Weight loss inspiration : 122 किलो वजनामुळे लठ्ठ म्हणून उडवली जायची खिल्ली, सकाळी लिंबू पाणी व मध आणि लंचनंतर हे खास पाणी पिऊन घटवलं तब्बल 41 किलो वजन!

आज आपण अशा युगात आलो आहोत जिथे करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी आपण अनेकदा आपल्या आरोग्याचाच खेळ करतो, जे पूर्णपणे चुकीचे आहे. व्यस्त असल्यामुळे आपण काहीही खाऊ लागतो, त्यामुळे वजन वाढू लागते. हे वजन पुढे अनेक रोगांचे रूपही घेते. मात्र, असे काही लोक आहेत जे आपले वाढते वजन वेळीच कमी करतात. या लोकांपैकी एक म्हणजे आनंद बेले. इंजिनीअरिंगच्या काळात आनंदचे वजन झपाट्याने वाढू लागले. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि अनहेल्दी जीवनशैली हे त्याचे कारण होते. त्याच्या वाढलेल्या वजनामुळे त्याचे मित्र त्याला टोमणे मारायचे. या गोष्टींमुळे त्रासलेल्या आनंदने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. वजन कमी करण्याच्या या प्रवासात त्याच्या कुटुंबीयांनी आणि काही मित्रांनीही मदत केली. यानंतर आनंदने अल्पावधीतच आपले तब्बल ४१ किलो वजन कमी केले. चला तर जाणून घेऊया ते कोणते बदल होते ज्याद्वारे आनंदने विक्रमी वजन कमी केले.

  • नाव – आनंद बेले
  • वय – 28 वर्षे
  • शहर – नागपूर, महाराष्ट्र
  • वाढलेले वजन – 122 किलो
  • कमी केलेले वजन – 41 किलो
  • वजन कमी करण्यासाठी लागलेला वेळ – 7 महिने

(Image Credit : TOI)

वेट लॉस जर्नीची सुरूवात कशी झाली

आनंद सांगतो की, कॉलेजच्या काळात तो भरपूर जंक फूड खायचा इतकंच नाही तर त्याची जीवनशैलीही खराब होती, ज्यामुळे त्याचे वजन 120 किलोपर्यंत पोहोचले होते. आनंद सांगतो की, वजन वाढल्यानंतर त्याला बॉडी शेमिंगचाही सामना करावा लागला. पण एके दिवशी आनंदचा मित्र पंकजने त्याला जिममध्ये जाऊन वजन कमी करण्याचा सल्ला दिला. त्याच्या या वाटचालीला त्याच्या पालकांचाही पाठिंबा होता.

हेही वाचा :  Video :'हा तर बाहुबली!' नवजात बाळाच्या पराक्रमाचा व्हिडीओ तुम्ही पाहिला का?

(वाचा :- Bathing Habit : आजच सोडा अंघोळीबाबतची ‘ही’ घाणेरडी सवय, दीर्घायुष्यासाठी हार्वर्ड एक्सपर्ट्सनी सांगितली अंघोळ करण्याची योग्य पद्धत..!)

डाएट कसे होते

तो सकाळी रिकाम्या पोटी लिंबू आणि मध घातलेले कोमट पाणी प्यायचा.

  • दुपारचे जेवण –

डाळ, 2 चपात्या आणि एक वाटी सॅलेड खायचा. यामध्ये तो काकडी, कोबी इत्यादी खात असे. याशिवाय दुपारच्या जेवणानंतर तो अॅप्पल सायडर व्हिनेगर पाण्यात मिसळून प्यायचा.

  • रात्रीचे जेवण –

सॅलेड, कच्चे चीज आणि ओट्स. या जेवणातून तो प्रोटीन आणि फायबरची कमतरता पूर्ण करत असे.

  • व्यायामाआधीचे मील –

साखर नसलेली ब्लॅक कॉफी

  • व्यायामानंतरचे मील –

3 अंड्यांचा सफेद भाग आणि एक सफरचंद

(वाचा :- COVID Mask : घाणेरडा मास्क वापरण्याची चूक अजिबात करू नका, थेट फुफ्फुसापर्यंत पोहचेल इनफेक्शन, मास्क एक्सपायर झाला हे कसं ओळखावं?)

वर्कआउट

आनंद सांगतो की, तो पूर्वी सकाळी वेट ट्रेनिंग करत असे. याशिवाय तो दररोज 30 मिनिटे कार्डिओ व्यायामही करत असे. अल्टरनेट डे कोर ट्रेनिंग देखील करायचा. संध्याकाळी तो एक तास जॉगिंग करायचा आणि 30 मिनिटे स्किपिंग करायचा. याद्वारे तो वेगाने वजन कमी करू शकला. त्याचवेळी, त्याचा असा विश्वास आहे की विश्रांती देखील तितकीच महत्त्वाची आहे कारण ती आपल्याला दिवसभराच्या थकव्यातून रिकव्हर करण्यात मदत करते.

हेही वाचा :  डायबिटिजवर जालीम उपाय आहे हे भारतीय फूल, पटापट कमी करेल Blood Sugar

(वाचा :- Symptoms of High Cholesterol : कोलेस्ट्रॉल वाढल्यावर येऊ शकतो हार्ट अटॅक, कोलेस्ट्रॉल वाढल्यास डोळ्यांवर दिसतात ‘ही’ लक्षणे, लगेच करा चेकअप!)

फिटनेस सीक्रेट

आनंद सांगतो की तो वजन कमी करण्याबाबत खूप गंभीर होता. यामुळे त्यानी आपल्या आहारातून साखर, तळलेले पदार्थ वगळले होते. याशिवाय त्यानी मिठाचे सेवनही कमी केले होते. तसेच या काळात आनंदने भरपूर पाणी पिण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्याची त्वचाही चमकदार झाली.

(वाचा :- Bleeding Piles : मुळव्याध झालाय? मग औषधं व सर्जरी सोडा, घरच्या घरी करा या 5 उपायांनी मिळवा मुक्ती..!)

वजन वाढल्यामुळे आल्या या समस्या

तो म्हणतो की जेव्हा त्याचे वजन वाढले तेव्हा तो त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता. झोपल्यावर घोरण्याचा आवाज येऊ लागला होता आणि त्याला श्वास घेण्यासही त्रास होऊ लागला होता. तो कोणत्याही पार्टीला वगैरे जाऊ शकायचा नाही आणि एंग्जायटीचा बळी पडला होता. याशिवाय वजन वाढल्यामुळे लोक त्याला खूप वाईट सल्ले देऊ लागले होते. याशिवाय आनंद सांगतो की लोक त्याला लठ्ठ म्हणू लागले होते ज्याचे त्याला खूप वाईट वाटायचे. त्याचवेळी नातेवाईकांनीही त्याच्याबद्दल गॉसिप करण्यास सुरुवात केली.

(वाचा :- Immunity booster foods : इम्युनिटी होईल 100 पट मजबूत, डाएटिशियनने सांगितले ब्रेकफास्ट, लंच व डिनरमध्ये काय खाणं गरजेचं..!)

जीवनशैलीमध्ये बदल

आनंद सांगतो की त्याची जीवनशैली सुधारल्यानंतर त्याचे वजन झपाट्याने कमी झाले. त्यामुळे त्याने गमावलेला आत्मविश्वासही परत मिळवला होता. तसेच तो स्वतःत झालेला बदल पाहून खूप आनंदी आहे. याशिवाय आनंद सांगतो की त्याने स्वतःवर प्रेम करायला सुरुवात केली आहे आणि आता तो त्याचे जुने आवडते कपडे घालत आहे. तो म्हणतो जे लोक तुमच्या लठ्ठपणाची खिल्ली उडवतात तेच लोक तुम्ही फिट असताना तुमची प्रशंसाही करतात.

हेही वाचा :  आरोग्याशी खेळ! तुमच्या किचनमधील भाजीपाला सार्वजनिक शौचालयातला? किळसवाणा Video

(वाचा :- Heart and Corona Risk : सावधान, हार्ट पेशंट्सवर करोना करतोय जोराचा आघात, कार्डियोलॉजिस्टने सांगितले काय करावं व काय नाही..!)

टीप – वर सांगितलेला अनुभव हा तुमच्यासाठी सुद्धा लाभदायक असेलच असे नाही. त्यामुळे वरील टिप्स जशाच्या तशा फॉलो न करता तज्ज्ञ व जाणकारांचा सल्ला घ्या आणि तुमच्या शारीरिक स्थितीनुसार योग्य डाएट आणि वर्कआउट प्लान तयार करूनच वजन कमी करण्याचा प्रवास सुरु करा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

कारवाई टाळण्यासाठी मागितली एक लाखांची लाच; सोलापुरात PSI ला अटक

अभिषेक अडेप्पा, झी मीडिया, सोलापूर :  सोलापूर शहरात एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर …

KDMC Job: कल्याण डोंबिवली पालिकेत नोकरी, थेट मुलाखतीतून होणार निवड

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2023: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी …