Sagar Karande : विनोदवीर सागर कारंडेचा ‘चला हवा येऊ द्या’ला रामराम

Sagar Karande Chala Hawa Yeu Dya : ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमाच्या माध्यमातून सागर कारंडे (Sagar Karande) हे नाव घराघरांत पोहोचलं आहे. आजवर या कार्यक्रमाच्या माध्यमातून सागरने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. पण आता सागरने ‘चला हवा येऊ द्या’ या बहुचर्चित कार्यक्रमाला रामराम केल्याची बातमी समोर आली आहे. 

‘चला हवा येऊ द्या’च्या माध्यमातून सागरने कधी प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. तर कधी पोस्टमन काका बनून रडवलं आहे. अरविंद जगताप यांनी लिहिलेली पत्रे सागर कारंडेने आपल्या भावनिक शैलीत सादर केले आहेत. त्यामुळे हास्याच्या मंचावर प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणण्याचं काम सागरने केलं आहे. एकाचवेळी प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणि चेहऱ्यावर हसू आणण्याचं काम सागरला अचूक जमलं आहे. 

‘त्या’ व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

झी मराठीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पोस्टमन काकांची जागा श्रेया बुगडेने (Shreya Bugde) घेतलेली दिसत आहे. एकदा किचनमध्ये बायकोसोबत उभं तर राहून बघा, असं म्हणत झी मराठीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पत्राच्या रुपात कविता वाचताना श्रेया दिसत आहे. श्रेयाने खास पोस्टमनचा लुकदेखील केला आहे. 


सागरचे चाहते नाराज

पोस्टमन काकांची जागा श्रेया बुगडेने घेतल्याने सागरचे चाहते मात्र नाराज झाले आहेत. झी मराठीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. सागर कारंडे वाचत असलेलं पत्र मनाला भिडायचं, कुठे आहेस सागर कारंडे?, सागर कारंडेने चला हवा येऊ द्या का सोडलं?, श्रेया तुझ्या आवाजात सागरसारखा गंभीरपणा नाही, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहे. श्रेया बुगडे एक उत्तम अभिनेत्री असली तरी मनाला भिडणारं पत्र वाचण्यात ती कुठेतरी कमी पडली आहे. 

हेही वाचा :  पत्नीसोबत बॉईज हॉस्टेलमध्ये राहायचे पंकज त्रिपाठी, वॉर्डनला कळलं तेव्हा...

सागर कारंडेबद्दल जाणून घ्या…

सागर कारंडे एक उत्कृष्ट अभिनेता आणि लेखक आहे. ‘फू बाई फू’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून तो घराघरांत पोहोचला. त्याची आणि भारत गणेशपुरेची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यानंतर ‘चला हवा येऊ द्या’च्या माध्यमातून त्याने वेगवेगळ्या विनोदी भूमिका सादर करत प्रेक्षकांचं मन जिंकलं. त्यांचं हृदयस्पर्शी पत्रवाचन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. सागरने छोटा पडदा गाजवण्यासोबत रुपेरी पडद्यावरदेखील काम केलं आहे. जलसा, फक्त लढ म्हणा. बायोस्कोप, माय हिंदू फ्रेंड आणि एक तारा या सिनेमांत सागर महत्त्वाच्या भूमिकेत दिसला आहे. 

संबंधित बातम्या

Sagar Karande : तब्येत बिघडली, शो मस्ट गो ऑन म्हणत दुसऱ्याच नाटकाचा प्रयोग रंगला; तब्येतीबाबत सागर कारंडेने दिली माहिती



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …