बारीक कंबर हवी असेल तर वापरा श्रद्धा कपूरच्या या फिटनेस ट्रिक्स

Fitness Secret: वजन वाढताना पटापट वाढतं पण कमी करताना मात्र नाकी ९ येतात. अनेक अभिनेत्रींची फिगर पाहिल्यानंतर इतकी बारीक कंबर कशी राहाते असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहात नाही. पण त्यासाठी या अभिनेत्री नक्कीच भरपूर प्रयत्न करतात आणि आपल्या फिटनेसकडे उत्तम लक्ष देतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे श्रद्धा कपूर. श्रद्धाकडे पाहिल्यानंतर तिच्या वयाचा अंदाज येत नाही. मात्र श्रद्धाने कधीच तिशी उलटली आहे. तरीही इतके वर्ष श्रद्धाची स्लिम वेस्ट अर्थात बारीक कंबर तशीच आहे. पण यासाठी श्रद्धा नक्की कोणत्या ट्रिक्स वापरते याची आपण माहिती घेऊया. फिटनेस टिकविण्यासाठी आणि वेट लॉससाठी तुम्हाला याची नक्कीच मदत होईल. श्रद्धाकडून घ्या प्रेरणा आणि करा कंबर बारीक.

वर्कआऊट

Workout For Slim Waist: कंबर बारीक राहण्यासाठी आणि फिगर मेंटेन राहण्यासाठी रोज नियमितपणे वर्कआऊट करण्याची आवश्यकता आहे. यासह फॅट बर्न करण्यासाठी अर्थात चरबी जाळण्यासाठी रोज कार्डिओ करणेही चांगले आहे. त्यामुळे अतिरिक्त चरबी कमी होण्यास आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

हेही वाचा :  'जर मुलगी झाला तर...', जन्माआधीच ठरलं होतं पंकजा मुंडेंचं नाव, पण वडिलांची इच्छा अपूर्णच

श्रद्धाचा वर्कआऊट व्हिडिओ

फिटनेससाठी डान्स

Dance For Slim Waist: झुंबा, बेली आणि हिप – हॉप असे डान्सप्रकार वजन कमी करण्यास उपयुक्त ठरतात. श्रद्धानेही आपल्या फिटनेसमध्ये हे समाविष्ट करून घेतले आहे. तुम्हालाही आपली कंबर श्रद्धासारखीच राहावी वाट असेल तर तुम्ही या डान्स पद्धतींचा अवलंब करावा.

(वाचा – स्टीलच्या भांड्यात हे पदार्थ शिजवत असाल तर वेळीच व्हा सावध, आरोग्याला धोका)

योगामुळे होतील फायदे

Yoga For Slim Waist: योगामुळे संपूर्ण शरीराला फायदा मिळतो. इतकंच नाही तर मानसिक आरोग्यालाही योगामुळे फायदा होतो. शिल्पा शेट्टी, मलायका अरोरा, बिपाशा बासू अनेक अभिनेत्री आपल्या फिटनेससाठी योगाचा आधार घेतात आणि श्रद्धाही योगा करते. त्यामुळेच शरीरामध्ये लवचिकता व्यवस्थित राहाते आणि त्याशिवाय अंगावर चरबी चढत नाही. तसंच वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते आणि शरीर अधिक सुदृढ राहाते.

(वाचा – प्रेगन्सीनंतर चारू असोपाचे ट्रान्सफॉर्मेशन कसे करतेय वजन कमी, पुन्हा दिसली राजीव सेनसह)

डाएट प्लॅन

Diet Plan For Slim Waist: सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला आरोग्य आणि आपली फिगर मेंटेन ठेवायची असेल तर सकाळचा नाश्ता कधीही चुकवू नये. श्रद्धाच्या डाएटमध्ये नाश्त्याला दाक्षिणात्य पदार्थ अधिक असतात. डोसा, इडली, फळं अशा पदार्थांचा समावेश करून घ्यावा. तसंच पोहे, उपमा, साबुदाणा खिचडी असे अधिक फायबर असणारे पदार्थ तुम्ही नाश्त्यामध्ये समाविष्ट करून घ्या. त्यामुळे कंबर बारीक राहण्यास मदत मिळते. दुपारच्या जेवणात पोळी, भाजी, आमटी आणि भात असा घरचा डबा तुम्ही कॅरी करावा. जेणेकरून बाहेरील पदार्थ अधिक प्रमाणात खाऊन वजन वाढणार नाही.

हेही वाचा :  आताची मोठी बातमी! Disha Salian मृत्यू प्रकरणाची चौकशी SIT मार्फत केली जाणार, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

(वाचा – Weight Loss करण्यासाठी डाएटिंग करायचा कंटाळा येत असेल तर वापरा या सोप्या टिप्स)

रात्री लवकर जेवणे

साधारण ७ वाजेपर्यंत रात्री अनेक अभिनेत्री जेवतात. यामुळे अन्नपचन व्यवस्थित होऊन चरबी साचत नाही. श्रद्धादेखील ६-७ दरम्यान जेवते. त्यामुळे फिगर मेंटेन राहणं सोपं झालं आहे. भाजी, सलाड आणि सुप्सचा यामध्ये समावेश करून घ्यावा. जेणेकरून पोट भरलेले राहील आणि अधिक भूक रात्री लागणार नाही.

श्रद्धाचे असे रूटीन तुम्हीही फॉलो केले तर नक्कीच कंबर बारीक होण्यास आणि तशीच राहण्यास मदत मिळेल. तसंच कोणत्याही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डाएट फॉलो करू नका. तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर योग्य सल्ला घ्या आणि त्याप्रमाणे वागा.

(फोटो क्रेडिटः Shraddha Kapoor Instagram, Freepik.com)

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी…’; ‘पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही’वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे संस्थाप शरद पवारांवर …

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ भागात पडणार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : एप्रिल महिन्यापासून राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतही …