विराट-अनुष्काची मुलगी वामिकासह वृंदावनाच्या आश्रमाला भेट; हात जोडतानाचा फोटो व्हायरल

Virat Anushka In Vrindavan : दुबईमध्ये नवीन वर्षाचे सेलिब्रेशन केल्यानंतर क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) बुधवारी वृंदावनला पोहोचले. या दरम्यान या जोडप्याने बाबा नीम करोली यांच्या आश्रमाला भेट दिली. यानंतर विराट आणि अनुष्का प्रेमानंद गोविंद शरण जी महाराज यांच्या आश्रमात पोहोचले. या दरम्यान त्यांची मुलगी वामिका कोहलीही दिसली. आपलं वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवण्याची आवड असलेल्या या जोडप्याने मथुरा-वृंदावन भेट मीडियापासून दूर ठेवली. मात्र, विराट-अनुष्का आश्रमात आल्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.

आश्रमात मुलीबरोबर दिसले विराट-अनुष्का

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा 4 जानेवारी 2022 रोजी वृंदावन येथील एका आश्रमात गेले होते. हे जोडपे श्री हित प्रेमानंद गोविंद शरणजी महाराज यांना भेटण्यासाठी आले होते. व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये, अनुष्का आणि विराट जमिनीवर बसलेले दिसत आहेत आणि त्यांची मुलगी वामिका आईच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. फोटोमध्ये विराट-अनुष्का हात जोडून महाराजांना नमस्कार करताना दिसत आहेत.


नोव्हेंबरमध्ये उत्तराखंडचा दौरा केला 

हेही वाचा :  जिनिलियाची खास पोस्ट; व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

विराट, अनुष्का आणि त्यांची मुलगी वामिकाने नोव्हेंबर 2022 मध्ये नैनिताल, उत्तराखंडला भेट दिली होती. या दरम्यान त्यांनी तेथील प्रसिद्ध मंदिरांनाही भेट दिली होती. यावेळी त्यांनी कैची धाम मंदिराला भेट दिली. त्यानंतर दोघेही बाबा नीम करोली यांच्या आश्रमात दर्शनासाठी पोहोचले होते. या दौऱ्यावर या स्टार कपलने चाहत्यांसोबत अनेक फोटो क्लिक केले होते.

अनुष्का वर्क फ्रंट 

अनुष्काच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अनुष्का लवकरच स्पोर्ट्सवर आधारित चित्रपट ‘चकदा एक्सप्रेस’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट भारतीय महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामी यांच्या जीवनावर आधारित आहे. अनुष्काने या चित्रपटाचे शूटिंग आधीच पूर्ण केले आहे, ज्याचा नेटफ्लिक्सवर डायरेक्ट-टू-ओटीटी रिलीज होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

A. R. Rahman: संगीताचा बादशाह असणाऱ्या ‘ए.आर.रहमान’ यांचं खरं नाव माहितीये? हिट गाण्यांना दिलं संगीत



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …