे. आपल्या पूर्वजांनी अनेक वर्षांपूर्वी लिहून ठेवलेल्या ग्रंथामध्ये योगाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. पूर्वी या गोष्टीवर बोटे उचलली जायची पण या आता मात्र ही परिस्थिती खूपच बदलेली आहे. हळूहळू संपूर्ण जग भारतीय परंपरेला स्विकारताना दिसत आहे. आरोग्य संस्था हार्वर्ड मेडिकल स्कूलने देखील योगाच्या 5 फायद्यांचे महत्त्व सांगितले आहे. (फोटो सौजन्य :- IStock)

योगाचे प्रकार

योगाचे प्रकार

हार्वर्ड स्कूलच्या मते योग प्रकारामुळे मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. मात्र या सर्वांमध्ये हट योगचे खूप महत्त्व पाहायला मिळते. या योग प्रकारात शरीराच्या जास्त हालचाली कराव्या लागतात. अष्टांग योग, हॉट योग, पॉवर योग, कुंडलिनी योग हे त्याचे इतर काही प्रकार आहेत.

योग प्रकाराचे अनेक फायदे

योग प्रकाराचे अनेक फायदे

योग प्रकाराचे अनेक फायदे पाहायला मिळतात. यामुळे अनेक लोक स्वत:च्या वर्तमानावर लक्ष केंद्रित करता येते. या योग प्रकाराला माइंडफुलनेस असं म्हणतात. हा योगा केल्याने व्यक्तीमध्ये शरीराप्रती सजगता वाढते.

हेही वाचा :  वयाच्या ५८ व्या वर्षीही आमिर खान इतका तरुण कसा दिसतो?

(वाचा :- पोट साफ न होणं, बद्धकोष्ठतेची समस्या झटक्यात होणार दूर,स्वयंपाकघरातील ‘हे’ ५ पदार्थ ताबडतोब खायला सुरुवात करा )

वजन कमी होण्याचा वेग वाढतो​

वजन कमी होण्याचा वेग वाढतो​

योगासने करणारे लोकांमध्ये वजन कमी होण्यास मदत होते. योग केल्याने भूकेवर नियंत्रण येऊ शकते. हार्वर्ड स्कूलच्या म्हणण्यानुसार जे लोक चार वर्षांपासून आठवड्यातून किमान 30 मिनिटे योग करतात त्यांचे वजन इतरांपेक्षा कमी होते. त्याच वेळी, काळजीपूर्वक खाल्ल्याने वजन कमी होण्यास देखील मदत होते.

​फिटनेस वाढवणे

​फिटनेस वाढवणे

योगामुळे मन आणि शरीरातील तणाव आणि चिंता कमी होते असे मानले जाते. पण त्यामुळे माणसाची व्यायाम करण्याची क्षमताही वाढते. हार्वर्डला असे आढळून आले की ज्या लोकांनी यापूर्वी कधीही योगा केला नव्हता पण योगा करण्यास सुरुवात केली आहे त्यांची सहनशक्ती, शरीराची लवचिकता,फुफ्फुस-हृदय क्षमता वाढली आहे.

(वाचा :- आता बिनधास्त खा रबडी-जिलेबी! या भयंकर आजारापासून मिळेल कायमची सुटका, फक्त डॉक्टरांनी सांगितलेली वेळेतच खा )

​हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी फायदेशीर

​हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी फायदेशीर

योगमुळे हृदय आणि मज्जातंतूंच्या संपूर्ण प्रणालीला हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी सर्व समस्या दूर होतात. असे विविध संशोधनांत आढळून आले आहे. त्याचप्रमाणे उच्च रक्तदाब, लिपिड प्रोफाइल आणि इंसुलिन संवेदनशीलता सुधारते.

हेही वाचा :  Weight Loss साठी करण्यात येणारे इंटरमिटेंट फास्टिंग कोणी करू नये, महत्त्वाची माहिती

मानसिक-शारीरिक शक्ती

मानसिक-शारीरिक शक्ती

योगाभ्यास केल्याने मानसिक-शारीरिक शक्ती आणि श्वास विकसित होतो, ज्यामुळे आंतरिक जागरूकता वाढण्यास देखील मदत होते. योगासने न करणाऱ्यांच्या तुलनेत योगाच्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या शरीराची स्वीकृती वाढते.
(टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात …