कोण आहेत प्रेमानंद गोविंद महाराज?

Premanand Govind Maharaj: अनेकदा राजकारणी,अभिनेते, एखाद्या क्षेत्रातले दिग्गज हे लोक कोणत्यातरी धार्मिक स्थळाला भेटी दिलेलं आपण पाहतो. काही दिवसांपासून क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) एका धार्मिक स्थळावर आपल्या लेकीसोबत गेले होते. त्या धार्मिक स्थाळावरील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. विराट आणि अनुष्का हे रमण रेती मार्गावरच्या केली कुंजमधील प्रेमानंद गोविंद महाराजांकडे (Premanand Govind Maharaj) गेले होते. त्यांनी महाराजांचं दर्शन घेतलं. त्यानंतर प्रेमानंद गोविंद महाराज आहेत तरी कोण? विराटने पत्नी अनुष्का आणि मुलगी वामिकासोबत तब्बल पाऊण तास थांबून ज्यांच्यासोबत आध्यात्मिक चर्चा केली, ते महाराज आहेत कोण?  असे प्रश्न अनेकांना पडले.

इंस्टाग्राम स्क्रोल करताना तुम्हाला प्रेमानंद गोविंद महाराज यांचे व्हिडीओ दिसले असतील. प्रेमानंद गोविंद महाराजरांविषयी काही प्राथमिक माहिती मिळाली. ते मुळचे कानपुरच्या अखरी गावाचे आहेत. या महाराजांचं नाव अनिरुद्ध कुमार पांडेय असं होतं. त्यांच्या वडिलांचं नाव शंभू पांडेय आणि आईचं नाव राम देवी. लहान वयातच त्यांनी भक्ती ग्रंथ वाचण्यास सुरुवात केली. वयाच्या 13 व्या वर्षी घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी ब्रह्मचारी आयुष्य जगण्यास सुरूवात केली. दरम्यान, आनंदस्वरूप ब्रह्मचारी अशी उपाधी देखील त्यांना मिळाली.महावाक्य स्वीकारल्यावर त्यांना स्वामी आनंदाश्रम हे नाव पडलं आणि गंगा किनाऱ्यावर त्यांनी अनेक वर्ष तपश्चर्या केली. त्यानंतर त्यांनी मथुरा येथून रेल्वे पकडली. ते मोहितमल गोस्वामी यांच्याकडे दीक्षा घेण्यासाठी पोहोचले.त्याठिकाणी त्यांनी 10 वर्ष गुरूंची सेवा केली.त्यानंतर त्यांना वृंदावनसह देशातील अनेक ठिकाणी ख्याती मिळाली. ते आधी बनारसला गेले आणि त्यानंतर ते वृंदावनात गेले. तिथे त्यांना त्यांचे गुरु मिळाले. त्यांचं नाव श्री गौरंगी शरणजी महाराज असं सांगितलं जातं.

हेही वाचा :  बजेट कमी तरीही बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई! स्टोरीलाईनमुळे गाजले बॉलिवूडचे ‘हे’ चित्रपट!

गुरुकडून दिक्षा घेतल्यानंतर प्रेमानंद गोविंद महाराज वृंदावनातच आश्रमात रहायला लागले.प्रेमानंद गोविंद महाराज सध्यातरी वृंदावनमध्ये राहतात. गेल्या  18 वर्षांपासून  प्रेमानंद महाराजांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. दोन्ही किडन्या काम करत नसताना एखादा माणूस कसं जगत असेल? याची आपण कल्पनाच करु शकतो. बर त्यांनी या दोन्ही किडन्यांची नावं देखील ठेवली आहेत. एका किडनीचं नाव राधा आणि दुसऱ्या किडनीचं नाव कृष्ण. जेव्हा ते वृंदावनात रहायला लागले तेव्हा ते  लोकांकडे भीक्षा मागत होते.  प्रेमानंद गोविंद महाराज यांचे हजारो भक्त त्यांना आपली किडनी दान करण्यासाठी तयार आहेत. पण या गोष्टीसाठी प्रेमानंद महाराज तयार नाहीत. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की इतर कुणालाही इजा पोहचवून मी जगू इच्छित नाही.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …