Chandrayaan 3 Landing: कसं काम करणार चांद्रयान 3, भारत आणि सामान्य लोकांना मोहिमेचा काय फायदा होणार?

Chandrayaan-3 अवकाश संशोधन क्षेत्रात आज भारताने इतिहास घडवला. तमाम भारतीयांची छाती अभिमानाने फुललीय. भारतीयांची मान गर्वाने उंचावली आहे.. कारण भारताच्या इस्त्रोने  (ISRO) आज ऐतिहासिक कामगिरी केलीय. चांद्रयान मोहिम (Mission Chandrayaan) यशस्वी ठरलीय… भारताचं चांद्रयान-3 आज चंद्राच्या दक्षिण भागावर यशस्वीरित्या उतरलं. विक्रम लँडिंग रोव्हर (Vikram Rover) चंद्राच्या दक्षिण भागावर उतरलंय. भारताने त्यासोबतच नवा विक्रमही रचलाय. कारण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिलाच देश ठरलाय.  ज्या क्षणाची करोडो भारतीय वाट पाहत होते, आज ज्या क्षणासाठी करोडो भारतीय प्रार्थना करत होते, तो क्षण अखेर साकार झाला. भारताने चंद्रावर यशस्वी स्वारी केलीय. भारतीय तिरंगा चंद्रावर फडकलाय.

चांद्रयान मोहिमेअंतर्गत 14 जुलै 2023 रोजी चांद्रयान -3 चं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं होतं. 5 ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत चांद्रयान – 3 यशस्वीरित्या पोहोचलं होतं. मात्र आजच्या दिवशी सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. कारण याआधी चांद्रयान – 2 अगदी अखेरच्या क्षणी अपयशी ठरलं होतं. तेव्हा चंद्रावर लँडिंग करेपर्यंत सर्वांची धाकधूक वाढली होती. करोडो भारतीयांचे श्वास रोखले गेले होते. मात्र इस्त्रोच्या भारतीय शास्त्रज्ञांनी अशक्य ते शक्य करुन दाखवलं. आणि चंद्रावर भारताचं पाऊल पडलं. भारताचं चांद्रयान चंद्रावर यशस्वीरित्या उतरलं. भारतीय तिरंगा चंद्रावर फडकला आणि एक नवा इतिहास घडला.

हेही वाचा :  Indian Railway: रेल्वेच्या भोंग्यामागे दडलंय मोठं रहस्य; प्रत्येक आवाज सांगतो खूप काही

14 जुलै 2023 ला भारताने LVM3 चांद्रयान-3 लाँच केलं. तब्बल 42 दिवसांच्या प्रवासानंतर चांद्रयानाने चंद्रावर लँडिंग केलं. आता लोकांना उत्सुकता आहे ती  चांद्रयान3 कसं काम करणार याची

विक्रम लँडरवरील चार पेलोड काय काम करतील?

1. रंभा (RAMBHA) हे चंद्राच्या पृष्ठभागावर सूर्यापासून येणार्‍या प्लाझ्मा कणांची घनता, प्रमाण आणि बदल तपासेल.
2. चास्टे (ChaSTE) हे चंद्राच्या पृष्ठभागाची उष्णता म्हणजेच तापमान तपासेल.
3 .इल्सा  (ILSA) हे लँडिंगच्या आसपासच्या भूकंपीय क्रियाकलापांची तपासणी करेल.
4. लेझर रेट्रोरिफ्लेक्टर एरे (LRA) हे चंद्राची गतिशीलता समजून घेण्याचा प्रयत्न करेल.

शास्त्रज्ञांना काय फायदा?
विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर एकत्रितपणे चंद्रावरच वातावरण, चंद्राचा पृष्ठभाग, रसायने, भूकंप, खनिजे इत्यादींचा अभ्यास करतील. यामुळे इस्रोसह जगभरातील शास्त्रज्ञांना भविष्यातील अभ्यासासाठी माहिती मिळणार आहे. तसंच संशोधन करणे सोपं जाणार आहे. भारत हा जगातला चौथा देश ठरलाय, ज्याने हे यश मिळवलं आहे. याआधी हा विक्रम अमेरिका, रशिया आणि चीन यांच्या नावावर आहे. 

ISRO ला काय फायदा होणार?
ISRO म्हणजे भारतीय अंतराळ संशोधन संस्था. इस्त्रोने आतापर्यंत 34 देशांचे 424 परदेशी उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. यासोबत 104 उपग्रह अवकाशात सोडले आहेत. इस्त्रोच्या पहिल्या चांद्रयान-1 मोहिमेने चंद्रावर पाण्याचा शोध लावला. चांद्रयान-2 चा ऑर्बिटर अजूनही कार्यरत आहे. चांद्रयान-2 च्या मदतीनेच चांद्रयान-3 चंद्रावर उतरण्यात यशस्वी ठरलं. चांद्रयान-3 च्या यशामुळे जगातील सर्वात मोठ्या अंतराळ संस्थांमध्ये इस्रोचे नाव समाविष्ट होणार आहे. 

हेही वाचा :  Ahmednagar to Be Renamed: औरंगाबाद, उस्मानाबादनंतर आता महाराष्ट्रातील आणखी एका शहराच्या नामांतराची तयारी?

सामान्य माणासाला काय फायदा?
पेलोड्स म्हणजेच चांद्रयान आणि मंगळयान यांसारख्या अंतराळ यानांमध्ये बसवलेली उपकरणं हवामान आणि दळणवळण उपग्रहांसाठी वापर होतो. संरक्षण संबंधित उपग्रहासाठी याचा फायदा होणार आहे.. नकाशा दाखवणाऱ्या उपग्रहांसाठी फायदेशीर ठरणार आहे. ही उपकरणे देशात उपस्थित असलेल्या लोकांच्या कल्याणासाठी कार्य करतात. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींनी भारताला अश्मयुगात नेलं, देशाला बुरसटलेल्या मार्गाने..’; राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut On PM Modi Political Stand: “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकशाहीशी काहीच घेणे देणे नाही. …

महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

Raj Thackeray Kankavli Slams Uddhav Over His Comment On Gujrat: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी …